शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

तेंडुलकरांची सारा आणि नवं क्रिकेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 11:09 IST

Sara Tendulkar News: सारा तेंडुलकर. भारतीयांच्या गळ्यातला ताईत असलेल्या सचिन तेंडुलकरची लेक. तिनं केलेली साधी सोशल मीडिया पोस्टही कायम व्हायरल होते. मात्र, या आठवड्यात ती वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे.

सारा तेंडुलकर. भारतीयांच्या गळ्यातला ताईत असलेल्या सचिन तेंडुलकरची लेक. तिनं केलेली साधी सोशल मीडिया पोस्टही कायम व्हायरल होते. मात्र, या आठवड्यात ती वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. तिनं ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमिअर लीगमध्ये मुंबई फ्रँचायझी विकत घेतली आहे. ही लीग म्हणजे ऑनलाइन क्रिकेट गेमिंग लीग आहे. गेल्या वर्षी ही लीग सुरू झाली आणि आता मेमध्ये दुसरा सीझन सुरू होतो आहे. फ्रँचायझी क्रिकेट हा जगभरच आता अत्यंत नफा कमवून देणारा व्यवसाय झालेला असताना आणि त्याला लाेकप्रियता लाभत असताना आता या नव्या ई-क्रिकेट लीगमध्ये सारा तेंडुलकरही आपल्या टीमसह दाखल होते आहे.

सचिनची लेक आणि क्रिकेटशी संबंधित काही करणार तर त्याची जगभर चर्चा होणं साहजिक आहे. मात्र, सारानं त्यासंदर्भात फार काही बोलणं टाळलंच आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून सारानं मास्टर्स केलं आहे. क्लिनिकल ॲण्ड पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन या विषयातली पदवी घेऊन भारतात परतल्यावर तिनं काही काळ मॉडेलिंगही करून पाहिलं. त्यानंतर आता मात्र नुकतंच तिनं ‘सचिन तेंडुलकर फाउण्डेशन’ या संस्थेत संचालक म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. 

लहान मुलांसाठी काही भक्कम काम उभं करण्याचा, याच क्षेत्रात करिअर करण्याचा तिचा विचार आहे हे तिच्या वडिलांनीच सोशल मीडियात प्रसिद्ध करून सांगितलं.अर्थात हे काम करत असताना ई-क्रिकेट लीगमधली फ्रँचायझीही तिने विकत घेतली आहे. भारतातल्या नव्या इन्फ्लुएन्सर फ्रेण्डली इको सिस्टममध्ये सारा तेंडुलकर हे अर्थातच मोठं नाव आहे. हे सारं सुरू असताना साराचं नाव कुणाकुणाशी जोडलं जाण्याचा गॉसिपखेळ सुरू असतो. मात्र, आपली डिसेन्सी सांभाळत तिनं आजवर कुठल्याच गोष्टींचा वाद-प्रतिवाद केलेला नाही. आडनावापलीकडे स्वत:ची वाट शोधत निघालेली ही हसरी तरुणी, तिच्या ग्लॅमरस जगण्याची चर्चा तर अटळ आहे.

टॅग्स :Sara Tendulkarसारा तेंडुलकरSachin Tendulkarसचिन तेंडुलकर