शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
3
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
4
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
5
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
6
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
7
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
8
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
9
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
10
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
11
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
12
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
13
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
14
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
15
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
16
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
17
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
18
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
19
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
20
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!

जाहिरात कलेची तंत्रभाषा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 05:26 IST

जाहिरातींची लोकांना इतकी सवय लागते की, ती जर माध्यमात आली नाही तर ते उत्पादन बंद झाले का, असा संशय ग्राहकांच्या मनात येतो, त्यामुळे जाहिरात ही सातत्याने करावी लागते.

- अ. पां. देशपांडेजाहिरातींची लोकांना इतकी सवय लागते की, ती जर माध्यमात आली नाही तर ते उत्पादन बंद झाले का, असा संशय ग्राहकांच्या मनात येतो, त्यामुळे जाहिरात ही सातत्याने करावी लागते. काही जाहिराती ग्राहकांची दिशाभूल करून आपल्या मालाची विक्री वाढवण्यासाठी केलेल्या असतात. एका टूथ पेस्ट कंपनीने जाहिरात दिली होती की, आम्ही ट्यूूबला बट्रेस थ्रेड्स लावले आहेत. त्याचा आणि टूथ पेस्टच्या दर्जाचा काहीही संबंध नव्हता. ती पेस्ट खपत होतीच. पण, त्यांना त्यांचा खप आणखी वाढवायचा होता. वस्तुत: त्यांनी ट्युबचे भोक मोठे केले होते. नेहमीच्या सवयीने ग्राहक ट्युब दाबत असताना भोक मोठे केल्याने जास्त पेस्ट बाहेर येऊन ती ट्युब लवकर संपत असे व मालाची विक्री वाढत असे. म्हणूनच जाहिराती कशा केल्या जातात यावरच सारे व्यवसायाचे गणित आता अवलंबून राहायला लागले आहे.जाहिरात कला ही पुरातन काळापासून चालत आली आहे. जुन्या काळी वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन ही माध्यमे नव्हती. पण, प्रत्येक नगरीचा एक राजा असायचा. त्या राजापाशी स्वत:ची भलामण करण्यासाठी त्याच्या दरबारी गायक, चित्रकार, ज्योतिषी, मल्ल अशी नाना प्रकारची माणसे येत - जात असत. त्यांना राजदरबारी नोकरी हवी असे. त्यासाठी आपण कोण आहोत हे राजाला सांगावे लागे. आपली कला सादर करून दाखवावी लागत असे. शिफारशी आणाव्या लागत असत. यातून राजा मग निवड करीत असे. ही निवड नक्की व्हावी म्हणून स्वत:ची जाहिरात प्रभावीपणे करणे आलेच.तेथून पुढे आता मुख्यत: उत्पादक वस्तूंची जाहिरात करावी लागत असल्याने, त्याचे असे एक शास्त्र तयार झाले. अभ्यासक्रम तयार झाले. त्यात प्रवीण झालेली माणसे मग व्यवसायात उतरली. मग अनेक उत्कृष्ट जाहिराती वाचनात येऊ लागल्या. यात लोक अतिशयोक्ती करू लागल्याने सरकारला त्यावर नियंत्रण ठेवणारे काही नियम, कायदे करावे लागले. तरीही आजकाल माध्यमात येणाºया जाहिराती पाहिल्यास किती अतिशयोक्ती आणि चुकीची माहिती दिली जाते ते लक्षात येते. साबणाची जाहिरात करताना तळहातावर भिंग ठेवून तळहातावरील जंतू वळवळताना दाखवले. यामुळे विद्यार्थ्यांपुढे चुकीचा संदेश जातो. भिंग म्हणजे काय सूक्ष्मदर्शक उपकरण आहे का? पण जाहिरात कलेचा उपयोग विधायक पद्धतीने जरूर करता येतो. हल्ली त्यात संगणकाचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत असतो. त्या सगळ्याची उदाहरणे, जाहिरातीत पाहायला मिळतात.जाहिरातीचा एक नमुना जुन्या म्हणीतून आला आहे, तो असा की, ‘बोलणाºयांची माती विकली जाते पण, न बोलणाºयांची (मोत्यांसारखी) ज्वारीदेखील विकली जात नाही.’ याचा अर्थ असा आहे की, जाहिरात करणाºयांची गौण समजली जाणारी वस्तूदेखील बाजारपेठेत चटकन विकली जाते. परंतु, ती न करणाºयांची उत्तमातील उत्तम व ग्राहकांच्या गरजेची, आवश्यक वस्तूदेखील सहजपणे विकली जात नाही.जाहिरातीतील भाषा आकर्षक असावी लागते. जाहिरात बनवणारा माणूस त्या त्या भाषेत पारंगत असावा लागतो, कारण त्याला जाहिरातीतील मजकूर एखाद्या चित्रासह देत असताना मोजक्या शब्दांत संदेश व्यक्त करावा लागतो. देशाचे नेते जेव्हा काही घोषणा देतात, तेव्हा त्यांचा प्रभावही जनतेवर पडतो आणि त्या जाहिराती सारख्या वापरल्या तर जातातच, पण त्या लोकांच्या चिरकाल लक्षातही राहतात. उदा. ‘‘न्यायमूर्ती रानडे यांनी महाराष्ट्र मनाच्या थंड गोळ्यात ऊब निर्माण केली,’’ हे लोकमान्य टिळकांचे वाक्य पाहा. किंवा ‘‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच,’’ हे लोकमान्यांचे वाक्य पाहा. आता ती वाक्ये उच्चारून शंभर वर्षे झाली तरी ती लोकांच्या मनात ताजी आहेत. ब्रिटिशांना उद्देशून १९४२ साली महात्मा गांधींनी उच्चारलेले ‘‘क्वीट इंडिया’’ किंवा ‘‘चले जाव’’ हे शब्द असेच अजरामर झाले आहेत. ‘‘आराम हराम है’’ हे नेहरूंचे वाक्य, ‘‘गरीबी हटाव’’ ही इंदिरा गांधींची घोषणा, ‘‘जय जवान, जय किसान’’ ही लाल बहादूर शास्त्रींची घोषणा आणि ‘‘जय विज्ञान’’ ही अटल बिहारी वाजपेयी यांनी त्याला जोडलेली पुस्ती, ‘‘मै पैसा नाही खाउंगा, ना मै किसीको खाने दुंगा’’ हे मोदींचे वाक्य ही लोकांच्या लक्षात राहिलेली वाक्ये असून, ती जाहिरात कलेचा उत्तम नमुना आहेत. 

टॅग्स :Advertisingजाहिरात