शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

तांत्रिक शिक्षण देणारी व्यवस्था मोठी पण दर्जा सुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 5:33 AM

भारतातील उच्च शिक्षण, विशेषत: तांत्रिक शिक्षण हे गेल्या दशकात उच्च पातळीवर पोहचले होते. पण अलीकडच्या काही वर्षांत त्याची अधोगती पाहावयास मिळाली. हा कशाचा परिणाम होता? संस्थांची वाढ, विद्यार्थ्यांची वाढ यामुळे एकूण व्यवस्थेची दमछाक होत होती.

-  डॉ. एस.एस. मंठा(माजी चेअरमन, एआयसीटीई एडीजे. प्रोफेसर, एनआयएएस बंगळुरू)भारतातील उच्च शिक्षण, विशेषत: तांत्रिक शिक्षण हे गेल्या दशकात उच्च पातळीवर पोहचले होते. पण अलीकडच्या काही वर्षांत त्याची अधोगती पाहावयास मिळाली. हा कशाचा परिणाम होता? संस्थांची वाढ, विद्यार्थ्यांची वाढ यामुळे एकूण व्यवस्थेची दमछाक होत होती. वास्तविक जगातील सर्वात मोठी तांत्रिक शिक्षणाची व्यवस्था आपल्याच देशात आहे, पण या वाढीमुळे दर्जा घसरला ही वस्तुस्थिती आहे. त्यात बेरोजगारीचा प्रश्न बिकट झाल्यामुळे परिस्थिती अधिकच बिघडली.कोणत्याही शिक्षण संस्थेत अध्यापक हा महत्त्वाचा असतो. त्यांच्यात गुंतवणूक करताना ती योग्य व्यक्तीसाठी व्हावी, हा नियोजनाचा मुख्य भाग असावा. अशास्थितीत अध्यापक आणि विद्यार्थी संख्या यांचे प्रमाण घसरणे कितपत योग्य आहे? ग्राहकीय बाजारपेठेत ज्याप्रमाणे अनेक बाजारपेठा असतात, त्याप्रमाणे शिक्षण क्षेत्रातही विविध दर्जाच्या संस्था असाव्यात का? तसे जर होत असेल तर शिक्षणाचा दर्जा खालावला आहे, अशी ओरड करण्यात काय अर्थ आहे? शिक्षण संस्थांकडून अपेक्षा वाढल्यामुळे या संस्थांवर कमालीचा दबाव असतो. त्यातही चांगले अध्यापक मिळवणे व त्यांना दीर्घकाळ संस्थेत टिकवून ठेवणे आणि संस्थेतच त्यांच्या विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे झाले आहे. तांत्रिक शिक्षण संस्थेतून उत्तीर्ण होऊन बाहेर पडणाऱ्या तरुणांसाठी रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध करणे सोपे नाही. त्यातही उद्योगांनाही गुणवत्तापूर्ण विद्यार्थी हवे असतात. त्यामुळे गुणवत्ता नसलेल्यांची छाटणी करण्यासाठी विविध उपाय योजण्यात येतात.संस्थांचा दर्जा निश्चित करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करण्यात येतो. त्यासाठी गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रम योजण्यात येतात. विद्यार्थ्यांना आंतरराष्टÑीय पद्धतीचे शिक्षण देण्यात येते. तसेच इंटर्नशिप करण्यावर भर देण्यात येतो. पण हे सगळे करण्यासाठी गुणवान अध्यापक असणे गरजेचे असते. सध्याच्या स्पर्धात्मक जगात अध्यापकांनाही सतत स्वत:ला विकसित करीत अद्यावत ठेवून टिकवावे लागते, पण दुर्दैवाने अनेक शिक्षण संस्थांत अध्यापकांसाठी प्रेरणादायी वातावरणच नसते. अध्यापकांच्या शोधनिबंधाचा दर्जा उत्कृष्ट असेल तरच तो नामवंत नियतकालिकात प्रकाशित होऊ शकतो. दर्जेदार निबंध लेखनासाठी अध्यापकांना स्वत:चा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करावा लागतो. विद्यार्थ्यांना त्यांनी अद्ययावत ज्ञान द्यावे यासाठी त्यांनी स्वत: अद्ययावत राहणे गरजेचे असते. त्यासाठी त्यांना सतत वाचन करायला हवे आणि नव्या नव्या गोष्टी शिकायला हव्यात. शिक्षणाच्या व्यवसायात अध्यापकाने स्वत:मध्ये सतत सुधारणा करीत राहायला हवे. त्यासाठी त्यांनी अधिक काळ प्रयोगशाळेत राहायला हवे.शिक्षण संस्थांनीदेखील गुणवत्तापूर्ण अध्यापकात गुंतवणूक करणे गरजेचे झाले आहे. त्यांना स्वत:चा विकास करण्यासाठी चांगल्या सोयी पुरविल्या पाहिजेत. त्यासाठी पुरेसा पैसा खर्च करणे, चांगली ग्रंथालये निर्माण करणे आणि सर्वतºहेच्या तांत्रिक सोयी वर्गात उपलब्ध करणे आवश्यक झाले आहे. त्यांच्यावर शिक्षणाचा भार जास्त नसावा. तसेच संशोधन करण्यासाठी पगारी रजाही मिळायला हवी. तसेच संस्थेत पुरेसे अध्यापक असणेही गरजेचे आहे.अनुभव असा आहे की, काम करणारे अध्यापक काम करताना खूश नसतात. नव्या अध्यापकांवर जास्त जबाबदारी टाकण्यात येते, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. अध्यापकांचा परस्परांशी संवाद नसल्यामुळे त्यांना संस्थेत एकटेपणा जाणवू लागतो. चांगल्या कामाबद्दल कधीही पुरस्कृत केले जात नाही. त्यांच्याकडून अवाजवी अपेक्षा बाळगल्या जातात. त्यांना पुरेशी साधने दिली जात नाहीत. नवे अध्यापक संस्थेत पहिल्यांदा प्रवेश करतात तेव्हा त्यांच्या संस्थेकडून खूप अपेक्षा असतात. पहिल्या वर्षी त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. अध्यापकांनीदेखील संस्थेचे तसेच विद्यापीठाचे नियम समजावून घेणे व आपले वर्ग नियमित घेणे आवश्यक असते.शैक्षणिक संस्थांनीसुद्धा आपल्या अध्यापकांसाठी अद्यावतीकरणाचा कार्यक्रम आखणे आवश्यक असते. विद्यापीठानेदेखील कनिष्ठ अध्यापक आणि ज्येष्ठ अध्यापक यांचे संयुक्त कार्यक्रम आयोजित करून त्यांच्यात सुसंवाद निर्माण करायला हवा. त्यामुळे अध्यापकांच्या अध्यापन, संशोधन व सेवा क्षमतेत वाढ होऊ शकेल. गेल्या अर्ध शतकात जागतिक घडामोडींमुळे उच्च शिक्षण संस्थांना आपल्या फॅकल्टीचे आंतरराष्टÑीयकरण करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे संस्थांच्या रेटिंगवरही परिणाम होतो. त्यादृष्टीने अध्यापकांचे आदान-प्रदान करण्यासाठी वेगळ्या निधीची तरतूद करणे शिक्षण संस्थांसाठी आवश्यक आहे. आपल्या देशात फारच थोड्या संस्था या कामासाठी वेगळी तरतूद करतात. परिसरातील संस्थांची एकजूट करून त्यांनी परस्परांमध्ये फॅकल्टीचे आदान-प्रदान केले तरीही शिक्षणाचा दर्जा सुधारू शकतो, पण हेही आपल्याकडे होत नाही.अध्यापकांच्या शैक्षणिक आणि गुणात्मक विकासाकडे शिक्षण संस्थांनी आणि विद्यापीठांनी लक्ष दिलेच पाहिजे. त्यासाठी शैक्षणिक कॅम्पस परस्परांना जोडणे आणि निधीचे नियोजन करणे गरजेचे आहे. संस्थांनी याकडे एक मिशन म्हणून बघितले पाहिजे. आपल्या अध्यापकांना आंतरराष्टÑीय शिक्षण पद्धतीशी जोडणे हे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या शिक्षण संस्थांना संशोधनासाठी वेगळी ग्रॅन्ट दिली जात नाही. ती दिली जावी. तसेच संस्थात्मक भागीदारी, मग ती प्रादेशिक पातळीवर तसेच आंतरराष्टÑीय पातळीवरही केली जावी. त्यासाठी शिक्षण संस्थांनी आपल्या अध्यापकांच्या गुणवत्तेचाही आढावा घेणे आवश्यक आहे. चांगल्या शिक्षण संस्था या जागृती, बांधिलकी, नियोजन, परीक्षण, कार्य पद्धती आणि कार्य बळकटी यावर भर देत असतात. पण त्यासाठी निधीची आवश्यकता असते. त्यामुळे आपल्या अनेक तांत्रिक शिक्षण संस्था कामचलाऊ पद्धतीने काम करीत असतात. त्याऐवजी त्यांनी अधिक भांडवली गुंतवणूक करून आपल्या संस्थांच्या क्षमतावाढीकडे लक्ष पुरवावे. अध्यापक हा शिक्षणाचा कणा असतो. त्यांच्यात केलेली आर्थिक गुंतवणूक वाया तर जातच नाही, पण त्यामुळे आपल्या देशाची प्रतिमा वाढण्यास मदतच होत असते.

टॅग्स :educationशैक्षणिक