शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
2
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
3
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
4
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
5
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
6
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
7
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
8
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
9
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
10
२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
11
ठाकरे माझे मतदार! मत मागण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला शिंदेसेनेचा उमेदवार, सारेच अवाक्, त्यानंतर घडलं असं काही? 
12
दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
13
"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
14
एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा
15
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
16
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
17
Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच
18
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
19
२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
20
Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

पैठण्या घ्या, फुकेतला (फुकट) जा; पण मला(च) ‘मत’ द्या!

By संजय पाठक | Updated: January 8, 2026 04:43 IST

राजकारण हा चोख ‘बिझनेस’च आता. नंतर मलिदा कमवायचा असेल तर आधी ‘गुंतवणूक’ हवीच. त्यातला काही भाग मतदारापर्यंत जातो इतकंच!

संजय पाठक, वृत्तसंपादक, लोकमत, नाशिक

नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या निवडणुकीत एका उमेदवाराने मतदारांना चक्क सोनं वाटलं. महाशय निवडणूक हरले, आणि ज्याच्या त्याच्या घरी जाऊन सांगू लागले, ‘मला मत दिलं नाहीत; आता मी दिलेलं सोनं परत करा!’ कुणीतरी या संवादाचा व्हिडीओ शूट केला आणि तो व्हायरल झाला. आपल्या मताला ‘सोन्या’चं मोल आहे हे कळून चुकलेले मतदार त्याच्या विनवण्यांना / धमकावण्याला अजिबात बधले नाहीत, हे वेगळं सांगायला नको!  

हे झालं छोट्या गावातल्या नगरपालिकेचं. महानगरपालिकेचा तोरा त्याहून कितीतरी मोठा. अनेक महानगरपालिकांत रेकॉर्डवर नसलेला इलेक्शन खर्च आता दोनचार कोटींच्या पुढेच जातो. त्यात मतदारांना ‘वाटपा’च्या वस्तू/सेवांचं बजेट फार मोठं! पुण्याला एका उमेदवाराने म्हणे (निवडून आल्यास) लकी ड्रॉ काढून विजेत्या मतदाराला एक गुंठा जमीन, हेलिकॉप्टर राइडचं अश्वासन दिलंय. कोणी थायलंड-फुकेत (आणि फुकट) टुरही देणार आहे. चांदीची जोडवी, बॅगा, मिक्सर, शिलाई मशीन, कुकर आणि आणि साड्या यात नवीन काहीच नाही.  यावर्षी ‘होम मिनिस्टर’चा स्वस्त प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. त्यातून घाऊक प्रमाणात पैठण्याच पैठण्या वाटल्या जातात. नाशिकमध्ये एका माजी नगरसेविकेने  अशा २५ हजार पैठण्या प्रचार सुरू होण्याआधीच वाटल्या आहेत. याशिवाय ज्येष्ठांना अष्टविनायक दर्शन, केदारनाथ, अयोध्या दर्शन, अजमेर शरीफ अशा सहली आहेतच! 

नगरपालिका, महापालिका निवडणुकीतच हे ‘वाटप’ होतं असं नव्हे; सुजाण सुशिक्षित उमेदवार अपेक्षित असलेल्या शिक्षक मतदारसंघातही मोठं अर्थकारण चालतं. नाशिकच्या शिक्षक मतदारसंघातील मतदारांना एका धनाढ्य उमेदवाराने पैठणी आणि चांदीची नथ, चांदीचे पेन भेट दिल्याची चर्चा होती. उमेदवार जितका तगडा, तितक्या मतदारांच्या अपेक्षा जास्त! केवळ झोपडपट्टीतील मतदार पैसे घेतात म्हणून त्यांना बदनाम केलं गेलं, परंतु आता लाभार्थी व्यापक झाले आहेत. मध्यमवर्गीय, उच्चभ्रू, सुशिक्षित मतदारदेखील उमेदवाराशी ‘सौदेबाजी’ करतात. सोसायटीच्या आवारात पेव्हर ब्लॉक लावण्यापासून सोसायटीच्या इमारतीला रंग देण्यापर्यंत  यादी मोठी आहे. 

हे सारं इतकं खाली का उतरलं? - राजकारणातले बदलते आर्थिक प्रवाह त्याला जबाबदार आहेत हे नक्की! निवडून गेलेले (बहुतेक) उमेदवार विविध मार्गांनी किती बख्खळ कमाई करतात, हे आता लपून राहिलेलं नाही. तिकीट मिळवण्यापासून सर्व स्तरावरचे ‘आर्थिक व्यवहार’ आता उघडे पडलेच आहेत. पाच वर्षांत आपल्या नगरसेवकाने बरंच कमावल्याचं उघड दिसत असल्याने मतदारांनाही आता आर्थिक अपेक्षा ठेवण्यात काही(च) संकोच वाटेनासा झाला आहे. 

नगरसेवकांची म्हणूनही एक बाजू आहेच!  आता नगरसेवकाला केवळ निवडणुकीपुरता जनसंपर्क ठेवून चालत नाही, तर पाच वर्षे सतत संपर्क ठेवावा लागतो. त्याला खर्च येतो. हात सैल सोडावा लागतो. प्रभागात दोन-तीन संपर्क कार्यालयं चालवायची तरी दीड-दोन लाख रुपये महिन्याला त्यातच जातात. वरून कार्यकर्त्यांची बडदास्त. नगरसेवकाला मिळणारं मानधन जेमतेम गाडीचं पेट्रोल आणि ड्रायव्हरच्या खर्चातच संपतं.. एकुणातच राजकारण हा ‘बिझनेस’ बनला आहे. नंतर मलिदा कमवायचा तर आधी ‘गुंतवणूक’ हवीच, आणि गुंतवणूक केली म्हणजे वसुली आलीच! 

त्या गुंतवणुकीतला काही भाग एका स्टेक होल्डरला म्हणजे मतदारापर्यंत जातो इतकंच! हे सारं जाणून असलेले मतदार मताच्या बदल्यात जे मिळेल ते घ्यायला, मिळालं नाही तर मागायला सोकावले आहेत. एखाद्या उमेदवाराने सोनं किंवा पैठणी दिली; तर ती भेट ‘परत’ करणारे किती असतील? जातपात-धर्माच्या पलीकडे जाऊन उमेदवार चांगला की वाईट हे सद्सद्विवेकबुद्धीने ठरवणारे मतदार किती असतील?.. जसे लोक, तसे त्यांचे प्रतिनिधी; हे तरी खोटं कसं म्हणणार?

- असं असलं, तरी  जिवंत लोकशाहीच्या खुणाही दिसतातच!  त्र्यंबकेश्वरचा ‘तो’ उमेदवार सोने वाटूनही पराभूत झालाच ना? पैशाने गब्बर असलेले, प्रभागात दादागिरी, दहशत असलेले कितीतरी उमेदवार निवडणुकीत माती खातातच! अनेक ठिकाणी कष्टकरी, पुरोगामी विचारांचे उमेदवार निवडून येतात. अमिषाकडे धावणारे मतदार आहेत, तसे अमिषाला बळी न पडता जबाबदारीने मतदान करणारेही मतदार आहेत. त्यांची संख्या अधिकाधिक वाढली पाहिजे! sanjay.pathak@lokmat.com

English
हिंदी सारांश
Web Title : Bribes for votes: Candidates offer gifts, voters demand more.

Web Summary : Local elections see rampant bribery: gold, trips, goods offered. Voters now expect returns, blurring ethical lines. Some candidates lose despite spending, showing hope for integrity.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६PoliticsराजकारणNashik Municipal Corporation Electionनाशिक महानगरपालिका निवडणूक २०२६