शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

प्रासंगिक- रस्ते झाडा, घासा- पुसा.. आता माणसांचे नव्हे, स्मार्ट यंत्राचे काम !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 06:40 IST

गणेशोत्सवाची लगबग संपली. दोन ऑक्टोबरची गांधी जयंती, तत्पूर्वीचा स्वच्छता पंधरवडा आणि नागरिकांना आता वेध लागले आहेत ते नवरात्रीचे.

- दीपक शिकारपूर, माहिती तंत्रज्ञान अभ्यासक गणेशोत्सवाची लगबग संपली. दोन ऑक्टोबरची गांधी जयंती, तत्पूर्वीचा स्वच्छता पंधरवडा आणि नागरिकांना आता वेध लागले आहेत ते नवरात्रीचे. ह्या सर्व प्रकारात आपण शहर स्वच्छ ठेवत आहोत का ह्याकडे किती लक्ष देतो आहोत? हजारो स्वच्छता कर्मचारी शहर स्वछतेसाठी जिवाचे रान करत असतात. इथेच आधुनिक तंत्रज्ञान अशा हातांना मदत करू शकते. ह्यासाठी आपण जपानकडून खूप शिकू शकतो. ह्यात अग्रेसर असणार आहे ते रोबोटिक्स तंत्रज्ञान. गेल्या दहा-वीस वर्षांत रोबोट्सचा वापर सध्या प्रत्येकच क्षेत्रामध्ये केला जातो आहे, शस्त्रक्रियेपासून युद्धभूमीपर्यंत आणि स्वयंपाक करण्यापासून गटारे साफ करण्यापर्यंत दूषित किंवा विषारी द्रव्ये गोळा करणे व ती वाहून नेणे अशांसारख्या आपल्यासाठी अतिशय धोकादायक असलेल्या कामांसाठी तर रोबोट्स आदर्शच म्हणावे लागतील.

रोबोट्सना जास्त काम देऊया आणि ज्या कामाचा आपणास तिरस्कार वाटतो त्यापासून सुरुवात करूया. उदा. शहरे स्वच्छ ठेवणे अवघड जागी जाऊन कचरा शोधणे, अति शीत वा अति उष्ण वातावरणात वावरणे अशा ठिकाणी यंत्रमानव वापरणेच योग्य.

ट्रिपल आय टेक्नॉलॉजीच्या रोबोटिक व्हॅक्युम क्लीनर्समुळे साफसफाईचे काम सोपे, कमी वेळात होते. संदर्भात ही एक क्रांती होते आहे. या उपकरणांतून बाहेर पडणाऱ्या निगेटिव्ह आयओन्समुळे धूळ, धूर, बुरशीसारखे हवेतील सूक्ष्म कण निकामी होतात.

त्यामुळे तुम्ही शुद्ध हवेत श्वास घ्याल याची खात्री होते. अशी उपकरणे मानवी कर्मचाऱ्यांना मदतनीस म्हणून नक्कीच मूल्यवर्धन करू शकते. ह्याच बरोबर जर आपण स्मार्ट मटेरिअलचा वापर केला तर सहज विरघळणाऱ्या वस्तूंची निर्मिती शक्य होईल. उत्पादनतंत्र तसेच यंत्रांच्या संदर्भातही क्रांती होते आहे.