शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

सुमतिं चमे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:01 AM

आपल्याकडे केवळ बुद्धिमत्ता असून चालत नाही़ कारण बुद्धी केव्हा घात करील ते सांगता येत नाही़ बुद्धीला सुद्धा प्रसंगी आवर घालता आला पाहिजे

डॉ. गोविंद काळे।एरवी आपण देहाचे नुसतेच मालक़ मालकाला आतली यंत्रणा, कशी काय चालते याची तर कवडीचीही माहिती असत नाही़ स्वत:चे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव लावून देहाचा मालक म्हणून जन्मभर स्वपरिचय देत असतो़ मनाचा शोध लागत नाही नि बुद्धीचे माहात्म्य आयुष्यभर उमगत नाही़ मनुष्य हा बुद्धिमान प्राणी म्हणून मिरवत असतो़ ईश्वर सुद्धा हल्ली मनुष्य नावाच्या बुद्धीप्राण्याला वचकून असतो़ आपल्याकडे केवळ बुद्धिमत्ता असून चालत नाही़ कारण बुद्धी केव्हा घात करील ते सांगता येत नाही़ बुद्धीला सुद्धा प्रसंगी आवर घालता आला पाहिजे हे तर आपल्या पूर्वजांचे निक्षून सांगणे होते़ ‘नमस्ते व्यास विशालबुद्धे’ बुद्धीचा एकमेव मापदंड म्हणजे महर्षी व्यास. न्यूटन आणि आईनस्टाईनला कुणी विशालबुद्धीचे म्हटल्याचे आमच्या तरी ऐकिवात नाही़ ‘बुद्धि: कर्मानुसारिणी’ म्हणजे पूर्वजन्मी केलेल्या कृत्यानुसार ह्या जन्मी बुद्धी कार्य करीत राहते़ गतजन्म आठवणार कुणाला हो? आणि पुनर्जन्मावर विश्वास तरी कोण ठेवणार? काय साधून घ्यायचे आहे ते आत्ताच़ उद्या कुणी पाहिला आहे़मंत्रदृष्ट्या ऋषींचे ज्ञान अगाध होते़ त्यामुळेच तर त्यांनी ‘मतिं च मे सुमतिं चमे’ अशी प्रार्थना केली आहे़ मागणी केली आहे़ बुद्धीपुरते मर्यादित राहता आले असते परंतु वेगळी सुबुद्धीची मागणी ऋषींची आहे़ कारण बुद्धिमान माणसेही मोठमोठ्या चुका करतात़ प्रमाणपत्र मिळते ‘त्या वेळी त्याची बुद्धी कुठे शेण खायला गेली होती कोण जाणे?’ बुद्धी असून ही परिस्थिती उद्भवते़ हेच कृत्य करायचे होते तऱ़.च्या जन्माला का नाही गेलास़अरे! तू माणूस ना? बुद्धी नव्हे तर माणसाकडे सुबुद्धी असली पाहिजे़ घरातील बालक सायंकाळी शुभं करोति झाल्यावर आजोबांच्या पाया पडते तेव्हा ते एवढेच म्हणतात़ ‘सद्बुद्धी देरे बाबा माझ्या नातवाला आणि कल्याण कऱ’ बुद्धी ही न्युट्रल आहे. ती पापाकडे, दुराचाराकडे वळली की पापबुद्धी होते़ समर्थांना लिहावे लागले ‘मना वासना पाप बुद्धी नको रे!’ पन्नासाव्या मजल्यावरून बादलीभर पाणी क्षणार्धात खाली ओतता येते़ वरती चढवायचे झाले तर मात्र पंप लावावा लागतो. तरच पाणी चढते़ जीवन सुसह्य होते़हे तर व्यवहारातील गणित आहे़ पंपाच्या माध्यमाने वर जाण्याचे गणित सुटते़ पंप हा एक संस्कार आहे़ मानवी जीवनाला संस्कारच घडवू शकतात, वाचवू शकतात म्हणून सुमती/सुबुद्धी़ ‘मतिं च मे सुमतिं चमे’ ही झालीपाहिजे प्रार्थना़ विष्णुसहस्रनामसांगते ‘नाशुभामति:’ / अशुभ बुद्धी देऊ नको़

टॅग्स :spiritualअध्यात्मिक