शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

सहज शक्य! नव्या शैक्षणिक धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रबळ इच्छाशक्ती पुरेशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 14:53 IST

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन झालेले असतानाही छत्तीसगड राज्यातील ४२,००० शिक्षकांनी आपल्या मोबाईलचा वापर करून नव्या शिक्षण पद्धतीचे, पेडागॉजीचे ऑनलाईन प्रशिक्षण घेतले आहे.

ठळक मुद्देदुसरा महत्त्वपूर्ण बदल शिक्षक या संकल्पनेमध्ये आहे. नवीन धोरणामध्ये सहअध्यायी म्हणजेच मित्रांनी शिकविणे (पीअर ट्युटरिंग), प्रशिक्षित स्वयंसेवक, तसेच तंत्रज्ञानाचा अंतर्भाव आहे.

- नंदकुमार(प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन)राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या ‘व्हिजन’ मध्येच ‘ग्लोबल’ हा शब्द तीन वेळा आलेला आहे़ त्यातच या धोरणाचे इंगित आहे़ जगातील श्रीमंत देश आपल्या मुलांना एकविसाव्या शतकातील कौशल्ये शिकवीत असताना सहा नवीन पेडागॉजी (पद्धती) वापरतात. भारताच्यानवीन शैक्षणिक धोरणामध्ये जवळ-जवळ त्या सर्व पेडागॉजीचा उपयोग केला जाणार आहे़ शिक्षण हे विद्यार्थ्यांसोबत घडणाऱ्या आंतरक्रियेतून घडते. ही आंतरक्रिया जेवढ्या उत्कृष्ट पद्धतीने केली जाणार तेवढे चांगले शिक्षण घडेल.दुसरा महत्त्वपूर्ण बदल शिक्षक या संकल्पनेमध्ये आहे. नवीन धोरणामध्ये सहअध्यायी म्हणजेच मित्रांनी शिकविणे (पीअर ट्युटरिंग), प्रशिक्षित स्वयंसेवक, तसेच तंत्रज्ञानाचा अंतर्भाव आहे. हा धोरणाचा गाभा आहे. त्यासाठी फार जास्तीचा निधी किंवा राजकीय इच्छाशक्तीचीही गरज नाही. हे सहज राबविणे शक्य आहे.आंतरराष्ट्रीय शिक्षण देण्याच्या हेतूने सुरूकेलेल्या पथदर्शी शाळांपैकी यशस्वी झालेली एक शाळा वाबळेवाडी (ता. शिरूर, जि. पुणे)! इथे राबविली जाणारी नावीन्यपूर्ण शिक्षण पद्धती, पेडागॉजी हे वर उल्लेखिल्याप्रमाणेच आहेत़ ज्यात मुलांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान, स्व आणि पीअर लर्निंग तसेच तंत्रज्ञानाच्या वापराचा समावेश आहे. बालमानसशास्त्राच्या दृष्टीने मुलांनी मुलांकडून शिकण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे मुलांच्या शिकण्याच्या गतीत प्रचंड वाढ होते.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन झालेले असतानाही छत्तीसगड राज्यातील ४२,००० शिक्षकांनी आपल्या मोबाईलचा वापर करून नव्या शिक्षण पद्धतीचे, पेडागॉजीचे आॅनलाईन प्रशिक्षण घेतले आहे. एकविसाव्या शतकाचे कौशल्य, ‘एकमेकास सहकार्य करणे’ हे आहे़ शिकत असताना मुले मोबाईल नसलेल्या मुलांना ‘मोबाईल मित्र’ म्हणून मदत करतात. या उदाहरणांवरून या धोरणामध्ये केल्या गेलेल्या विचारांची अंमलबजावणी शक्य आहे़प्रगत देशांमध्ये शंभर टक्के पूर्वप्राथमिक शिक्षणाची सोय असते. त्याची व्यवस्था या धोरणामध्ये कालबद्ध पद्धतीने केली जाणार आहे. यासोबतच तिसºया वर्गातील शंभर टक्के मुलांना २०२५ पर्यंत मूलभूत भाषा आणि गणित हे अभियानस्वरूप शिकविले जाणार आहे. पूर्वप्राथमिकच्या वयापर्यंत मुलांना मूलभूत बाबी जमल्यास पुढील शिक्षण सोपे जाते. याचा परिणाम गळती थांबविण्यातसुद्धा होईल.सहअध्ययन आणि प्रतिभावंत, बुद्धिवान मुलांच्या एकत्रीकरणाचा विचार केल्यावर सर्वच मुलांना लाभ होईल. मात्र, शिक्षकांनी शिकविण्याऐवजी शिकण्याचे नेतृत्व, व्यवस्थापन आणि नियोजन योग्य पद्धतीने करावे. धोरणामध्ये पहिल्यांदा प्रशिक्षणाऐवजी सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासाची संकल्पना, सोबतच मेन्टॉरिंग मिशन आणि राष्ट्रीय शिक्षक व्यावसायिक मानक हेसर्व स्तरावरच्या यशस्वी बाबींचा प्रसार करण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. धोरणामधील बहुभाषिक व्यवस्था, त्यात भाषा शिकण्यातील आनंद, तसेच जीडीपीच्या सहा टक्के ऐवजी एकूण महसुलाच्या २० टक्के बजेट या नावीन्यपूर्ण व दूरगामी परिणाम करणाºया संकल्पना आहेत़

 

टॅग्स :Educationशिक्षण