शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

थुंकणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे!

By रवी टाले | Updated: November 14, 2018 19:02 IST

स्वच्छतेचे भारतीयांना काय वावडे आहे कुणास ठाऊक? जे वैयक्तिक स्वच्छतेकडेही दुर्लक्ष करतात, त्यांच्या बाबतीत बोलायलाच नको; पण जे वैयक्तिक स्वच्छतेच्या बाबतीत आग्रही दिसतात, असेही अनेक लोक सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत मात्र कमालीची हलगर्जी करताना आढळतात.

ठळक मुद्देसार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचा तर भारतीयांना जणू काही आजारच जडलेला आहे.जे तंबाखू, गुटखा, खर्रा, पान खातात त्यांना तर कुठेही पिचकारी मारण्याचा जणू परवानाच मिळालेला असतो.जे उपरोल्लेखित पदार्थांचे सेवन करीत नाहीत अशाही अनेकांना ऊठसूठ कुठेही थुंकण्याची सवय असते.

नकारात्मक बातम्यांच्या धबधब्यात मध्येच एखादी खूप छान बातमी वाचण्यात येते. दुर्दैवाने अनेकदा प्रसारमाध्यमेही अशा बातम्यांकडे दुर्लक्ष करतात किंवा उचित स्थान देत नाहीत. अनेकदा उचित स्थान न मिळाल्यामुळे सर्वसामान्य वाचकांचेही अशा बातम्यांकडे दुर्लक्ष होते. पुणे महापालिकेने गत आठ दिवसात रस्त्यांवर थुंकणाऱ्या १६० जणांना दंड ठोठावला आणि एवढेच नव्हे तर त्यांना त्यांनी केलेली घाण साफ करायला लावली, ही अशीच एक बातमी! पुणे महापालिकेने त्यासाठी १६ पथके गठित केली आहेत. ही कारवाई किती सातत्यपूर्ण रीतीने होते आणि पुणेकरांमध्ये त्यामुळे किती सुधारणा होते, हे कळण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागेल; पण सर्वच पालिकांनी या बाबतीत पुणे पालिकेचा कित्ता गिरविणे खूप गरजेचे आहे.स्वच्छतेचे भारतीयांना काय वावडे आहे कुणास ठाऊक? जे वैयक्तिक स्वच्छतेकडेही दुर्लक्ष करतात, त्यांच्या बाबतीत बोलायलाच नको; पण जे वैयक्तिक स्वच्छतेच्या बाबतीत आग्रही दिसतात, असेही अनेक लोक सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत मात्र कमालीची हलगर्जी करताना आढळतात. ज्यांना परदेश गमनाची संधी मिळते ते तर मायदेशी परतल्यानंतर तेथील स्वच्छता आठवून उसासे सोडतातच; पण ज्यांना तशी संधी मिळत नाही तेदेखील चित्रपटांमध्ये किंवा दूरचित्रवाणीवर परदेशातील प्रसंग बघून आमचा देश असा स्वच्छ का नाही, म्हणून हळहळतात! दुर्दैवाने बहुतेकांचे उसासे आणि हळहळणे तेवढ्यापुरतेच मर्यादित असते. उसासे सोडून किंवा हळहळून झाल्यावर लगेच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविताना त्यांना त्याची आठवणही नसते!सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचा तर भारतीयांना जणू काही आजारच जडलेला आहे. जे तंबाखू, गुटखा, खर्रा, पान खातात त्यांना तर कुठेही पिचकारी मारण्याचा जणू परवानाच मिळालेला असतो; पण जे उपरोल्लेखित पदार्थांचे सेवन करीत नाहीत अशाही अनेकांना ऊठसूठ कुठेही थुंकण्याची सवय असते. पिंक टाकणाºयांकडे तुच्छ नजरेने बघणारे अनेक उच्चभ्रू तोंडातील च्युर्इंग गम कुठेही थुंकतात, तेव्हा कुठेही थुंकणाºया ‘डाऊन मार्केट’ लोकांपेक्षा आपणही काही कमी नाही, याची जाणीवही त्यांना नसते!काही दिवसांपूर्वी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान एका खासदारांनी भारत हा थुंकणारा देश आहे, या शब्दात संपूर्ण देशाच्या अब्रूचे धिंडवडे काढले होते. ते म्हणाले होते, ‘‘आम्हाला जेव्हा कंटाळा येतो तेव्हा आम्ही थुंकतो, आम्ही थकतो तेव्हा आम्ही थुंकतो आणि हे असंच सुरू असतं.’’ त्या खासदार महोदयांनी कोणत्याही प्रकारे अतिशयोक्ती केलेली नव्हती. खरोखरच काहीही कारण नसताना नाहक थुंकणारे अनेक लोक आपण रोज आपल्या अवतीभोवती बघत असतो. खेदाची बाब ही आहे, की तसे करताना आपण काही चूक करतोय, हे त्यांच्या गावीही नसते. त्यांच्या अशा वर्तणुकीवर कुणी आपत्ती प्रकट केलीच, तर आपत्ती प्रकट करणारा कुणी परग्रहवासी आहे की काय, अशा प्रकारचे भाव चेहºयावर आणत निर्लज्जासारखे हसून मोकळे होतात. अशा वेळी एखाद्याने पोलिसांकडे तक्रार करायचा विचार केल्यास, पोलीसच त्याची खिल्ली उडवण्यास मागेपुढे बघणार नाहीत आणि स्वत:च पिंक टाकून अशा तक्रारीचा कसा काहीही उपयोग होत नाही, हे समजावून सांगायला लागतील!तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आणल्यास वाट्टेल तिथे थुंकण्याच्या भारतीयांच्या सवयीला बराच आळा बसू शकतो, असे अनेकदा सुचविण्यात येते; मात्र अशा प्रकारे बंदी आणून कोणत्याही पदार्थाच्या सेवनास अटकाव केला जाऊ शकत नाही, हा अनुभव संपूर्ण जगाने घेतला आहे. गुटखा या तंबाखूजन्य पदार्थाचेच उदाहरण घ्या! काय फायदा झाला गुटख्यावर बंदी आणून? उलट माफियांमध्ये गुटखा माफिया ही नवी जमात उदयास आली. दुसरी गोष्ट म्हणजे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांवरील करांमधून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असल्याने सरकारी पातळीवर अशी बंदी आणण्यासाठी पुढाकार घेतला जाण्याची सुतराम शक्यता नाही. तंबाखू हे एक नगदी पीक आहे. अफूप्रमाणे तंबाखूच्या शेतीवर बंदी आणल्यास मोठ्या संख्येतील शेतकºयांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल. शिवाय बºयाच औषधींमध्ये उपयोगी रसायन म्हणून तंबाखूचा वापर होतो. त्यामुळे तंबाखूच्या उत्पादनावरच बंदी आणणे हा उपाय ठरू शकत नाही.या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेप्रमाणे दंडात्मक कारवाई करणे आणि जनजागृती घडवून आणणे हे दोनच उपाय व्यवहार्य दिसतात. दंडात्मक कारवाईमुळे लाचखोर प्रवृत्तीच्या कर्मचाºयांना आणखी एक कुरण उपलब्ध होईल हे खरे; पण किमान सार्वजनिक ठिकाणी तरी थुंकण्यास काही प्रमाणात का होईना अटकाव निश्चितच होईल. भावी पिढ्यांमध्ये जागृती घडवून आणण्याचे लाभ दृष्टीस पडण्यास वेळ लागेल; पण तो लाभ कायमस्वरूपी ठरेल. हल्ली सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत शाळकरी मुलांमध्ये बरीच जागृती दिसून येते. जोडीला तंबाखूचे दुष्परिणाम आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या सवयीमुळे जागतिक पातळीवर आपल्या देशाची प्रतिमा कशी डागाळते, यासंदर्भात शाळकरी मुलांना जागृत केल्यास एक-दोन पिढ्यांनंतर का होईना, फरक निश्चितच दिसू लागेल!

 

टॅग्स :AkolaअकोलाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSocialसामाजिक