शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: पंतप्रधान कार्यालयात सध्या इतकी अस्वस्थता का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 07:33 IST

अरवली पर्वतरांगा प्रकरण आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे परिपत्रक ज्याप्रकारे हाताळले गेले, त्यावरून कारभारातला ढिसाळपणा उघड झाला.

-हरीष गुप्ता (नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली)अरवली पर्वतरांगा प्रकरण आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या परिपत्रकावरून निर्माण झालेला वाद संबंधित विभागांनी योग्य प्रकारे न हाताळल्याबद्दल पंतप्रधानांचे कार्यालय अतिशय असमाधानी असल्याचे कळते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक मंत्रालये आणि विभागांच्या कामगिरीचे व्यापक परीक्षण सध्या चालू आहे.

अरवली प्रकरणात मोदी सरकारवर राजकीय आणि कायदेशीरदृष्ट्या बरीच टीका झाली. २०२५च्या उत्तरार्धात सर्वोच्च न्यायालयाने १०० मीटर उंचीचे नवे सूत्र स्वीकारले. पर्यावरण मंत्रालयाने नेमलेल्या समितीने ते सुचविले होते. मात्र, तसे केल्याने पर्यावरणदृष्ट्या नाजूक असा ९० टक्के भाग खाणकामासाठी मोकळा होईल, असे टीकाकारांचे म्हणणे होते. 

मंत्रालयाने प्रारंभी आपली भूमिका लावून धरली; परंतु सर्वोच्च न्यायालयाने नंतर ते र ते सूत्र स्थगित केले. संस्थात्मक स्तरावर उद्भवलेली अडचण आणि टीकेचा भडिमार झाल्याने केंद्राने अरवली भागात नव्याने खनिकर्मासाठी जागा भाडेपट्ट्यावर देण्याला संपूर्णपणे बंदी घालायला राज्यांना सांगितले.

पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील प्रदेशात अशा प्रकारचे अडचणीचे प्रस्ताव आल्यास पूर्वी पंतप्रधानांचे कार्यालय हस्तक्षेप करत असे. यावेळी मात्र तसे घडले नाही. यामुळे भुवया उंचावल्या गेल्या. 

उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये समता आणण्याच्या दृष्टीने विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे तयार करण्यात आलेल्या २०२६ च्या नियमावलीवरून दुसरा वाद उद्भवला. जातीवर आधारित भेदभावाच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी ही अधिसूचना काढण्यात आली. 

अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय अशा आरक्षित वर्गाला समोर ठेवून हे करताना सर्वसाधारण गटाकडून येणाऱ्या तक्रारीकडे दुर्लक्ष होईल, असा आरोप झाला. देशभर त्याची प्रतिक्रिया उमटली. आधी मंत्रालयाने या नियमावलीचे समर्थन केले. नव्या तरतुदींचा गैरउपयोग होणार नाही असे सांगितले; परंतु पंतप्रधानांच्या कार्यालयाने खुलासा मागितला.

विद्यापीठ अनुदान आयोग ही स्वायत्त संस्था असून, परिपत्रक काढण्यापूर्वी सल्ला घेण्यात आला नव्हता,असा खुलासा करण्यात आल्याचे समजते. स्वाभाविकपणेच उद्भवणारा पुढचा प्रश्न, मग आधी समर्थन का केले? त्यावर पटणारे उत्तर मिळाले नाही. या दोन्ही प्रकरणांमध्ये ढिसाळपणा उघड झाला. विशेषतः पंतप्रधानांचे कार्यालय सध्या या विषयात अधिक लक्ष घालत असताना हे घडले.

'आप'चे गुजरातमधील मनसुबे

हा योगायोग समजा किंवा प्रचाराची नांदी; झाले ते असे-भाजपचे नवनियुक्त प्रमुख नितीन नबीन यांनी अलीकडे गुजरातला भेट दिली. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल त्यांच्याबरोबर होते. नेमके त्याचवेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याबरोबर अरविंद केजरीवाल गुजरातमध्ये आले होते.

नबीन तीन दिवस राहिले तर केजरीवाल दोन दिवस; परंतु या दौऱ्याचे कवित्व दीर्घकाळ चालले. गुजरातमध्ये भाजपचे जवळपास तीन दशकांहून अधिक काळ राज्य आहे; तरी खरी चर्चा सत्तेची नव्हे, तर विरोधी पक्ष म्हणून कोण उभा राहतो याची आहे. 

वर्ष २०२२ मध्ये 'आप'ला १२.९२ टक्के मते मिळाली. आता त्यांची भूक वाढली आहे. हा आकडा २५ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो असे सांगण्यात येते. काँग्रेस पक्षाला फारसे चांगले दिवस न राहिल्याने २०२७ मध्ये आम आदमी पक्ष आपणच भाजपचे मुख्य प्रतिस्पर्धी राहू असे दाखवतो आहे.

केजरीवाल यांचे धोरण स्पष्ट आहे. काँग्रेसला तिसऱ्या स्थानावर ढकला. गुजरातमध्ये 'भाजप विरूद्ध आप' अशी दुहेरी लढत झाली तरी पुष्कळ. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत दुसरा क्रमांक पटकावला तर राज्याचा राजकीय नकाशा बदलेल. काँग्रेस पक्षासाठी हा अस्तित्वाचा प्रश्न आहे. आपल्याला राजकीय आव्हान देणाऱ्याचे रंग बदलत असतात हे भाजपला उमगले तरी पुरे.

नितीश कुमार सारे जाणतात !

आपला घराणेशाहीवर विश्वास नाही असे नितीश कुमार नेहमी म्हणत असतात. ते राजकारणात सक्रिय आहेत तोपर्यंत त्यांचा मुलगा राजकारणाबाहेर राहील असे सांगतात. असे असले तरी पक्षाचा मार्केटिंग विभाग अहोरात्र काम करत असतो. 

पक्षाचे नेते निशांत यांचे नाव संघटनात्मक पद, राज्यसभा इतकेच नव्हे, तर भविष्यातील नेते म्हणून पुढे करत असतात. जे बोलले जाते ते चुकून पण ठरवून, वारंवार पण उत्स्फूर्त असते. मुख्यमंत्री मात्र मौन पाळतात जसा काही हा उत्साहाचा स्वतंत्र उद्रेक असतो.

हीच नितीश यांची खास शैली आहे. जाहीरपणे अगदी साधे, पण खासगीत सगळे काही स्वीकारणारे. बिहारच्या राजकारणात घराणेशाही कशी दिसेल हे ते जाणतात म्हणून मुलाने राजकारणात यायचे नसते. त्याला प्रोत्साहन द्यायचे असते. पिता प्रोत्साहन देत असतो. पुढे करत नसतो तर केवळ पाहतो. यातून मिळणारा संदेश नेमका आहे- वारसा ही महत्त्वाकांक्षा नव्हे, ती सक्तीच आहे! 

केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह, संजय झा हे निशांत कुमार यांनी पक्षात महत्त्वाचे पद स्वीकारावे किंवा राज्यसभेवर जावे, यासाठी उघड प्रयत्न करीत असतात, ते उगीच नव्हे !harish.gupta@lokmat.com

English
हिंदी सारांश
Web Title : Unease in PMO: Ministries under scrutiny for mishandled issues.

Web Summary : PMO dissatisfied with handling of Arvali range, UGC issues. Ministries face performance review after criticism. AAP eyes Gujarat, positioning against BJP. Nitish Kumar subtly promotes son's political future.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानPoliticsराजकारण