शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

विशेष लेख: चला, मंत्री कामाला लागले, मंत्रालयात दिसू लागले!

By यदू जोशी | Updated: January 31, 2025 07:05 IST

भाजपच्या प्रत्येक मंत्र्याकडे रा.स्व.संघाचा एकेक पीए नेमला जात आहे, याचा अर्थ संघाचा वॉचही असेलच. 

यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत |

सरकारच्या कोणत्या ‘हेड’मध्ये किती निधी असतो, तो निधी कसा खेचून न्यायचा, इथपासून प्रशासनातले बारकावे अत्यंत चांगल्या पद्धतीने ठाऊक असलेले दोन आमदार यावेळी मंत्री झाले आहेत. एक प्रकाश आबिटकर आणि दुसरे आशिष जयस्वाल. भाजपचे किसन कथोरे, कृष्णा खोपडेही तसेच आहेत; पण ते मंत्री होऊ शकले नाहीत. ‘नवीन कोणते मंत्री तुम्हाला चांगले वाटतात’ असे काही ‘आयएएस’ सचिवांना विचारले तर त्यांनी आबिटकर, जयस्वाल, शिवेंद्रराजे भोसले, प्रताप सरनाईक, अशोक उईके, आकाश फुंडकर अशी नावे घेतली.  

सध्या खूप चाळणी लावून पीए, पीएस, ओएसडी नेमण्याचे काम सुरू आहे; पण या चाळणीनंतरही सध्या ज्यांना घेतले आहे त्यातील काही चेहरे कोणत्या निकषांवर नेमले हे कळायला मार्ग नाही. प्रतिमेच्या पातळीवर बोंब असलेले काही जण काही मंत्र्यांकडे घुसलेेले दिसतात. पाच-सहा जण तर ‘मी नाही त्यातली अन् कडी लावा आतली’ असे आहेत. मंत्र्यांकडील स्टाफचे खरे रूपही लवकरच  दिसेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शक आणि प्रामाणिक कारभार देणार असे म्हटल्यापासून अगदी संजय राठोडही, ‘आता आपल्याला प्रतिमा जपायची आहे’ असे जवळच्यांना म्हणतात म्हणे! हा मोठाच फडणवीस इफेक्ट म्हटला पाहिजे. ‘मंत्र्यांनी मंत्रालयात आलेच पाहिजे’ असे फडणवीस यांनी बजावल्याचाही परिणाम दिसून येत आहे.  काही मंत्र्यांच्या दालनाची कामे सुरू असल्याने ते  बंगल्यावरूनच कारभार  करत आहेत. पंकज भोयर यांच्यासारखे काही अपवादही आहेत, दालनाचे काम सुरू असले तरी बाजूच्या ‘पीएस’च्या केबिनमध्ये बसून काम करायला त्यांना कमीपणा वाटत नाही. बऱ्याच मंत्र्यांना अजून स्टाफच मिळालेला नाही. त्यामुळे कारभाराला गती नाही; पण एक खरे की, पुढच्या पाच वर्षांतील कारभार ‘वेगळा’ असेल, फडणवीसांचे सीसीटीव्ही ठिकठिकाणी लागलेले असतील. सर्रास बदमाशी कोणालाही करता येणार नाही. बदमाशीचे नवे मार्ग शोधले गेते तर ते बंद करण्याचे आव्हान  फडणवीस यांच्यासमोर असेल. भाजपच्या प्रत्येक मंत्र्याकडे रा.स्व.संघाचा एकेक पीए नेमला जात आहे, याचा अर्थ संघाचा वॉचही असेलच. 

शिंदेंची जादू कायमएकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, ते उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्या या पदावनतीमुळे त्यांचा करिष्मा मात्र कमी झालेला दिसत नाही. उद्धवसेनेचे नेते, आजी-माजी लोकप्रतिनिधी शिंदेंकडे जात आहेत. शिंदेंंकडे आता पूर्वीप्रमाणे देण्यासारखे फार नसल्याने उद्धवसेनेची माणसे फोडणे त्यांना जमणार नाही असे म्हटले जात होते; पण शिंदेंनी त्यांचा करिष्मा कायम असल्याचे दाखवून दिले आहे. उपमुख्यमंत्री म्हणूनही ते माहोल करू शकतात; पण गतकाळातील मुख्यमंत्रिपदात अजूनही अडकून का पडले आहेत, माहिती नाही! मध्यंतरी ते मंत्रिमंडळ बैठकीसाठी आले नाहीत म्हणून काही माध्यमांनी ते अतिशय नाराज असल्याच्या बातम्या पसरविल्या. त्या दिवशी मौनी अमावास्या होती. शिंदेंसाठी अमावास्या, पौर्णिमेचे महत्त्व वेगळे आहे. 

चर्चा आहे, पुढे काय होईल? उद्धवसेनेचे काही खासदार भाजपमध्ये जाणार अशी चर्चा आहे. या पक्षाचे नऊपैकी सहा खासदार भाजपच्या गळाला लागू शकतात, त्यातल्या पाच जणांची जमवाजमव झाली आहे; पण पक्षांतरबंदी कायद्यातून वाचायचे तर सहा जणांनी पक्षांतर करायला हवे म्हणून जरा अडले आहे, अशी चर्चा सध्या जोरात आहे. काही भेटीगाठी, बोलचालही झाली म्हणतात. याला आधार काही नाही, चर्चा फिरत राहते. चर्चेचे कच्चे फळ एखाददिवशी पिकूही शकते. विरोधकांचे खासदार आपल्या मित्रपक्षांमध्ये जाण्याऐवजी आपल्याचकडे यावेत, असा भाजपचा प्रयत्न असणार. शेजारच्या अंगणातील फुले आपल्या अंगणात पडत असतील तर ते कोणाला नाही आवडणार?   

संतोष पाटील आणखी हवेत..मंत्रालयात सहकार विभागात अपर निबंधक व सहसचिव असलेले संतोष पाटील. मूळचे पश्चिम महाराष्ट्रातले. अवलिया माणूस. डबघाईला आलेली वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रुळावर आणण्यासाठी ते डिसेंबर २०२३ पासून महिन्यातून चार दिवस वर्धेला जातात. तेव्हाचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी बँकेच्या कारभारासाठी नेमलेल्या संनियंत्रण समितीत पाटील यांना सदस्य केले आणि एकप्रकारे बँकेचे पालकत्व त्यांना दिले. या बँकेच्या अधिकाऱ्यांच्या पहिल्याच बैठकीत पाटील यांनी स्वत:ची ५० हजार रुपयांची ठेव या बँकेत ठेवली. आज १८०० नवीन खातेदारांनी साडेअकरा कोटींच्या ठेवी बँकेला दिल्या आहेत. १२ वर्षे बंद असलेले पीककर्ज वाटप आस्ते-आस्ते, पण सुरू झाले आहे. ११३ वर्षे जुनी असलेली ही बँक कात टाकत आहे.  एका संतोष पाटलांनी हे करून दाखवले, असे आणखी संतोष पाटील असायला हवेत ना!

टॅग्स :Mantralayaमंत्रालयMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार