शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कोणाला किती ‘डाळिंबं’, किती ‘शर्ट’ मिळाले?

By यदू जोशी | Updated: December 17, 2021 08:08 IST

विधान परिषद हे ज्येष्ठांचं सभागृह. इथले  सदस्य पूर्वी सरस्वतीच्या वाटेनं यायचे, आता लक्ष्मीचं बोट धरून येतात ! जो तो "पाकिटा"च्या रांगेत उभाच!

यदु जोशी, वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत

पूर्वी भाजपला साडेतीन टक्क्यांचा पक्ष म्हणायचे. ते वेगळ्या अर्थानं. सध्याच्या राजकीय परिस्थितीत चार आण्याचा पक्ष म्हणतात. समोर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची बारा आण्याची महाविकास आघाडी आहे. परवाच्या विधान परिषद निवडणुकीत चार आणे हे बारा आण्यावर भारी पडल्याचं दिसलं. भाजपचे एक नेते म्हणाले, ‘‘राज्यातील जनतेत राज्य सरकारबद्दल असलेली नाराजी या निकालात दिसली.’’ - कठीण आहे, कोणी काहीही बोलू शकतं. 

सरकारबद्दलच्या नाराजीचा अन् या निवडणुकीचा काय संबंध होता?- लक्ष्मी दर्शन हा या निवडणुकीचा गाभा होता. लक्ष्मीकांत-प्यारेलालचं संगीत दोन्ही बाजूंनी चाललं .. ज्याचं संगीत जोरात वाजलं ; मतं त्यांच्या बाजूनं गेली. पैशांसमोर पक्षनिष्ठा पार गुंडाळली जाते. कोणताही पक्ष त्याला अपवाद नाही. ‘राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी मी’ हे ब्रीदवाक्य असणारेही पाकिटाच्या रांगेत उभे होते अन् तेही स्वत:च्या घरासमोर.  नागपूर, अकोल्यातील  परवाच्या निवडणुकीत आपल्याच पक्षाच्या उमेदवाराकडून ‘गांधीजी’ घेणारे बहुतेक सगळेच होते. ‘गाव को बांटते, और हम को डांटते क्या?’ अशी तक्रार काहीजण नागपुरात करत होते म्हणतात. 

अकोल्यात हरले त्यांच्याकडून ‘‘तीन’’चा अन् जिंकले त्यांच्याकडून ‘‘चार’’चा रेट होता अशी चर्चा आहे.  दोन्हीकडून माल घेऊन एकाला मत देणारे महाभागही होते. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेली ही निवडणूक असते. लोकसभा, विधानसभा निवडणुकीला पै-पैशाचा हिशेब मागणारा निवडणूक आयोग या निवडणुकीत ‘‘गांधारी’’ कसा काय बनतो?, मानलं की, या निवडणुकीत खर्चाची मर्यादा नसते पण, त्याचा अर्थ कोट्यवधी रुपयांची लाच मतांसाठी देणं कोणत्या आचारसंहितेत बसतं याचाही विचार झाला पाहिजे. एक लाखासाठी एक पेटी अन् एक कोटीसाठी एक खोका असे शब्दप्रयोग पूर्वी केले जात ; पण, हे शब्दही चौकशीच्या रडारवर आल्यापासून आता एक डाळिंब-शंभर डाळिंब, एक शर्ट-शंभर शर्ट असे शब्दप्रयोग होतात. मग, परवा कोणाकोणाला किती डाळिंबं मिळाली?, निकालानंतर काही नेत्यांनी अर्थपूर्ण व्यवहारांचे आरोप केले पण, कोण कोणाची चौकशी करणार?, हमाम मे सब नंगे है !! विधान परिषद हे ज्येष्ठांचं सभागृह. या सभागृहाचे सदस्य पूर्वी सरस्वतीच्या वाटेनं यायचे, आता लक्ष्मीचं बोट धरुन येतात.

महाआघाडीची डोकेदुखी वाढलीविधान परिषद निवडणुकीच्या निकालानं महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवली आहे. हा विषय केवळ या निवडणुकीपुरता नाही. पैसा तर, चाललाच पण, भाजपवाल्यांनी लढताना स्पिरिट दाखवलं. ते महाविकास आघाडीत दिसलं नाही. काहीही झालं तरी चालेल पण, महाविकास आघाडीची मत फुटताच कामा नये अशी ईर्षा कुठेही नव्हती. मित्र पक्षांच्या लोकप्रतिनिधींची मतं एकमेकांना ट्रान्सफर होत नसतील तर, त्या पक्षांना मानणाऱ्या मतदारांची मतं कशी ट्रान्सफर होतील?, पंढरपूर, देगलूरमध्ये हाच अनुभव आला. 

उद्या उत्तर कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीतही तोच अनुभव येईल.  गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रानं जबरदस्त ‘पॉलिटिकल डान्सिंग’ अनुभवलं. वर नेते एकत्र बसले आहेत पण, तिघांच्या मतदारांचं एकत्र बसण्याबाबत मतैक्य झालेलं नाही. महाविकास आघाडी सरकारला धोका नाहीच पण, सरकार वेगळं अन् तीन पक्ष वेगळे. सरकारमध्ये एकत्रित असताना आपापली स्पेस वाढविण्याच्या नादात तीन पक्षांमध्ये ठिणग्या पडत राहतील. एकाच खोलीत तीन पक्षांना सामावून घेण्याच्या प्रयत्नात हाऊसफुल्ल होईल अन्  त्याचा फायदा भाजप घेत राहील.

अध्यक्षांची निवड होणार का? काँग्रेसचे पुणे जिल्ह्यातील आमदार संग्राम थोपटे यांना काँग्रेसचे आमदार, मंत्री, ‘या अध्यक्ष महाराज’ असं म्हणतात. थोपटे विधानसभा अध्यक्ष होणार असं बरेच जण धरून चालताहेत, पण, मुहूर्त काही निघत नाही. आता २२ डिसेंबरपासून सुरू  होणाऱ्या अधिवेशनात मुहूर्त सापडणार असं वाटतं. थोपटेना संधी मिळेल अशी शक्यता अधिक आहे पण, काँग्रेसमध्ये काही सांगता येतं का?, गाडीत बसून तिकीट काढल्यावर अन् गाडी सुरू झाल्यावरच समजायचं की, आपण गावाला चाललो. आवाजी मतदानानं निवडणूक घेण्याचं ठरलंच आहे, त्यामुळे आता कोणताही धोका नाही. सरकारही मजबूत आहे. एवढी अनुकूल स्थिती असतानाही अध्यक्षांची निवड लांबली तर, सरकार शिवसेना-राष्ट्रवादीच चालविते या चर्चेला बळ मिळेल.

जाता जाता :महाराष्ट्रातील बड्या नेत्यांनी दिल्लीत अलीकडे  काँग्रेस श्रेष्ठींच्या ज्या गाठीभेटी घेतल्या त्यात शिवसेनेच्याच एका नेत्याला मुख्यमंत्री करण्याचा उद्देश होता अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. खरंखोटं माहिती नाही; पण, उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला बळ दिलं जात आहे. शिवसेनेत असलेल्या पण, आपल्या मर्जीतील नेत्याला पुढे करण्याचे मनसुबे आहेत असंही म्हणतात. मंत्र्यांवरील आरोपांनी प्रतिमा डागाळलेल्या सरकारचा सोज्वळ चेहरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच आहेत. त्यांचा संयम महाराष्ट्राला भावतो. ते दमदारपणे पूर्वीच्याच उत्साहानं नक्कीच परततील. ते उत्तम फोटोग्राफर आहेत, सध्या छुप्या काही हालचाली सुरू असतील तर, त्या त्यांचा कॅमेरा नक्कीच टिपत असेल.

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा