शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

विषकन्यांचा विळखा कसा सुटावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 09:59 IST

शत्रू राष्ट्रातील अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या महिलांच्या हाती आता दहशतवादी गटांनी शस्त्रे देणे सुरू केले आहे.

रवींद्र राऊळ,उपवृत्त संपादक, लोकमत, मुंबई

राजे-रजवाड्यांच्या काळात शत्रू देशाच्या राजाला संपविण्यासाठी विषकन्या तयार केली जायची, असे उल्लेख कथांमध्ये वाचायला मिळतात. विष पाजून तयार केलेल्या या मुलींच्या जागी आता दहशतवादी कारवाया साकार करणाऱ्या फिदायीन अवतरल्या आहेत. महिलांचे टेरर कनेक्शन हा गेल्या काही वर्षांपासून एक चर्चेचा विषय आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागातून सुमारे ३०० मुलींना मध्य पूर्व देशांच्या मार्गे पाकिस्तानात पाठविण्यात आल्याचा संशय केंद्रीय यंत्रणांना असल्याचे वृत्त अलीकडेच प्रसिद्ध झाले आहे. या मुलींना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्याच्या धोकादायक  शक्यतेने गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

दहशतवादी कृत्यांमध्ये महिलांच्या सहभागाचा प्रकार जुनाच आहे. पंतप्रधानपदी असताना राजीव गांधी यांची धनू या महिलेने मानवी बॉम्ब बनून त्यांची हत्या केली, त्याला आता तीस वर्षे उलटून गेलीत. धनूसोबत त्या हत्येत सहभागी असलेली नलिनी सुद्धा पकडली गेली. लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम या दहशतवादी संघटनेतील महिलांच्या त्या कृत्याने अवघे जग भयचकित झाले होते.

१५ जून २००४ रोजी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे राहणारी १९ वर्षीय इशरत जहां आणि अन्य तिघेजण गुजरात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाले होते. त्या तिघांपैकी दोघेजण पाकिस्तानी नागरिक होते. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट ते रचत होते,  असा पोलिसांचा आरोप होता. इशरत जहांच्या सहभागामुळे ती घटना अधिक चर्चिली गेली. पण ती चकमक वादग्रस्त ठरली. हायकोर्टाने नेमलेल्या विशेष चौकशी पथकापासून सीबीआयसह तीन वेगवेगळ्या यंत्रणांनी ती चकमक बनावट होती, असे आपल्या अहवालात नमूद केले होते. त्या प्रकरणातील आरोपी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची त्यानंतर सतरा वर्षांनी न्यायालयाने सुटका केली. ‘इशरतच्या निरपराधपणाचा काही पुरावा नाही. ती लष्कर-ए-तोयबाची आतंकवादी होती, असा गुप्तचर खात्याचा अहवाल नाकारला जाऊ शकत नाही,’ असे न्यायालयाने मूद केले. नेमके काय घडले होते, याबाबत आजही उलटसुलट चर्चा रंगते.

सिरियातील नागरी युद्धात सहभागी होण्यासाठी भारतातून गेलेल्या तरुणांची संख्या काही कमी नव्हती. विशेष म्हणजे त्यात काही तरुणींचाही समावेश होता. तेथे त्या तरुणींवर झालेल्या अत्याचारांच्या कहाण्या सांगितल्या गेल्या. जम्मू-काश्मीरमध्ये सतत अशांतता राहावी यासाठी पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संघटनेकडून गेल्या अनेक वर्षांपासून महिलांना चिथावणी देण्याचे असे प्रयत्न करण्यात येतात. एकूणच धर्म, देश, समाज याबाबत असलेले चुकीचे दृष्टिकोन आणि वेगवेगळ्या गैरसमजांचा पगडा असलेल्या युवती  दहशतवादी संघटनांसाठी सॉफ्ट टार्गेट असतात, हे आतापर्यंतच्या अनेक घटनांवरून स्पष्ट झालेय. यातील काही मुलींना पकडण्यात यश आल्यानंतर तपास यंत्रणांकडून त्यांचे समुपदेशनही करण्यात आले.

हे झाले भडकवून दहशतवादी कृत्यांसाठी तयार केलेल्या भारतातील महिलांविषयी. मात्र, त्याचबरोबर किंबहुना त्याहून अधिक घातक ठरत आहेत त्या  पाकिस्तानच्या आयएसआय गुप्तचर संघटनेने तयार केलेल्या विषकन्या. घातपाती कारवायांऐवजी या विषकन्यांना  हनी ट्रॅपचे पद्धतशीर प्रशिक्षण देऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलातील शिपायांपासून ते अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी जुंपले जाते. या कामासाठी आयएसआयने पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर कॉल सेंटर्स उभारले आहेत. तेथील मुली अहोरात्र साेशल मीडियाच्या माध्यमातून भारतातील महत्त्वाच्या पदांवर काम करणाऱ्या व्यक्तींशी संपर्क करतात आणि मैत्रीचे नाटक वठवून येथील गुपिते जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. त्या मुली भारतातीलच असल्याचे भासविण्यासाठी भारतातील दृश्यांप्रमाणे देखावेही त्या कॉल सेंटरमध्ये व्हिडिओ कॉलिंगसाठी उभारले जातात आणि त्या माध्यमातून जाळे टाकले जाते.

दहशतवादी कृत्यांसाठी मुली पाकिस्तानात नेण्याचे वृत्त ताजे असतानाच एका पाकिस्तानी महिला हेरासोबत संवेदनशील माहिती शेअर केल्याच्या आरोपावरून संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) लॅबमधील एका इंजिनिअरला अटक केल्याचे वृत्त धडकले आहे. देशाच्या क्षेपणास्त्र विकासाबाबतची गोपनीय माहिती त्याने या महिलेला दिल्याचा आरोप आहे. आपल्या फेसबुक प्रोफाइलमध्ये त्याने डीआरडीओसाठी काम करत असल्याचा उल्लेख केल्याने त्या महिलेने त्याच्याशी संपर्क वाढविला होता. या एका घटनेवरून त्यांच्या कारवायांची कल्पना यावी.

जैसलमर येथील लष्करातील सोमवीर या जवानाला अनिता चोप्रा असे नाव सांगणाऱ्या महिलेने याचप्रकारे हनी ट्रॅपमध्ये अडकवले होते. जम्मू येथून  त्याला येणाऱ्या फोनवर गुप्तचर विभागाने नजर ठेवली, तेव्हा त्याला फेसबुकवर आलेल्या रिक्वेस्टची आयडी कराचीतील असल्याचे आढळले. पुढील सखोल तपासात त्या आयडीवरून आणखी ५० जवानांशी संपर्क साधण्यात आला होता, असे स्पष्ट झाले. 

सोशल मीडियावर वावरताना देशाच्या संरक्षणविषयक गोपनीय माहिती असलेल्या अधिकाऱ्यांकडून कळत नकळत होणारा हलगर्जीपणा संपूर्ण  देशाला महागात पडू  शकतो. स्खलनशील स्वभावाच्या व्यक्तींच्या उपद्व्यापांमुळे देशाची सुरक्षितता धोक्यात येऊ शकत असल्याने तंत्रज्ञानाची मदत घेऊन हनी ट्रॅपचा विळखा दूर करण्याची गरज निर्माण झाली आहे. ravindra.rawool@lokmat.com

टॅग्स :honeytrapहनीट्रॅपTerrorismदहशतवाद