शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

सोलापुरी ‘लॉक’ची ‘पॉवर की’...

By सचिन जवळकोटे | Updated: July 19, 2020 06:52 IST

लगाव बत्ती...

- सचिन जवळकोटे

गेल्या वर्षी लोकसभा निकालानंतर ‘घड्याळा’ला लागलेल्या गळतीचं ‘कुलूप’ तोडण्यासाठी सप्टेंबरमध्ये ‘थोरले काका बारामतीकर’ संघर्षाची भली मोठी ‘चावी’ घेऊन सर्वप्रथम सोलापूरला आलेले. त्यानंतर तब्बल दहा महिन्यांनी ते पुन्हा एकदा तसलीच ‘चावी’ घेऊन आज सोलापुरात येत आहेत. इथल्या बाजारपेठेला तसंच त्यांच्या ‘घड्याळा’लाही लागलेलं ‘कुलूप’ ते नक्कीच उघडतील, ही भाबड्या सोलापूरकरांना आशा.

कुलूप का गंजलं ?

1) पश्चिम महाराष्ट्रात पुण्यानंतर सर्वाधिक पेशंटची संख्या सोलापुरातच. आज तर ‘पंच हजारी’चा मानही पटकाविला आपल्या जिल्ह्यानं. याची लाख कारणं सांगितली जात असली तरी खरी गोची खूप कमी लोकांच्या लक्षात आलेली. एकीकडं लोकांना कंट्रोलमध्ये ठेवणं अन् दुसरीकडं प्रशासकीय यंत्रणा अधिकाधिक वेगानं हलविणं, या दोन्ही पातळीवर जिल्हा पूर्णपणे कमी पडला, हे खुद्द कैक अधिकारी-पदाधिकारीच करतात कबूल.

2) सोलापूरच्या कारभा-यांमध्ये सात-आठ महिन्यांपूर्वीच बदल झालेला. झेड.पी. अन् पालिकेपासून कलेक्टरपर्यंत सारेच प्रमुख अधिकारी नवीन आलेले. ते अद्याप सेटल होत नाहीत, तोपर्यंत ही रोगराई येऊन ठेपलेली. बहुभाषिक सोलापुरी जनतेला कशा पद्धतीनं हॅन्डल करायचं असतं,  हे या प्रमुखांच्या लक्षात येईपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेलेली. पूर्वीच्या अधिका-यांचं आपसात जे ‘परफेक्ट बॉँडिंग’ झालं होतं, ते इथं कुठंच दिसलं नाही. प्रत्येक जण आपापल्या परीनं उगाच इकडं-तिकडं चाचपडत राहिला. कंट्रोल सुटलेली जनताही अशीच भरकटत गेली.

3) पुण्यात अधिका-यांना नेमकी दिशा दाखविणारे ‘धाकटे दादा बारामतीकर’ तिथल्या पेठेतच ठाण मांडून बसलेले. तसल्या दमदार नेतृत्वाचाही इथं दुष्काळ. सत्तेवर असलेले काही आमदार अजूनही पक्षात स्वत:ला परकंच समजत असलेले, तर सत्तेवर नसलेले काही  बहाद्दर केवळ पत्रकं काढण्यातच रमलेले. राहता राहिले, इंदापूरचे पालकमंत्री. ते बिच्चारे इथल्या विस्फोटावर फुंकर मारण्यापेक्षा ‘वन डे टूर’चे हेलपाटे करूनच दमलेले.

आता गरज ‘मास्टर की’ची !

‘थोरले काका बारामतीकर’ सीएम असताना किल्लारी-सास्तूरला विनाशकारी भूकंप झालेला. हजारो गेलेले. लाखो उद्ध्वस्त झालेले. त्यावेळी कैक दिवस ‘थोरले काका’ सोलापूरच्या ‘रेस्ट हाऊस’मध्येच मुक्काम ठोकून राहिलेले. एका फोनवर अख्खं मंत्रालय त्यांनी इथंच कामाला लावलेलं. जणू राजधानीच इथं वसलेली. सोलापूर, लातूर अन् उस्मानाबादचं ‘आपत्ती व्यवस्थापन’ इथूनच हलविलं गेलेलं. ते इथं मुक्कामी राहिले, म्हणूनच तीन जिल्ह्यातल्या बेघर जनतेला झटपट मदत लाभलेली.

१९९३ च्या घटनेची आठवण पुन्हा एकदा करून देण्याची गरज सध्या निर्माण झालेली. पूर्णपणे सैरभैर झालेल्या सोलापुरी यंत्रणेला योग्य ती दिशा देण्याचं काम करू शकतात, ते केवळ ‘थोरले काका’च; कारण त्यांच्याएवढी कुणालाच सोलापूरची नाडी सापडलेली नसावी. इतर शहरांप्रमाणे दहा-दहा दिवस अख्खी तीस-तीस गावं बंद ठेवणं, इथल्या गरीब लोकांसाठी न परवडणारं, हे ठासून सांगू शकतात केवळ तेच. दिवसभर राबलं तरच रात्रीची चूल जिथं पेटते, तिथल्या लाखो कामगारांना इतके दिवस उपाशीपोटी घरी बसविणं अशक्य, हेही पटवून देऊ शकतात केवळ तेच. कदाचित त्यांना पुढच्या उद्रेकाची जाणीव झाली असावी म्हणूनच आज बंद कुलपाआडच्या सोलापुरात येत असावेत ते. आपली हुकुमी ‘पॉवर की’ घेऊन. लगाव बत्ती.

‘बंद घड्याळा’लाही हवीय ‘चावी’

एकीकडं ‘विषाणू’च्या आपत्तीनं सोलापूरला कुलूप लागलेलं, दुसरीकडं ‘गळती’च्या ‘व्हायरस’नं इथल्या ‘घड्याळा’चीही टिकटिक मंदावलेली. यात पुन्हा सारा कारभार ‘बळीरामकाकां’च्या थरथरत्या हातात. बिच्चारे घरी नातवंडांसोबत बसून ‘भजन-कीर्तन’ करत होते, तर गेल्या निवडणुकीत ‘पार्टीची गरज’ म्हणून त्यांना बळंबळंच अध्यक्षपदाच्या घोड्यावर बसविलेलं. मात्र त्यांच्यासोबत दिलेला ‘नरखेडचा वारू’ भलताच उधळलेला. नाकापेक्षा मोती जड झालेला. अशातच वडाळ्याच्या या ‘काकां’नी आता ‘टॅम्प्लीज’ची भूमिका घेतलीय. त्यामुळं नवा अध्यक्ष आणायचा कोठून हा प्रश्न निर्माण झालेला. ‘अकलूजचे पाटील अन् सोलापूरचे देशमुख’ यांना टफ देऊ शकणारा खमक्या नेताच पार्टीसाठी गरजेचा.. अन् दुर्दैवानं सध्या तरी तशा व्यक्तिमत्त्वाचीच वानवा. कधीकाळी अर्धा डझन लोकप्रतिनिधी देणा-या या जिल्ह्यात ‘घड्याळ’वाल्यांचं नेतृत्व करायला भेटतील खूप; परंतु तो तसा तेवढा निष्ठावानही हवा नां. नाही तर ‘दीपकआबां’सारखे कैक ‘कोलांटउडी’पटू अजूनही पक्षात आहेतच की. असो. ‘घड्याळा’च्या कुलपाची ‘डुप्लिकेट चावी’ही ‘थोरल्या काकां’कडं नक्कीच असावी. बार्शी अन् करमाळ्याच्या ‘घरवापसी’ची चर्चा उगाच सुरू झाली नसावी. याचीच चाचपणी करण्यासाठी परवा खास हेलिकॉप्टरनं  ‘जयंतदादा’ आलेले ना. लगाव बत्ती...

जाता-जाता : निवडणुकीपूर्वी पार्टी सोडून जाण्याच्या ‘चुका’ अनेकांनी केल्या म्हणून इथल्या स्थानिक नेतृत्वाला कधीच ‘पालक’पद देणार नाही का ? अशीही कुजबूज कार्यकर्त्यांमध्ये. जिल्ह्यात सध्या इन-मीन तीन आमदार. मात्र वेशभूषा बदलावी तशी दर निवडणुकीला पार्टी बदलणा-या ‘भारत नानां’बद्दल ‘काकां’ना खात्री वाटायला हवी. पाचवेळा आमदारकी भोगूनही सहाव्यांदा ‘भगवी वाट’ चोखाळण्याचा विचार करणा-या ‘दादा निमगावकरां’वर विश्वास वाढायला हवा. आता राहता राहिले ‘इंदापुरी मोहोळकर’. ते तर ‘अनगरकरां’च्या रिमोटवर ‘यशवंत टूर्स अँड ट्रॅव्हल्स बस’ चालविण्यातच मग्न. म्हणूनच कदाचित  हक्काच्या पालकत्वापासून आपला जिल्हा पोरका जाहला असावा. त्यामुळं का होईना ‘पॉवर की’ घेऊन ‘थोरले काका बारामतीकर’ सोलापुरी येऊ लागले, हेही भाग्य नसे थोडके. लगाव बत्ती..

( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरPoliticsराजकारणSharad Pawarशरद पवारJayant Patilजयंत पाटीलRajesh Topeराजेश टोपेcorona virusकोरोना वायरस बातम्याNCPराष्ट्रवादी काँग्रेस