शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

भावकीचा नादच खुळा.. ..भाऊबंदकीचा खुळखुळा !

By सचिन जवळकोटे | Published: December 02, 2018 1:47 AM

अकलूजपासून अक्कलकोटपर्यंत सर्वत्र वारसदारांचीच चलती.

- सचिन जवळकोटेजिल्ह्याच्या राजकारणाला तसा घराणेशाहीचा खूप जुना लळा. अकलूजपासून अक्कलकोटपर्यंत सर्वत्र वारसदारांचीच चलती. जिकडं-तिकडं भावकीचा नादच खुळा...परंतु सत्तेची चटक लागलेल्या घराण्यांमध्ये सुरू होतो सत्तेचा संघर्ष. रस्त्यावर येऊन पोहोचतो अंतर्गत कलहाचा थयथयाट; तेव्हा पुरता वाजतो भाऊबंदकीचा खुळखुळा.केवळ सत्तेचा आटापिटा नव्हे.... एकमेकांंना संपविण्याचा सुडाग्निशंकरची निवडणूक झाली. निकाल लागला. थोरले दादा अकलूजकर यांच्या ताब्यात अखेर बंद कारखाना गेला. धाकट्या दादांनीही जगज्जेत्याच्या आवेशात फाटक उघडलं. बंद मशिनरी बघितली. दोन्ही दादांचा परिसस्पर्श झाल्यामुळं कारखाना लवकरात लवकर सुरू होईल, ही सभासदांची भाबडी आशा.. मात्र यंदाचा हंगाम गेलाच म्हणायचा.या कारखान्यात पुढच्या वर्षाची तयारी आत्तापासूनच करावी लागेल. देणेकऱ्यांची धूळ झटकावी लागेल. मशिनरीचं ओव्हर आॅईलिंग करावं लागेल. हे होईल तेव्हा होईल,धाकट्या दादांचं ह्यराजकीय ओव्हर आॅईलिंग मात्र परफेक्ट झालं म्हणायचं. लोकसभेला इतर विरोधकाचं कांडकं पाडायला हा कारखाना कामाला आला की राव...कारण याचे सारे सभासद माढा लोकसभा मतदारसंघातच विखुरलेले नां..कधी काळी अख्ख्या जिल्ह्यावर हुकूमत गाजविणाºया अकलूजकरांची आजची राजकीय अवस्था एका वेगळ्या वळणावर. पूर्वी अकलूजमध्ये साधी टाचणी पडली तरी सोलापूरच्या झेडपीत जणू भूकंप व्हायचा. साºया पंचायत समित्या हादरून जायच्या, परंतु बाहेरून अभेद्य असलेल्या याच शिवरत्नशाहीत माजली रक्ताच्या नात्यातल्या द्वेषाची बेबंदशाही. बुलंद राजवाड्याला आतूनच गेले तडे. त्याचाच परिपाठ म्हणजे शंकरच्या रणांगणात खालच्या पातळीवर जाऊन केले गेलेले हिणकस आरोप-प्रत्यारोप. एकमेकांच्या भ्रष्टाचाराची लक्तरं अकलूजच्या वेशीवर मांडण्याची जहाल ईर्षा पाहून पुरता हबकला जिल्हा... कारण हा नव्हता केवळ सत्ता मिळविण्याचा आटापिटा. हा तर होता एकमेकांना राजकारणातून कायमचं संपविण्याचा सुडाग्नी.अण्णा की दादा ? अक्कलकोटमध्ये कार्यक्रम कॅन्सलराजकीय दुश्मनी निवडणुकीपुरतीच असावी, हा एक सामाजिक सभ्यतेचा संकेत. निकाल लागल्यानंतर विजेत्या विरोधकाला गळामिठी मारून त्यांचं कौतुक करण्याची पद्धत आपल्या सोलापूर जिल्ह्यात तशी फार जुनी. अगदी गेल्या लोकसभेला सातव्या फेरीचा ट्रेंड लक्षात येताच सुशीलकुमारांनीही म्हणे खासदार वकिलांचा मोबाईल नंबर हुडकून त्यांना स्वत:हून कॉल केलेला. अभिनंदन करून दिलदार राजकारणाचं दर्शन घडविलेलं; मात्र अशी दिलदारी आता बहुतांश ठिकाणी लोप पावत चाललीय.आता अक्कलकोटचंच उदाहरण घ्या नां. जुना शत्रू तर सोडाच, नवा तयार होणारा विरोधकही डोळ्याला खुपेनासा झालाय. इथल्या रोटरीनं एक आरोग्य शिबिराचं प्लॅनिंग केलेलं. त्यांनी सत्ताधारी पार्टीचे नेते म्हणून सचिनदादांना बोलावून आपल्या कार्यक्रमाचं कल्याण करण्याचं ठरविलं. त्यानंतर ते आमदार म्हणून सिद्धारामअण्णांकडं गेले. मात्र, ह्यपत्रिकेत एकाचंच नाव पाहिजे.समोरच्यांना बोलाविणार असेल तर मला बोलावू नका, असं अण्णांनी निक्षून सांगताच, संयोजक दचकले...जाम टरकले. शेवटी काय झालं, माहितीय का? कार्यक्रमच कॅन्सल झाला. अक्कलकोटमध्ये असे अनेक सोहळे परस्परच गायब का होऊ लागलेत.बार्शी अन् माढ्यातली दुश्मनी डेंजरचबार्शीतली खानदानी दुश्मनी तर अख्ख्या महाराष्ट्राला परिचित. दिलीपरावांच्या जिभेत जेवढी ऊर्जा, तेवढीच राजाभाऊंच्या हातात ताकद. एक सरस्वतीत माहीर तर दुसरा लक्ष्मीत तगडा. एकानं आमदारकी मिरवावी, तर दुसºयानं पालिका-बाजार समिती पटकवावी. त्यामुळंच प्रत्येक ठिकाणी दोघांमध्ये घमासान. अनेक ठिकाणी बरोबरीचा सामना. दोघांमधून विस्तू जाण्याची कदापिही शक्यता नाही. चुकून-माकून एकाच स्टेजवर आल्यावर एकमेकांना नमस्कार करण्याचीही इथं परंपरा नाही. एकमेकांशी तोंडदेखलं बोलण्याचीही रितभात नाही. मात्र, अलीकडच्या काळात नाही म्हणायला आपल्या भाषणात एकमेकांचा उल्लेख करायला तरी सुरुवात झालीय. आयुष्यभर एकमेकांना नावं ठेवणारी मंडळी एवढं तरी नाव घेताहेत, हेही नसे थोडके. असो. उद्यापासून सुधीरभाऊ म्हणे पाण्यासाठी उपोषणाला बसताहेत. यातून त्यांचं वजन किती कमी होईल माहीत नाही; परंतु सोबतीला असणाºया आयर्नचं राजकीय वजन वाढणार हे निश्चित. डाएटींगचाच संदर्भ या राजकीय उपोषणाला द्यायचा असेल तर योगेश यांनीही पुन्हा राजकारणात सक्रिय होऊन या ठिकाणी बसायला हरकत नाही. असो. अकलूज-मोहोळनंतर तिसºया पिढीला राजकारणात उतरविणारं गाव म्हणजे बार्शी. पाहू या...भविष्यात बाकीचे तालुके काय करतात ? तोपर्यंत आपलं काम चालूच...लगाव बत्ती !माढा तालुक्यातली राजकीय दुश्मनी तशी पिढ्यांनुसार बदलणारी. एकेकाळचे मित्र अर्थात् दोन संजय आता एकमेकांचं तोंडही बघत नसले तरी जुन्या पिढीला याच्याशी काही देणं-घेणं नसावं. नुकत्याच माढ्यात झालेल्या एका विवाह सोहळ्यात बबनदादा अन् कोकाटेंचे संजयबाबा एकत्र बसलेले. दुसरीकडं अरणचे शिवाजी अन् माढ्याचे चवरे यांच्यासोबत चक्क संजयमामा बसलेले. हे पाहून इकडं कोकाटेंनी बबनदादांना मारली कोपरखळी, ह्यबघाऽऽ दादा बघाऽऽ जुनी स्वाभिमानी गँग पुन्हा एकत्र येऊ लागलीय. जाता का तुम्हीपण तिकडं ? हे ऐकून बबनदादा शांतपणे हसत उत्तरले, ह्यत्यांना काय करायचं ते करू दे, मी आपला इथंच बरा आहे ! याचा अर्थ, जुन्या स्वाभिमानी गँगकडून बबनदादांना कसलीच भीती नसावी किंवा कुंपणापर्यंतच धाव घेऊ शकणाºया रंग बदलणाºया सरड्यांवर विश्वास तरी असावा. असो... समजलं तर ठीक. नाहीतर लगाव बत्ती !( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :Solapurसोलापूर