शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

संथ प्रवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 12:21 AM

जलशास्त्र अभियांत्रिकीमध्ये पाण्याचा प्रवाह मुख्यत: दोन भागांत विभागला जातो. एक म्हणजे संथ प्रवाह ज्याला लॅमिनार फ्लो असे म्हणतात. दुसरा प्रवाह म्हणजे प्रक्षुब्ध प्रवाह ज्याला टरबुलंट फ्लो असे म्हणतात. संथ प्रवाह म्हणजे तो लयबद्ध पद्धतीने वाहतो.

प्रा. डॉ. संदीप ताटेवारजलशास्त्र अभियांत्रिकीमध्ये पाण्याचा प्रवाह मुख्यत: दोन भागांत विभागला जातो. एक म्हणजे संथ प्रवाह ज्याला लॅमिनार फ्लो असे म्हणतात. दुसरा प्रवाह म्हणजे प्रक्षुब्ध प्रवाह ज्याला टरबुलंट फ्लो असे म्हणतात. संथ प्रवाह म्हणजे तो लयबद्ध पद्धतीने वाहतो. पाण्याचा प्रत्येक कण एकामागून एक संथगतीने वाहतो. एका थरातील कण दुसºया थरात जात नाही. थर एकमेकांना समांतर वाहतात. पाण्याचे कण एकमेकांवर आदळत नाहीत. त्यामुळे या प्रवाहाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पाण्याच्या शक्तीचा -हास फारच कमी होतो. याविरुद्ध प्रक्षुब्ध प्रवाहामध्ये पाणी खळखळाट करीत बेधुंद वाहते. पाण्याचा प्रत्येक कण वाटेल त्या दिशेने धावतो व एका थरातून दुस-या थरात जातो. थर एकमेकांना समांतर वाहत नाही. पाण्याचे कण एकमेकांवर आदळतात व टक्कर होऊन वेगाने एकमेकांपासून वेगळे होतात. त्यामुळे या प्रवाहाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पाण्याच्या शक्तीचा -हास जास्त होतो. आपल्या जीवनाचेसुद्धा असेच असते. समाजात काही लोक असतात की ते आपले जीवन शांतपणे, सरळ मार्गाने, दुस-यांना धक्के न देता, दुस-यांशी भांडण-तंटा न करता, दुसºयांना प्रेम, जिव्हाळा, आनंद देत जगत असतात. त्यांच्या शक्तीचा पाण्याच्या संथ प्रवाहाप्रमाणे कमी प्रमाणात -हास होतो. विश्वाला मार्गदर्शन करणारे संत महात्मे, थोर समाजसेवक, जीवनात यशाची उत्तुंग भरारी मारणारे व्यक्ती व विज्ञान जगात नावलौकिक असलेले शास्त्रज्ञ अशा महान व्यक्ती या प्रकारात मोडतात. याविरुद्ध समाजात मोठ्या प्रमाणात लोक असतात की ते सरळ मार्गाने प्रवास करीत नाही. प्रत्येक वेळेस आडमार्गाचा वापर करायचा प्रयत्न करतात, दुस-यांचे पाय ओढून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या शक्तीचा पाण्याच्या प्रक्षुब्ध प्रवाहाप्रमाणे जास्त प्रमाणात -हास होतो. त्यांची मानसिक शक्ती टिकून राहत नाही. भरपूर संपत्ती व धन असते, पण बहुदा मन:शांती नसते. त्यामुळे त्यांच्याकडून विध्वंसक गोष्टी घडून येतात. अत्याचारी, भ्रष्टाचारी, व्यभिचारी, दुर्जन अशा व्यक्ती या प्रकारात मोडतात. म्हणूनच जीवन हे संथ प्रवाहाप्रमाणे आनंद घेत दुस-याला आनंद देत जगायला पाहिजे. शेवटी विकल्प हे आपल्या जवळच असतात, मात्र योग्य वेळी योग्य विकल्प जो निवडतो तोच यश संपादन करीत असतो, तोच परमानंद प्राप्त करून स्थितप्रज्ञ अवस्था प्राप्त करतो. 

टॅग्स :Waterपाणी