शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
4
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
5
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
6
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
7
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
8
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
9
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
10
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
11
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
12
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
13
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
14
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
15
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
16
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
17
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
18
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
19
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
20
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!

ही आहेत बँका डबघाईला येण्याची सहा प्रमुख कारणे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 5:59 AM

एखाद्या बँकेचे ठेवीदार किंवा भागधारक अथवा सामान्य ग्राहक म्हणून बँकेची आस्तेकदम होणारी पडझड आम्हाला कळली पाहिजे. यासाठी सजगतेची पहिली पायरी म्हणून बँका डबघाईला येण्याची सहा प्रमुख कारणे आम्हाला कळायला हवीत.

- डॉ. गिरीश जाखोटियाअर्थतज्ज्ञएखादी बँक डबघाईला येण्याबाबत आपण ‘ब्रेकिंग न्यूज’ जेव्हा पाहू वा ऐकू लागतो तेव्हा नि फक्त तेव्हाच ‘अपने दिमागकी घंटी बजने लगती है!’ एखाद्या बँकेचे ठेवीदार किंवा भागधारक अथवा सामान्य ग्राहक म्हणून बँकेची आस्तेकदम होणारी पडझड आम्हाला कळली पाहिजे. यासाठी सजगतेची पहिली पायरी म्हणून बँका डबघाईला येण्याची सहा प्रमुख कारणे आम्हाला कळायला हवीत. यातील काही कारणे एकमेकांशी निगडितही आहेत. काही कारणे ‘रचनात्मक’ म्हणजे सुरुवातीला न कळणाऱ्या वा न सापडणा-या कर्करोगासारखी असतात. ती कळतात तेव्हा बराच उशीर झालेला असतो. यास्तव बँकेच्या तब्येतीची नियमितपणे कसून चौकशी वा पाहणी करण्याची जबाबदारी ठेवीदारांच्या व भागधारकांच्या संघटनांना पार पाडता आली पाहिजे.बँका डबघाईला येण्याचे पहिले आणि सर्वाधिक महत्त्वाचे कारण म्हणजे ‘भ्रष्ट उद्योगपती, वित्तीय सल्लागार, बँकर्स व यांचे पोशिंदे असलेले राजकारणी’ यांची चौकडी. अयोग्य प्रकल्पाला कर्ज देण्यापासून ते प्रकल्पाची किंमत वाढवत वाढीव कर्ज देण्याच्या संपूर्ण साखळीला ही चौकडी चालविते. कर्ज घेणारा भ्रष्ट उद्योगपती वित्तीय व कायदा सल्लागारांच्या मदतीने स्वत:च्या कंपनीलाच जराजर्जर बनवीत पैसे हजम करतो. दिवाळखोरी जाहीर करताना तो लबाडीने जाहीर करतो की त्याचे उद्योजकीय निर्णय चुकले वा उद्योजक म्हणून तो ‘नालायक’ आहे. थोडक्यात असं की, ‘मी चूक केलीय, गुन्हा नाही.’बँका कोसळण्याचा दुसरा मोठा कारणीभूत घटक असतो तो बँकांचे बरेच संचालक. आपल्या गोतावळ्यात फालतू कर्जांची खिरापत वाटण्यापासून ते नोकऱ्यांचा मलिदा वाटण्यापर्यंत हे कलाबाज लोक संगनमताने काहीही करू शकतात. बँक एखाद्या सांस्कृतिक वा सामाजिक अथवा राजकीय संघटनेच्या छत्रछायेखाली असेल तर कार्यकर्त्यांना नोकºया, कर्जे व कंत्राटे ही द्यावी लागतातच. बºयाचदा असे ‘कार्यकर्ता कर्मचारी’ आपापल्या गॉडफादर संचालकाच्या संरक्षणामुळे मुजोर होतात जे बँकेच्या व्यवस्थापनालाही डोईजड होऊ लागतात. यातून एक रोगट बँकिंग संस्कृती तयार होते जी बँकेला वाळवीसारखी पोखरत जाते.तिसरे कारण दडलेले असते बँकेच्या प्रवर्तकांच्या  महत्त्वाकांक्षेमध्ये. या मंडळींना बँक - विस्ताराची प्रचंड घाई असते. यास्तव शाखा - विस्तार करताना बाजाराचा नीट अभ्यास केला जात नाही. अकुशल वा अननुभवी कर्मचाºयांची (इथे पुन्हा बगलबच्चे) घाईत नियुक्ती केली जाते. शाखांच्या इमारती, फर्निचर व तत्सम बांधणीत संचालक आपला हिस्सा घेणार, हे ओघाने आलेच. बºयाचदा तोट्यात चालणाºया छोट्या बँका व त्यांच्या शाखा व्यवसाय - वाढीसाठी घेतल्या जातात. यासाठीची चौकशी  नीटपणे केले जात नाही. बुडणारी कर्जे व कामचोर कर्मचारी या मार्गाने आत येतात. काही वेळा ‘सरकार’ नावाची व्यवस्था सक्ती करते की अमुकतमुक बँक (काही जणांचे हितसंबंध सांभाळण्यासाठी) तुम्हाला ताब्यात घ्यावी लागेल. बरेच प्रवर्तक मनमानी करत व बँकेला मोठी ठरविण्यासाठी वेगाने अनावश्यक ठेवी गोळा करतात नि कर्जांची खिरापत वाटतात. कठोर सत्य बाहेर येण्याआधी हे आपले शेअर्स दलालांद्वारे विकून मोकळे होतात. छोट्या व विखुरलेल्या भागधारकांना आणि ठेवीदारांना हे सारं कळेपर्यंत उशीर झालेला असतो.चौथे कारण हे भ्रष्टाचाराचे नसून बँकिंगमधील कौशल्याच्या कमतरतेचे आहे. बँकेच्या ठेवी व कर्जांमधील संतुलन, विविध उद्योगांना दिलेल्या कर्जांमधील क्षेत्रीय संतुलन, क्लिष्ट कर्जांची आखणी व नियंत्रण, इन्व्हेस्टमेंट बँकिंगमधील वाढता मोह, ‘डेरीवेटिव्ज’सारखे अर्धसत्य प्रॉडक्ट्स हाताळण्यातील अपयश, भविष्यात अर्थव्यवस्थेची होणारी वाटचाल आणि या वाटचालीचा कर्जपुरवठ्यावर होणारा परिणाम, तंत्रज्ञानाचा बँकिंगच्या प्रक्रियांमधील वापर इत्यादी अनेक गोष्टींबाबतचे ‘व्यूहात्मक कौशल्य’ बºयाच वरिष्ठ बँकर्सकडे पुरेसे नसते; परंतु यांचा अहंकार मात्र कमालीचा असतो. बँका डबघाईला येण्याचे पाचवे महत्त्वाचे कारण हे ‘केंद्रीय नियंत्रक बँके’ची (जिला फेडरल वा रिझर्व्ह वा सेंट्रल रेग्युलेटरी बँकही म्हटले जाते) कमजोरी.डबघाईचे सहावे आणि अंतिम कारण हे बँकेच्या कर्मचाºयांमुळे व त्यांच्या युनियनमुळे बºयाचदा तयार होते. बेसुमार कर्मचारी भरती, वाढलेले पगार, घटलेली कार्यक्षमता, नव्या उपक्रमांना स्वार्थी व हेकेखोर विरोध, बदल्या - पदोन्नतीमधील दादागिरी आणि भ्रष्टाचार इत्यादी बँकेला आजारी पाडणाºया बºयाच गोष्टी हे युनियन लिडर्स सहजगत्या करीत असतात. इथेही यांच्यावर पुढाºयांचा व प्रशासकांचा वरदहस्त हा असतोच. काही बँकांमध्ये व्यवस्थापन व युनियन लिडर्समध्ये भ्रष्ट अशी मिलीभगत असते जी आस्तेकदम बँकेला दिवाळखोरीकडे नेते. जुन्या आणि दत्तक घेतलेल्या कर्मचारी युनियन्स या एकमेकांवर वरचढ ठरताना बँकेचे नुकसान करीत जातात. थोडक्यात काय, ठेवीदारांनो आणि भागधारकांनो, संघटन आणि सुजाणपणाला पर्याय नाही!

टॅग्स :bankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्र