शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

सांस्कृतिक विकेंद्रीकरणाला गती देणारा कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2018 6:28 AM

भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष, प्रख्यात गायक, संगीतकार, अभिनेते आणि नाट्यदिग्दर्शक शेखर सेन यांनी देशातील सांस्कृतिक चळवळीला विकेंद्रित करण्याचे मोठे कार्य सुरू ठेवले आहे.

- प्रा. डॉ. प्रकाश खांडगे भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष, प्रख्यात गायक, संगीतकार, अभिनेते आणि नाट्यदिग्दर्शक शेखर सेन यांनी देशातील सांस्कृतिक चळवळीला विकेंद्रित करण्याचे मोठे कार्य सुरू ठेवले आहे. ते नोव्हेंबर महिन्यात १000 एकपात्री नाट्य कारकीर्द साजरी करीत आहेत.आजवर सांस्कृतिक चळवळ ही दिल्ली, मुंबई, कोलकाता, मद्रास आदी महानगरांपुरतीच मर्यादित होती याचा अर्थ देशाच्या अन्य भागात सांस्कृतिक चळवळ रुजलेली नव्हती असे नाही. पण तेथील कलावंतांना अभावानेच राष्ट्रीय रंगमंच उपलब्ध झाला. शेखर सेन हे संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी सांस्कृतिक चळवळ ही जिल्हा, तालुका पातळीवर नेली. आजवर शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्य आणि नाटक यांचाच वरचष्मा सांस्कृतिक घडामोडींवर होता; पण शेखर सेन यांनी आदिवासी वाड्यापाड्यावरील लोककलावंतांना श्रेष्ठ भारत संस्कृती समागमसारख्या चळवळीत सामावून घेतले. इतकेच नव्हेतर, देशातील शिखरस्त सर्व कलावंत आणि अभ्यासक यांचे मंडळीकरण श्रेष्ठ भारत संस्कृती समागम या उपक्रमाद्वारे साध्य केले.तुलसी, कबीर, विवेकानंद, सुरदास आणि साहेब हे एकपात्री प्रयोग त्यांनी सादर करून इतिहास घडविला आहे़ १९९७ साली त्यांनी तुलसी या एकपात्री प्रयोगाचे लेखन केले. कारण तुलसीदास यांच्या रामायणाने शेखर सेन प्रभावित झाले होते. जणू तुलसीदास यांनी स्वप्नात येऊन शेखर सेन यांना साक्षात्कार दिला की काय? असे वाटावे. कारण त्यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात तुलसी हा एकपात्री प्रयोग लिहिला आणि ‘धर्मयुग’चे संपादक डॉ. धर्मवीर भारती यांच्यापुढे त्यांनी तुलसीचे वाचन केले. डॉ धर्मवीर भारतीदेखील तुलसीने प्रभावित झाले. १0 एप्रिल १९९८ रोजी भाईदास सभागृहात दुपारच्या वेळी तुलसी हा एकपात्री प्रयोग शेखर सेन यांनी सादर केला़ भारतीय संस्कृतीत तुलसीदास, कबीर, सुरदास, मीराबाई, चैतन्य महाप्रभू, ज्ञानेश्वर, तुकाराम अशा संतांना अनन्यसाधारण महत्त्व असून परमार्थ साधनेबरोबरच विश्वबंधुत्वाचा संदेश या संतांनी दिला.त्यांच्या विचारांनी मी झपाटलो गेलो. म्हणूनच आधी तुलसी आणि नंतर कबीर असे एकपात्री प्रयोग मी करू शकलो, असे मत शेखर सेन यांनी व्यक्त केले़ लेखन, दिग्दर्शन, संगीत, नेपथ्य, प्रकाश आणि प्रत्यक्ष गायन व अभिनय अशा सर्वच आघाड्यांवर शेखर सेन यांना एकपात्री प्रयोग करताना एकाग्रता दाखवावी लागते़. तुलसीमध्ये ५२ गीते, कबीरमध्ये ४५ गीते, ४३ राग अशी संगीत साधना करीत शेखर सेन यांनी देशभर आणि न्यू यॉर्क, लंडनमध्ये आपले एकपात्री प्रयोग सादर केले. ३७ वर्षांची संगीतसाधना सांभाळीत एकपात्री प्रयोगांचे मार्गक्रमण करीत असताना विवेकानंदांच्या जीवनकर्तृत्वाने शेखर सेन भारावून गेले आणि जानेवारी २00४ साली त्यांनी विवेकानंद हा एकपात्री प्रयोग रंगभूमीवर आणला.आपल्याकडे अनेक सांस्कृतिक चळवळींची पुनरुक्ती होते़ अनेक संस्था तेचतेच कार्य करीत राहतात. उदा. राष्ट्रीय नाट्य विद्यालय जर नाट्यचळवळीची केंद्रीय संस्था असेल तर केंद्रीय पातळीवर पुन्हा वेगळी नाट्यचळवळ राबविणे अप्रस्तुत आहे. त्यामुळे संगीत नाटक अकादमी नाटकासोबतच लोककलांच्या जतन, संवर्धन, संशोधनासाठी कार्य करीत असल्याचे मत शेखर सेन यांनी व्यक्त केले. त्यांनी भारतीय कलांच्या इतिहासाला आपल्या कार्यकर्तृत्वाने नवा आयाम दिला आहे.(लेखक लोककलेचे अभ्यासक आहेत)

टॅग्स :cultureसांस्कृतिक