शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

शनैश्चरशरण देवेन्द्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2016 03:53 IST

शनि शिंगणापुरातील शनीच्या प्रतिकात्मक शीळेच्या चौथऱ्यावर महिलांना असलेली बंदी उठवावी म्हणून भूमाता ब्रिगेड नावाच्या संस्थेच्या महिलांनी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले खरे, पण मुख्यमंत्र्यांनी

शनि शिंगणापुरातील शनीच्या प्रतिकात्मक शीळेच्या चौथऱ्यावर महिलांना असलेली बंदी उठवावी म्हणून भूमाता ब्रिगेड नावाच्या संस्थेच्या महिलांनी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले खरे, पण मुख्यमंत्र्यांनी त्यांना थेट पंतप्रधानांकडे जाण्याचा आणि त्यांच्याच करवी एखादा कायदा करुन देशातील सर्वच देवालयांमधील महिलांवर असलेली बंदी उठवून घेण्याचा सल्ला दिल्याने मुख्यमंत्रीदेखील शनैश्चरशरण असावेत असा निष्कर्ष काढण्यास जागा झाली आहे. राज्याचा कारभारी म्हणून त्यांनी सपत्नीक चौथऱ्यावर जावे असे आवाहन भूमातांनी केले होते पण तेही मुख्यमंत्र्यांनी काही मनावर घेतले नाही. आता तेथील देवस्थानच्या विश्वस्तांनी एक वेगळाच तोडगा मांडला आहे. महिलांना तर परवानगी देणारच नाही पण नगद अकरा हजार एकशे रुपये देणाऱ्या पुरुषांना चौथऱ्यावर जाण्यासाठी दिली जाणारी परवानगीदेखील रद्द करण्याचा विचार करु असे या विश्वस्तांनी म्हटले आहे. त्याचबरोबर आंदोलन करणाऱ्या महिला आणि त्यांचे पाठीराखे तद्दन नास्तिक असल्याने त्यांच्याशी चर्चा काय करायची असा प्रतिप्रश्न उपस्थित करुन चर्चेचा प्रस्तावदेखील त्यांनी नाकारला आहे. एकूणच आता या प्रकरणातही राजकारणाचा प्रवेश झाला असल्याचे हे निदर्शक आहे. या राजकारणाचाच आणखी एक पैलू म्हणजे आखाडा परिषदेने यात घेतलेली उडी. महिलांना देशातील कोणत्याही देवालयात बंदी असता कामा नये कारण स्त्री आणि पुरुष यात भेद करता येत नाही असे या परिषदेच्या अध्यक्षांनी म्हटले आहे. अलीकडेच पार पडलेल्या नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या कुंभ मेळ्यात काही महिला साध्वींनी त्यांच्या स्वतंत्र आखाड्यास अनुमती, आखाड्यास स्वतंत्र जागा आणि शाही स्नानाचा हक्क मिळावा म्हणून आग्रह धरला असता तो याच आखाडा परिषदेने नाकारला होता. इतकेच नव्हे तर साध्वींच्या आखाड्याच्या प्रमुख महिलेने आखाडा परिषदेच्या अध्यक्षांवर गंभीर आरोपदेखील केला होता हे लक्षणीय!