शहरं
Join us  
Trending Stories
1
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
2
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
3
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
5
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
6
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
7
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
8
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
9
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
10
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
11
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
12
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
13
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
14
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
15
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
16
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
17
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
18
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
20
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक

नाती ठिसूळ झाली!

By किरण अग्रवाल | Updated: November 29, 2018 09:03 IST

माणसांमध्ये ‘मी’तले अडकलेपण अलीकडच्या काळात वाढल्याची तक्रार असून, ती खरीही आहे. हल्ली प्रत्येकजण ‘मी’ व ‘माझ्या’पुरता पाहू लागला आहे. इतरांशी काही देणे-घेणे न ठेवता या असल्या आपापल्या कुटुंबात रममाण होण्यातून खरे तर नाती दृढ व्हायला हवीत.

-किरण अग्रवाल

माणसांमध्ये ‘मी’तले अडकलेपण अलीकडच्या काळात वाढल्याची तक्रार असून, ती खरीही आहे. हल्ली प्रत्येकजण ‘मी’ व ‘माझ्या’पुरता पाहू लागला आहे. इतरांशी काही देणे-घेणे न ठेवता या असल्या आपापल्या कुटुंबात रममाण होण्यातून खरे तर नाती दृढ व्हायला हवीत. पण या नात्यांनाच नख लावणाऱ्या व प्रसंगी काळिमा फासणा-या घटना समोर येतात तेव्हा त्या नात्यांमधली वाढती ठिसूळता विषण्ण करून गेल्याशिवाय राहात नाही. नात्यांची वीण उसवण्यामागील कारणांचा शोध घेतला जाणे त्यामुळेच गरजेचे बनले आहे, कारण असले प्रकार हे केवळ संबंधित कुटुंबातलेच नाही तर समाजव्यवस्थेतील किडकेपण अधोरेखित करून देत असतात.आजची तरुणपिढी मोबाइलवरील सोशल नेटवर्किंगमध्ये अशी वा इतकी काही गुंतली आहे की, त्यांना शेजार-पाजारचे भानच उरलेले नाही, अशी ओरड अलीकडे वाढली आहे. या गुंतलेपणातून स्वकेंद्रितपणा आकारास येत असून, प्रत्येकजण आपल्यापुरता मर्यादित अगर ज्याला संकुचित म्हणता यावे, असा होत आहे. ही अवस्था खरे तर मनुष्याला मनुष्यापासून, समाजापासून दूर नेणारी आहे. पण त्यातही कुटुंबातले, नात्यांमधले का होईना संबंध या आपल्यापुरते पाहण्यातून दृढ होण्याची अपेक्षा केली जाते. चला, माणूस इतरांपासून दुरावला; परंतु स्वकीयांसोबत तरी जोडला गेला ना, म्हणून त्याकडे पाहिले जाते. मात्र हल्ली हे आपल्यातले नात्यांचे बंध तरी कुठे संवेदनक्षम उरले आहेत? आपलेच आपल्याचा जीव घ्यायला उतावीळ झाल्याचे अनेक प्रकार समोर येत असतात. कधी संपत्तीच्या वाटे-हिस्स्यातून ते घडून येताना दिसते, तर कधी परस्परांमधील ईर्षेतून अगर व्यावसायिक स्पर्धेतून घडून येते. शिवाय जन्मदात्या माता-पित्यांना वृद्धावस्थेत अनाथाश्रमाच्या पाय-यांवर सोडून येणारे दिवटे जिथे निपजतात, तिथे अन्य नात्यांचा आब राखला जाण्याची अपेक्षा तरी कशी करायची? नात्यांची वीण उसवत चालल्याचे चित्र यातून प्रकर्षाने दिसून येणारे आहे.महत्त्वाचे म्हणजे, पै-पैशातून होणा-या भानगडी किंवा कोर्ट-कज्जे तर सुरू असतातच; पण नात्यांना कलंक लावणारे अमानवीय व अनैतिक प्रकारही अलीकडे मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहेत. समाजाचा किंवा वडीलधा-यांचा धाक उरला नाही म्हणून असो, की बदलत्या जीवनशैलीमुळे जागलेल्या अतृप्त विषय वासनांमुळे; विचार वा बुद्धी गहाण टाकून भलतेच काही करून बसणारे लोक नात्यांमधील नाजूक नजाकतीचा व भावबंधाचाच पार चेंदामेंदा करून टाकत असतात. पित्याकडूनच मुलीवर केले जाणारे अत्याचार हे असेच नात्याला बट्टा लावणारे. अधून-मधून अशा दुर्दैवी घटना समोर येतात तेव्हा सुजाणांच्या मेंदूला झिणझिण्या आल्याखेरीज राहात नाही. याच मालिकेत मोडणारे, म्हणजे सावत्र पित्यानेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची एक तक्रार नाशकातील उपनगर पोलीस ठाण्यात, तर एका माता-पित्यानेच आपल्या मुलीला मसाज पार्लरमध्ये कामास पाठवून वेश्या व्यवसायात ढकलल्याची तक्रार खुद्द या अभागी मुलीनेच पुण्यात दिल्याचे प्रकार समोर आले होते.नैतिकतेच्या अध:पतनाचा प्रत्यय घडवणारा असाच एक प्रकार अलीकडेच ठाणे जिल्ह्यातील मोखाडा पोलीस ठाण्यात नोंदविला गेला तो म्हणजे, नात्याने चुलत बंधू असलेल्यासोबतच पळून जाऊन एका विवाहितेने संसार थाटला व या अनैतिक संबंधात आडकाठी ठरणा-या आपल्या अवघ्या पाच वर्षाच्या चिमुकलीला तापत्या सळईने चटके दिले. ‘मम्मी व मामा’ने दिलेले चटके या अजाण बालिकेच्या मनावर जो आघात करून गेले आहेत, त्याचे व्रण भरून निघणे कसे शक्य आहे? नात्यांच्या मर्यादा, सन्मानाला खुंटीवर टांगून प्रसवणारी ही अनैतिकता, अघोरीपण ‘नरेची केला किती हीन...’ याचा प्रत्यय आणून देणारे आहे. कशातून व कशामुळे घडून येते हे सारे, हा खरेच अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. पापपुण्याच्या कल्पनेवर विश्वास असो अगर नसो; पण पापाच्या घडे भरणीलाही ही लोकं घाबरणार नसतील तर समाजानेच अशा सडक्या मानसिकतेला लगाम घालण्याच्या दृष्टीने पाऊले उचलायला हवीत.

टॅग्स :Rapeबलात्कारrelationshipरिलेशनशिप