शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

साईशताब्दी शिर्डीपुरती मर्यादित नको

By सुधीर लंके | Updated: October 12, 2017 00:51 IST

शिर्डीच्या साईशताब्दी महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने शिर्डीतून विमानसेवाही सुरू झाली आहे. मात्र, हा महोत्सव केवळ शिर्डीपुरता मर्यादित करावयाचा आहे काय? हा प्रश्न उपस्थित होतो.

शिर्डीच्या साईशताब्दी महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने शिर्डीतून विमानसेवाही सुरू झाली आहे. मात्र, हा महोत्सव केवळ शिर्डीपुरता मर्यादित करावयाचा आहे काय? हा प्रश्न उपस्थित होतो. शिर्डीच्या महोत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांनी मार्च महिन्यात मुंबईत बैठक घेऊन तीन हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. या बैठकीला केवळ नगर जिल्ह्यातील तेही शिर्डीच्या आसपासच्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत जो आराखडा ठरला त्याचीही अंमलबजावणी सुरू नाही.वास्तविकत: शिर्डीत देशभर व जगभरातून भाविक येतात. यानिमित्ताने अहमदनगर जिल्हा, नाशिक, औरंगाबाद ही शहरे जोडता येणे शक्य होते. शिर्डीला येणारे बहुतांश भाविक हे औरंगाबाद, नाशिकवरूनच शिर्डीत येतात. मुंबईहून साईभक्तांच्या ज्या पदयात्रा येतात त्या नाशिकमधूनच पुढे मार्गस्थ होतात. हैद्राबादचे भाविकही औरंगाबादमार्गे येतात. त्यामुळे साईशताब्दीचा विचार करताना याही शहरांना सोबत व विचारात घेऊन पर्यटन विकासाचे पदर रुंदावता येणे शक्य आहे. तो विचार प्रशासकीय पातळीवर अजूनतरी झालेला दिसत नाही. नाशिकच्या कुंभमेळ्याचे नियोजन करताना नाशिकसोबतच आसपासची तीर्थस्थळे व पर्यटन केंद्रांचा विचार होतो. शिर्डी विकसित करतानाही हा दृष्टिकोन समोर ठेवायला हवा. नगर हे ऐतिहासिक शहर आहे. या शहरात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. मात्र, नगर शहराबाबत साईशताब्दीच्या आराखड्यात काहीच उल्लेख नाही. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही याबाबत आग्रही दिसत नाहीत. उत्तर महाराष्टÑात नगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार हे जिल्हे आहेत. महोत्सवाच्या निमित्ताने उत्तर महाराष्टÑ पातळीवर एकत्रित बैठक घेता येणे शक्य आहे. परंतु हे जिल्हे केवळ कागदावर प्रशासकीयदृष्ट्या एकत्र आहेत. विकासासाठी जो आंतरिक संवाद व्हायला हवा तोच नाही. शिर्डीतून विमानांची उड्डाणे सुरू झाली. शिर्डीच नव्हे उत्तर महाराष्टÑात प्रत्यक्षात कार्यरत झालेले हे पहिले विमानतळ आहे. कारण, नाशिक व जळगावला विमानतळ आहे. मात्र तेथून उड्डाणेच होत नाहीत. शिर्डीतून मुंबई, हैद्राबाद ही सेवा सुरू झाली आहे. भविष्यात आंतरराष्टÑीय उड्डाणेही होणार आहेत. या विमानतळाचा फायदा नाशिककरांनाही होऊ शकतो. शिर्डीत कार्गो हब झाले तर नगर, नाशिक या दोन्ही जिल्ह्यातील शेतकºयांसाठी ती उपलब्धी ठरेल. पूर्वी खासदारकीच्या निमित्ताने नगर व नाशिक जिल्ह्यातील तालुके एकत्र होते. अजूनही उत्तर महाराष्टÑाचा पदवीधर व शिक्षक मतदारसंघ एकच आहे. पण, मतदानाच्या पलीकडे हे आदानप्रदान जाणार आहे का? यावर या प्रदेशातील सुविधांचा फायदा एकमेकांना कसा होईल हे ठरेल. तूर्तास तरी संवाद म्हणावा तसा दिसत नाही. साईशताब्दीच्या निमित्ताने तसा प्रयत्न करता येऊ शकेल. सार्इंची पालखी शिर्डीपुरती नको. जयंत ससाणे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष असताना नाशिक, नगर, औरंगाबाद हा पर्यटनाचा ‘त्रिकोण’ तयार करण्याचा मुद्दा चर्चेला आला होता. त्याबाबत बैठकाही झाल्या होत्या. मात्र, त्यास मूर्त स्वरूप मिळाले नाही. मुंबईही अकोले, भंडारदरामार्गे शिर्डीशी जोडणे शक्य आहे.sudhir.lanke@lokmat.com