वणव्याने होरपळताहेत सह्याद्रीच्या पर्वतरांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 03:15 AM2018-04-24T03:15:00+5:302018-04-24T03:15:00+5:30

महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार दरवर्षी नैर्ऋत्य मान्सून पावसाची सुरुवात होताच ‘झाडे लावा’चा घोष करायला सुरुवात करतात.

Sahyadri ranges roaming around the city | वणव्याने होरपळताहेत सह्याद्रीच्या पर्वतरांगा

वणव्याने होरपळताहेत सह्याद्रीच्या पर्वतरांगा

Next

वसंत भोसले|

गवताची कापणी झाली की, डोंगराला वणव्याने पेटवून द्यावे, म्हणजे पुढीलवर्षी गवत अधिक जोमाने उगवते, अशी अंधश्रद्धा आजही सह्याद्री पर्वतरांगांची पाठ सोडायला तयार नाही. हिरवेगार डोंगर दिसण्याऐवजी काळेकुट्ट झाले आहेत.

महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार दरवर्षी नैर्ऋत्य मान्सून पावसाची सुरुवात होताच ‘झाडे लावा’चा घोष करायला सुरुवात करतात. हजारो, लाखोने असे करत हा वृक्षे लावण्याचा आकडा फुगत जाऊन कोटींवर गेला आहे. येत्या पावसाळ्यात चार कोटींहून अधिक झाडे लावण्याचा संकल्प आहे, अशी जाहिरातही करण्यात येत आहे. अशी ही कोट्यवधी लावलेली झाडे गेली कुठे? कारण महाराष्टÑाचा बहुतांश भाग दिवसेंदिवस ओसाड होताना दिसतो आहे. एकीकडे वृक्षलागवडीचा जोरदार प्रयत्न असतानाच महाराष्टÑाचा स्वाभिमान असणारा सह्याद्री मात्र जळतो आहे. लावण्यात येणाऱ्या आगीत होरपळत आहे. गोवा सीमेपासून नाशिकच्या कळसुबाईच्या माथ्यापर्यंत जाऊन पाहा. सह्याद्रीच्या पर्वतरांगा कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यात पसरलेल्या आहेत. यापैकी एकही रांग हिरवीगार दिसत नाही. ज्या-त्या भागात लोकांचा वावर आहे. तेथे आगी लावण्यात येत आहेत. या आगीचा वणवा डोंगरावरील गवतांना जाळतच आहे. त्यावेळी छोटी-मोठी झाडे जळत आहेत. या रांगांमध्ये असणारे कीटक, जंतू, पक्षी, सरपटणारे प्राणी, जिवंत प्राणी जळून जात आहेत. दोन दिवसांपूर्वी सातारा या मराठेशाहीच्या राजधानी असलेल्या शहराजवळचा अजिंक्यतारा किल्ला पुन्हा पेटवून देण्यात आला. या किल्ल्यावर वणवा लावण्याच्या घटना आजपर्यंत अनेकदा घडल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी हिरवागार दिसणारा डोंगर आगीत होरपळून काळाकुट्ट झाला आहे. ही घटना ताजी असतानाच रविवारी पुन्हा वणवा लावण्यात आला. यात रानाची राखरांगोळी झालीच तसेच अनेक वृक्षही जळून गेले.
सातारा शहराच्या पश्चिमेस असलेल्या जागतिक वारसा स्थळ म्हणून ज्या कास पठाराचा गौरव करण्यात आला आहे तो कास पठारही वणव्याने जळतो आहे. दोन दिवसांपूर्वी कास पठारावरील एकीव गावाजवळ वणवा लागला. या वणव्याने कास पठाराच्या मुख्य बाजूने पसरण्यास सुरुवात केली. वनखात्याचे कर्मचारी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आगी विझवण्यात यशस्वी झाले. ही आग लागताच अग्निशामक दलाची गाडी पाठविण्यात आली, पण डोंगरदºयात पेरलेल्या वणव्यापर्यंत गाडी नेता आली नाही.
एकीकडे वृक्षलागवडीचा प्रयत्न चालू असताना वनांना आगी लावण्याचे प्रकार काही थांबायला तयार नाहीत. या आगी लावून काय साध्य होणार आहे, याचे उत्तर कुणी देत नाही. केवळ अंधश्रद्धेतून हे वणवे लावले जात आहेत. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एकवर्षी वृक्षलागवडीचा कार्यक्रम बाजूला ठेवून वृक्षांची जोपासना करणारी मोहीम सुरू करावी. दरवर्षी पावसाळा सुरू होत असताना वृक्षलागवडीचा धडाका सुरू होतो, पण ते वाढत असलेले वृक्ष जळतात तेव्हा कुणी ते जपण्यासाठी पुढे येत नाहीत. वारंवार असे वणवे लावण्यात येत असताना कुणावरही कठोर कारवाई होताना दिसत नाही. गुन्हे दाखल होत नाहीत. एकीकडे वृक्षलागवडीसाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा करायचा आणि अशाप्रकारे आगी लावून ही जंगले, किल्ले, पर्वतरांगा, डोंगरदºया जाळून टाकण्यात येत आहेत. महाराष्टÑाचे वनक्षेत्र कमी होत असताना अशा आगींना तातडीने अटकाव करायला हवा, अन्यथा सह्याद्री पर्वतरांगा बोडक्या झाल्याशिवाय राहणार नाहीत. या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमुळे नैर्ऋत्येकडून येणारा मान्सूनचा पाऊस अडतो आणि महाराष्टÑ ओलाचिंब होतो. ही साखळी जोडून ठेवू या, तोडू या नको !

Web Title: Sahyadri ranges roaming around the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल