शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

बेसुमार वाळूउपशामुळे नद्यांचे झाले गटार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 04:37 IST

नद्या कोरड्या पडायला आणि पाऊस-पाणी निघून जायला एकमात्र कारण आणि ते म्हणजे, वाळूउपसा. हे कारण म्हणून कुणालाच स्वीकारावेसे वाटत नाही. कारण वाळू प्रत्येकाला हवी आहे.

- प्रमोद पवार आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी यमुना किनारी विश्व सांस्कृतिक समारंभाचे आयोजन केले आणि त्यात १५५ देशांतील सद्भाविकांनी सहभाग नोंदवून संस्कृतीची देवाण-घेवाण केली. पंतप्रधानांनी कार्यक्रमाचे महत्त्व प्रतिपादन करताच, यमुनेचा खोटा कैवार असणाऱ्यांनी कोल्हेकुई सुरू केली. इतर वेळी यांना नद्यांशी काहीही घेणे-देणे नसते. खासगी कार्यक्रमासाठी सैनिकांचा वापर केला, यमुनेचे पात्र बदलले, खोदकाम केले, (वाळूतली म्हणायला तोंडच नाय) म्हणून मातीतली जैवविविधता नष्ट केली आणि अशी एक ना दोन अच्छे को बुरा साबित करण्यासासाठी, प्रतिमा मलीन करण्यासाठी खोडसाळबुद्धीला जी-जी कारणे सुचतील, ती-ती हरित लवादासमोर मांडण्याचा हिरिरीने मांडण्याचा प्रयत्न केला, पण दूरदूरपर्यंत किमान दिडशे किमीच्या पट्ट्यात वाळूउपसा करणाºयांनी नदीचे गटार केले, म्हणून कुणी एकजुटीने पुढे आलेले दिसले नाहीत किंवा दिसतही नाहीत. जानेवारी-फेब्रुवारीपासूनच कोरड्या पडणाºया नदीकाठी आम्ही झाडे लावू , नव्हे-नव्हे बारमाही प्रवाहीत करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करू, त्यात पाणी भरण्यासाठी डॉ. राजेंद्र सिंहांचा जोहड पॅटर्न राबवू, असे तळमळीने ना श्री श्री म्हणाले, ना कांगावा करणारे, ना लवादाला हे सुचले.नद्या कोरड्या पडायला आणि पाऊस-पाणी निघून जायला एकमात्र कारण आणि ते म्हणजे, वाळूउपसा. हे कारण म्हणून कुणालाच स्वीकारावेसे वाटत नाही. कारण वाळू प्रत्येकाला हवी आहे. वाळूउपसा- रेती उत्खनन ही आता केवळ एका राज्याची समस्या नसून, ज्या-ज्या राज्यांनी अधिकृत आणि अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन दिले, सिमेंटची जंगले वाढवून शायनिंगचा वसा घेतला, तिथे-तिथे ही समस्या ‘आ’ वासून उभी राहिली आहे आणि तिने तक्रारदार शेतकºयांपासून ते पोलीस, तहसीलदार-जिल्हाधिकाºयांपर्यंतच्या कर्तव्यदक्ष-निरापराधांचे शेकडो बळी घेतले आहेत.यमुनेच्या डोहातली सुमारे दीडशे ते दोनशे किमी पट्ट्यातील अवैध रेतीची तस्करी निदर्शनास आणूनदेखील लवाद दुर्लक्ष करतो, तर दुसरीकडे अनावश्यक गोष्टीत लक्ष घालून त्रास देण्याची भूमिका बजावतो. कृष्णा- नर्मदा ६० टक्के लहान झाल्यात, तर कावेरी ४० टक्के आणि गोदावरी २० टक्के लहान झालीय. हजारो वर्षांपासून अव्व्याहत वाहणाºया या जीवनदायिनी फक्त पावसाळ्यातच वाहू लागल्या आहेत. तीच अवस्था गेल्या १५ ते २० वर्षांत या मोठ्या नद्यांची होताना दिसतेय. पुढील १५ ते २० वर्षांत पावसाबरोबर लोंढे आले तसे मुरून जातील. आताच जानेवारी- फेब्रुवारीमध्ये नद्या सुकू लागल्यात, गोदावरी-भीमेची पात्र खोदून लोक पाणी शोधू लागलेत. यमुना, कावेरी, कृष्णेची माळराने झालीत. सुजलाम सुफलाम देशाच्या २५ टक्के भूभागाचे माळरान झालेय. मी ‘माळरान’ शब्द का वापरतोय कळतेय ना? कारण वाळवंट म्हणायला नदीत वाळू असावी लागते.वाळूच जलस्तर कायम राखू शकते. मातीत पाणी धारण करण्याची क्षमता नसते आणि जैवविविधतेचे सृजन वाळूच्या पाण्यातच होते, सुकलेल्या यमुनेच्या पात्रात नव्हे. आजमितीला बारमाही वाहणारी कृष्णा नदी चार महिने समुद्रापर्यंत पोहोचू शकत नाही, तर कावेरी तीन ते साडेतीन महिने समुद्रापासून दूर असते. या पुढच्या पिढीसाठी धोक्याच्या घंटा नाहीत का? हजारो-लाखो वर्षे खळखळ-धोधो वाहणाºया या नद्या शायनिंगच्या नादात सिमेंटच्या जंगलापायी बांधकाम माफिया, जंगल माफिया-वाळूमाफियांबरोबरच हातमिळवणी करून, आपल्या एका पिढीनेच नष्ट करून टाकल्या. यातून निर्माण होणारा धोका आता तरी ओळखायला हवा.

(लेखक सामाजिक कार्यकर्ते आहेत) 

टॅग्स :riverनदीwater shortageपाणीटंचाई