अक्षय पात्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 12:31 AM2017-10-10T00:31:18+5:302017-10-10T00:40:20+5:30

हुबळी इथल्या मेगा किचनमध्ये अनुभवलेल्या पाकसिद्धीची चविष्ट कहाणी... रोज दीड लाख मुलांसाठीचं जेवण शिजवणा-या आशियातल्या सर्वांत मोठ्या ‘मेगा किचन’मध्ये पन्नास हजार लीटर उकळत्या सांबाराला फोडणी पडते तेव्हा...

 Renewable characters | अक्षय पात्र

अक्षय पात्र

Next

हुबळी इथल्या मेगा किचनमध्ये अनुभवलेल्या पाकसिद्धीची चविष्ट कहाणी...
रोज दीड लाख मुलांसाठीचं जेवण शिजवणा-या आशियातल्या सर्वांत मोठ्या ‘मेगा किचन’मध्ये पन्नास हजार लीटर उकळत्या सांबाराला
फोडणी पडते तेव्हा...
विश्वास बसू नये, अशी एक चविष्ट सफर!
कृष्णाच्या थाळीतलं अन्न  कधी संपत नसे म्हणतात. मी अशाच एका स्वयंपाकघरात पोहचले होते. हुबळी आणि धारवाड या दोन देखण्या गावांच्या मध्ये आशिया खंडातलं हे सर्वात मोठं आणि अत्याधुनिक स्वयंपाकघर आहे.
इथं रोज सकाळी १२००० ते १५००० किलो गरमागरम भात शिजतो. तब्बल २५ हजार लिटर सांबार तयार होतो. या सांबारासाठी ८००० ते ९००० किलो भाज्यांचा वापर केला जातो. ज्या दिवशी गव्हाचं पायसम किंवा हुग्गी (एक प्रकारचा शिरा) असतं, त्या दिवशी इथं शिजलेल्या साजूक तुपातल्या हुग्गीचं वजन असतं ७०००० किलो. स्वयंपाकाला सुरुवात होते पहाटे ३.३० वाजता. ८.३० च्या आत सगळे पदार्थ तयार असतात. अवघ्या चार तासांत तयार झालेलं हे अन्न मग इन्सुलेटेड वाहनांमधून हुबळीच्या जवळच्या शाळांच्या दिशेनं धावायला लागतं.
ठरवून दिलेल्या वेळात एकूण ८०७ शाळांपर्यंत पोहचतं. त्या शाळांमधली १,३६,१११ मुलं रोज दुपारी अंगतपंगत करून जेवतात.

-सायली राजाध्यक्ष

२,१२,५२१ प्रतींचा खप ओलांडणारं मराठी प्रकाशन विश्वातलं सन्मानाचं, देखणं आणि समृद्ध पान. पाने २५६ : मूल्य २०० रुपये
प्रसिद्धी : दिवाळीच्या पणत्या अंगणात लागण्याच्या कितीतरी आधी!
तुमची प्रत राखून ठेवण्यासाठी ई-मेल करा :  sales.deepotsav@lokmat.com 
आॅनलाईन बुकिंग करा :  www.deepotsav.lokmat.com  
नाव-पत्ता आणि फोन नंबर लिहून व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवा : 8425814112

Web Title:  Renewable characters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :diwaliदिवाळी