उमेश शर्मा
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, २७ जुलै २०१९ रोजी झालेल्या ३६व्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीमध्ये कोणत्या शिफारशी करण्यात आल्या आहेत?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, ३६व्या जीएसटी कौन्सिलच्या सभेत काही वस्तू व सेवा पुरवठ्यांच्या जीएसटी दरात बदल करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. तसेच अंतिम तारखांमध्ये वाढ करण्यात यावी हेदेखील त्यात समाविष्ट आहे.अर्जुन : कृष्णा, वस्तू व सेवा पुरवठ्यासंबंधीच्या जीएसटी दराविषयी कोणती शिफारस करण्यात आली आहे?कृष्ण : अर्जुना, वस्तू व सेवा पुरवठ्याच्या दराबाबतीत बदल खालीलप्रमाणे आहेत :इलेक्ट्रिक वाहनांवरील दर हे १२ टक्क्यांवरून ५ टक्के करण्याबाबत.चार्जर तसेच इलेक्ट्रिक वाहनांसाठी असलेले चार्जिंग स्टेशन यांवरील दर हे १२ टक्क्यांवरून ५ टक्के करण्याबाबत.स्थानिक प्रशासनाला चार्जर तसेच इलेक्ट्रिक बसेस भाड्याने देण्यासंबंधी जीएसटीत सूट देण्यात आली आहे. चार्जर तसेच इलेक्ट्रिक बस ज्याची क्षमता १२ व्यक्तींपेक्षा जास्तीची आहे त्याला सूट देण्यात आली आहे. हे बदल १ आॅगस्ट २०१९ पासून लागू होतील.अर्जुन : कृष्णा, फॉर्म ॠरळ उटढ-02 कशासंबंधी आहे? त्याबाबतीत असलेली वाढीव अंतिम तारीख कोणती?कृष्ण : अर्जुना, जेव्हा पुरवठादाराला कम्पोझिशन स्कीमअंतर्गत यायचे आहे, त्या वेळेस त्याला ते शासनाला माहिती देणे जरुरीचे आहे व हे फॉर्म ॠरळ उटढ - 02 द्वारे करता येईल. ॠरळ उटढ - 02 द्वारे कर भरण्याच्या पर्यायांचा लाभ घेण्यासाठी सेवा पुरवठादाराने माहिती दाखल करण्याची अंतिम तारीख ही ३१ जुलै २०१९ वरून ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत वाढविण्यात आली आहे. हा दोन महिन्यांचा कालावधी आहे.
( लेखक चार्टर्ड अकाऊंटंट आहेत )