शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

समलिंगी संबंधांना मान्यता; समाजाचे प्रगतीच्या क्षेत्रात नवे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 03:02 IST

समलिंगी संबंधांना अपराध ठरविणारे भारतीय दंडसंहितेचे ३७७ वे कलम घटनाबाह्य ठरवून सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने व्यक्तिस्वातंत्र्याच्या कक्षेत आणखी मोठी वाढ केली आहे.

समलिंगी संबंधांना अपराध ठरविणारे भारतीय दंडसंहितेचे ३७७ वे कलम घटनाबाह्य ठरवून सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने व्यक्तिस्वातंत्र्याच्या कक्षेत आणखी मोठी वाढ केली आहे. आजवर या कलमाने असे संबंध ठेवणाऱ्यांना गुन्हेगार ठरवून शिक्षा सुनावल्या होत्या. या संबंधांची चर्चाही समाजात अनैतिक व असामाजिक ठरविली गेली होती. मात्र पाश्चात्त्य जगातील अनेक प्रगत देशांनी या संबंधांना नागरिकांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावरील एक अनिष्ट नियंत्रण ठरवून त्यांना मोकळीक देणारे कायदे आपल्या विधिमंडळात मंजूर केले वा त्यांना प्रशासकीय मान्यता दिली. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा हे तर आपल्या भाषणांची सुरुवात ‘लेडीज, जंटलमेन अ‍ॅन्ड गेज’ अशी करून समलिंगी संबंधांचे केवळ समर्थनच करीत नसत तर त्यांना सांस्कृतिक मान्यता मिळवून देण्याचाही प्रयत्न करीत. व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा आरंभ तिच्या स्वत:च्या देहावरील संपूर्ण व अमर्याद अधिकारापासून होतो. आपला देह आपण कसा वापरायचा वा वापरू द्यायचा याविषयीचा संपूर्ण अधिकार त्या देहधारी व्यक्तीला असावा. त्या अधिकारावर दुसºया कुणाचेही, अगदी पती किंवा पत्नीचे नाते सांगणाºयाचाही हक्क नसावा, अशी भूमिका अलीकडच्या काळात अनेक प्रगत समाजांनीही घेतली. भारतातही पतीने पत्नीवर केलेला जबरी संबंध हा आता अपराध ठरविला गेला आहे. लैंगिक बाब ही शारीरिक आहे आणि ती व्यक्तीच्या स्वत:च्या शरीरावरील अधिकाराशी संबंधित आहे ही बाब जगाने आपल्या प्रगतीच्या वाटेवर मान्य केली आहे. मात्र अनेक कर्मठ व प्रतिगामी वर्ग आणि त्यांच्या संघटना, या अधिकारामुळे समाजात अनैतिकतेला वाढ मिळेल, स्त्रियांवरील अत्याचार वाढतील आणि समाजात एकूणच विस्कळीतपणा येईल अशी कारणे पुढे करून विरोध करीत होत्या. समाजातील काही संघटनांची ही भूमिका आणि घटनेने मान्य केलेला व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार यातील हा संघर्ष होता. त्यात व्यक्तिस्वातंत्र्याचा विजय होणे अपरिहार्य व आवश्यकही होते. ग्रीकांचा इतिहास या परंपरेचाही इतिहास आहे. सॉक्रेटिस, प्लेटो किंवा अ‍ॅरिस्टॉटल यांच्या अशा संबंधांची चर्चा तेथील मान्यताप्राप्त ग्रंथातही आली आहे. अहिताग्नी राजवाडे यांच्या भाष्यग्रंथातही या संबंधांचा साधा व मान्यताप्राप्त उल्लेख आला आहे. याखेरीज समाजाने उघडपणे मान्य केले असो वा नसो हे संबंध इतिहासात नेहमीच राहिले व वर्तमानातही ते तसे आहेत. स्कॅन्डीनेव्हिअन देशात या संबंधांना फार पूर्वी मान्यता मिळाली. आयर्व्हिंग वॅलेस या प्रसिद्ध कादंबरीकाराने त्या देशातील अशा संबंधांचे अतिशय खुले वर्णन आपल्या द प्राईज या कादंबरीत केले आहे. अगदी अलीकडे हिंदीत निघालेल्या द वॉटर या स्त्रियांच्या समलिंगी संबंधांवर आधारलेल्या चित्रपटाने काहीसा गहजब माजविला होता. त्यात काम करणाºया स्त्रियांची नावे सीता आणि गीता अशी ठेवली असल्याने शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे यांनी त्याला आक्षेप घेतला होता. मात्र तो आक्षेप त्या स्त्रियांच्या हिंदू नावांविषयीचाच होता. प्रत्यक्ष चित्रपटाला त्यांनीही विरोध केला नव्हता. केवळ पुरुषांच्या वा स्त्रियांच्या संघटनांकडून समलिंगी संबंधांवरील निर्बंधाला फार पूर्वीपासून आक्षेप घेतले गेले. विशेषत: लष्करी संघटनांनी या आक्षेपांना सरळ वाचाही फोडली होती. अलीकडच्या काळात अमेरिकेत सुरू झालेल्या ‘मी टू’ सारख्या चळवळी हा या मूक आक्षेपांचाच उद्रेक आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय एकाएकी साºया समाजात मान्य होईल याची शक्यता कमी आहे. त्याला कोणताही पक्ष वा संघटना जाहीरपणे मान्यताही देणार नाही. मात्र व्यक्तिस्वातंत्र्य ही सामाजिक, राजकीय वा जातीय मान्यतेवर आधारलेली बाब नाही. ती सर्वस्वी व्यक्तिगत व खासगी स्वरुपाची बाब आहे.ती तशीच पाहिली पाहिजे व संबंधिताला ती अनुभवता येईल अशी सामाजिक स्थितीही तयार केली पाहिजे. एका अर्थाने या निकालाने समाजाचे प्रगतीच्या क्षेत्रात एक नवे पाऊलच पुढे केले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय