शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर, EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार
2
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
3
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
4
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
5
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
6
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
7
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
8
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
9
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
10
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
11
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
12
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
13
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
14
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
15
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
16
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
17
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
19
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
20
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा

‘नाइटलाइफ’चे वास्तव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 5:08 AM

मुंबईच्या कमला मिल कम्पाउंडमधील ‘पब हब’ला लागलेल्या आगीने १४ बळी घेतले.

मुंबईच्या कमला मिल कम्पाउंडमधील ‘पब हब’ला लागलेल्या आगीने १४ बळी घेतले. वर्षाअखेरीचा ‘मूड’ साजरा करणाºया मुंबईकरांच्या उत्साहावर या भीषण घटनेने विरजण पडले आहे. या घटनेनंतर निर्माण झालेल्या दबावामुळे महापालिका आयुक्तांना पाच अधिकाºयांना निलंबित करावे लागले. येथील स्थानिक नगरसेवक, वॉर्ड आॅफिसर यांच्यावरही कारवाई व्हायला हवी. या परिसरातील अनधिकृत पबविरोधात पालिकेला पत्रेही दिली होती. परंतु तेथील अधिकाºयांनी केलेली डोळेझाक प्रचंड महागात पडली. या दुर्घटनेनंतर ‘नाइटलाइफ’ आणि ‘रूफटॉप’ हॉटेलचा आग्रह धरणाºया नेत्यांनी सुरक्षेची दुसरी बाजू समजावून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. ही मायानगरी झगमगीत ठेवण्यासाठी निष्पापांच्या मृतदेहांचा खच पडायला हवा का? याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. कमला मिल परिसरात तर तब्बल ९६ हॉटेल्स, पब सुरू आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेले ‘पब हब’ कुणाच्या तरी आशीर्वादाने चालत असणार हेही सगळ्यांना माहीत आहे. कमला मिलमधील अनेक व्यवसायांमध्ये मोठमोठ्या अधिकाºयांची भागीदारी आहे. त्यामुळे येथील कारभार बिनबोभाट सुरू होता. प्रशस्त हॉटेलमध्ये मिळणाºया कमाईनंतर येथील मालकांची नजर ‘रूफटॉप’वर गेली. आधीच ‘नाइटलाइफ’ जगणाºया मुंबईकरांनीही ‘रूफटॉप’ हॉटेलना प्रतिसाद दिला. त्याला राजकीय वरदहस्त लाभल्याने अशी रूफटॉप हॉटेल्स पुरेशा परवान्यांविना सुरू होती. त्यांना ना फायर आॅडिट, ना वापराचा परवाना. एखादा अधिकारी आलाच तर चिरीमिरी देऊन त्याची पाठवणी व्हायची. या भ्रष्ट दलदलीची परिणती म्हणजेच हे १४ जणांचे बळी. वर्षभरात एल्फिन्स्टनपासून भायखळा इमारत दुर्घटनेपर्यंत शेकडो निष्पाप बळी गेले. हे सारे बळी प्रशासकीय अधिकाºयांच्या निष्काळजीचे होते हेही वास्तव आहे. उगीचच पाश्चिमात्य देशांतील शहरांची तुलना करत तश्शीच मुंबई घडविण्यात काही अर्थ नाही. येथील चमचमणाºया दुनियेबरोबरच सुरक्षित आयुष्याची खात्री असेल तरच अशा शहरांना अर्थ आहे. ज्या हॉटेल, पबमध्ये रममाण होतो, ती जागा कितपत सुरक्षित आहे, याचा विचार आता प्रत्येकानेच करायला हवा. हॉटेल, पबसारख्या सार्वजनिक ठिकाणांची पुरेशी सुरक्षितता न बाळगणाºया मालकांविरुद्ध हत्याकांडाचे कलमच लावायला हवे. ग्राहकांच्या पैशावर जगणाºया अशा व्यावसायिकांना कठोर कायद्याचा जाबच नियंत्रणात ठेवू शकतो. पैशाच्या मुजोरीवर कुणालाही वाचवू शकतो, अशा मस्तीत वावरणाºया साºयांनाच धडा मिळेल अशी शिक्षेची तरतूद हवी. तरच अशा दुर्घटना टाळू शकू. २०१७च्या वर्षाची अखेर या भीषण दुर्घटनेने झाली असली तरी सुरक्षेची नवी पहाट घेऊन नवे वर्ष येईल अशी आशा तूर्त धरायला हरकत नाही.