शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
2
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
3
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
4
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
5
Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
6
Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
7
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 
8
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
9
सोमवती अमावस्या आणि लक्ष्मी पूजनाचा दुर्मिळ योग; 'या' ७ राशींच्या आयुष्याला मिळणार कलाटणी
10
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
11
Mohammed Shami: शमीनं निवड समितीची केली बोलती बंद, रणजी स्पर्धेत ७ विकेट्स घेऊन दिला फिटनेसचा पुरावा!
12
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
13
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
14
IAS Ankita Chaudhary : "कधीही हार मानू नका, कारण..."; आईचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय, IAS अंकिताचा मोलाचा सल्ला
15
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?
16
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांचे 'रॉकेट' जमिनीवरच, भारतानं वाढवली रशियन तेल खरेदी!
18
यंदा किंग खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, मोठं कारण आलं समोर
19
YouTuber Murder: युट्यूबर पुष्पाची आत्महत्या नव्हेतर हत्या! कारण काय, आरोपी कोण?
20
Tejashwi Yadav: तेज प्रताप यादवांनी भावाविरोधात उतरवला उमेदवार, राघोपूरमधून प्रेम कुमार यादव लढणार

वाचनीय लेख - खग्रास सूर्यग्रहणाच्या हुलकावणीची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 10:13 IST

खग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी ग्रहणाच्या मार्गात असलेली अमेरिकन शहरं आणि गावांत लोकांची झुंबड उडाली होती. त्या दिवशी प्रत्यक्षात काय झालं?

शोभा चित्रे

सकाळी मी चहाचा कप घेऊन डायनिंग टेबलपाशी आले. खिडक्यांचे पडदे उघडले.  बाहेर अखंड हिमवर्षाव सुरू होता. पानं गळलेले उंचच उंच वृक्ष, काटकुळ्या फांद्या आणि शेंड्यांवर हिमकणांचा अभिषेक! आयुष्याची ३५ हून अधिक वर्ष वाॅशिंग्टन, मेरीलॅन्ड, आणि न्यू जर्सीला घालवली, अनेक हिमवादळं पाहिली. घराभोवती झालेला फूट, फूट बर्फाचा ढिगारा आणि त्यातून वाट काढताना, तो बाजूला सारताना झालेली दमछाक... तरीही प्रत्येक गोष्टीत वेळ महत्त्वाची असते. आज एप्रिलची ५ तारीख. आता हा हिमवर्षाव व्हायला हवाय का?

तेरा वर्षांपूर्वी आम्ही या असल्या हवेपासून दूर फ्लोरिडाला स्थायिक झालो. पण मी इथे आलेय ती मुलाकडे न्यू याॅर्क राज्यातल्या राॅचेस्टर या गावी. त्याला कारणही तसंच आहे!.. आज इथे खग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. कधीपासून मी उत्सुकतेने वाट पाहिलीय. मी ग्रहण बघायला जातेय हे कळल्यावर मैत्रिणींकडून त्यांनी पाहिलेल्या ग्रहणाच्या गोष्टी ऐकल्या. माझा उत्साह आणखी वाढला. तर अशी मी १ एप्रिललाच राॅचेस्टरला डेरेदाखल झाले. विमानतळावरून बाहेर गाडीपर्यंत जाईपर्यंत इथल्या थंडीने मला कवटाळण्याचा प्रयत्न केलाच. मी पुरता बंदोबस्त करून होते. दुसऱ्या दिवसापासून पावसाची रिपरिप सुरू झाली.. आणि आज ग्रहणाच्या दिवशी तर चक्क हिमवर्षाव. आम्ही सगळे हवामान विभागाचा अंदाज बघत होतो.  सुरूवातीला चांगला लखलखीत दिवस दाखवत होते. मग हळूहळू त्या सूर्यप्रकाशाला ढग ग्रासू लागले आणि आता तर फक्त ढगाळ हवेचा अंदाज. मात्र गावात टीव्हीवर, बातम्यांत सगळीकडे उत्साही वातावरण.  शेवटी तो हिमवर्षाव थांबला. सूर्यकिरणं बाहेर डोकावली. हवामान विभागाकडे दुर्लक्ष करून मी या प्रकाशाचं मनापासून स्वागत केलं. सगळीकडे ग्रहणाच्या बातम्यांना अग्रक्रम. मेक्सिकोपासून दिसणारं हे खग्रास ग्रहण टेक्सासमधून सरकत पुढे कुठल्या कुठल्या राज्यात त्याचा कसा प्रवास असेल ते दाखविण्यात येऊ लागले. हा दुर्मिळ योग गाठण्याची अनेकांची धडपड. लाखो लोक वेगवेगळ्या राज्यांतून या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निघाले. त्यातले काही विमान प्रवास करणार होते, तर काही  मुलाबाळांसह गाड्या दामटत प्रवासाला निघाले. हे फारच भारी होतं.

अमेरिकेत काही अगदी लहान गावांतूनही हे ग्रहण दिसणार होतं. त्या गावातली सगळी हाॅटेल्स भरली. गावाच्या लोकसंख्येच्या दुप्पट, चौपट संख्येने बाहेरगावाहून लोक येणार, अशी चिन्हं दिसू लागली. गावाचा मेयर आणि इतर व्यवस्थापक यांची धाबी दणाणली. एवढ्या लोकांची राहण्या, जेवण्याची व्यवस्था, त्यांची सुरक्षा, ट्रॅफिकची व्यवस्था, वैद्यकीय मदत एक ना अनेक प्रश्न!  नायगारा फाॅल्सवरून सर्वांत चांगलं ग्रहण बघायला मिळेल, असं नॅशनल जिओग्राफिकने जाहीर केल्याने लोकांची तिकडे जाण्यासाठी झुंबड. शिवाय ग्रहणाआधी गावा-गावातून ग्रहण ही थीम ठेवून आखलेले कार्यक्रम. आम्हालाही एका कन्सर्टला जायचं होतं. असं सगळीकडचं ग्रहणमय वातावरण. पण ग्रहणाच्या दिवशी सोमवारच्या सकाळी हा आनंद काही फार काळ टिकला नाही. हळूहळू ढगांनी पाठशिवणीचा खेळ सुरू केला. घटिका भरू लागली. दुपारी एकनंतर आम्ही सगळे ग्रहणाचा सोहळा बघायला जवळच्या गोल्फफोर्सवर जाणार होतो. 

आमचा मोठा नातू अनायसे काॅलेजला ‘विंटर ब्रेक’ असल्याने घरी आला होता. आज मुद्दाम ग्रहण बघायला लांबून त्याचे मित्र-मैत्रिणी येणार होत्या. आम्ही जायला निघालो. गोल्फकोर्सच्या कंट्रीक्लबवर दुपारपासून सेलिब्रेशन सुरू झालं. गप्पागोष्टी, खाणं-पिणं सगळं उत्साही, आनंदी वातावरण. धमाल!  आकाश मात्र निळाई हरवलेलं. सैरावैरा धावणारे ढग नव्हते; एक घट्ट राखाडी आच्छादन. कुठूनतरी सूर्याची किरणं बाहेर येतील, अशी शक्यताच नव्हती.  तरीही शेवटच्या क्षणी काहीतरी चमत्कार होईल, असंही काही लोकांचं म्हणणं पडलं. ग्रहण लागण्याची वेळ जवळ येऊन ठेपली. हवेतला गारवा एकदम वाढला. कुणीतरी  फायर प्लेस लावली आणि एकदम अंधार घेरून आला. भरदुपारी मिट्ट अंधार. हा अंगावर आलेला अंधार हवेतली वाढलेली थंडी आणि आकाशाकडे डोळे लावून उभे असलेले आम्ही! हळूहळू अंधार दूर झाला. सगळं कसं पूर्ववत. त्या स्वर्गीय क्षणानं आम्हाला हुलकावणी दिली होती.टीव्हीवर ग्रहणाच्या बातम्या, ठिकठिकाणी चाललेला जल्लोष, खग्रास ग्रहणाचे मनोवेधक फोटो, ते बघताना जखमेवर मीठ चोळल्यासारखं क्षणभर वाटलं. पण दुसऱ्याच क्षणी ती भावना विरली. हा चमत्कार आपल्याला बघायला मिळतोय हे मोठंच. शेवटी निसर्ग म्हणजे गूढच-तो त्याची जी रूपं दाखवेल ती पाहायची. मात्र त्याचा अवमान करून त्याला उग्ररूप दाखवायला भाग पाडायचं नाही, एवढंच आपल्या हातात.

...अमेरिकेतून दिसणारं पुढचं खग्रास ग्रहण बघायला मी नसेन, पण जगाच्या पाठीवर कुठेतरी पुढे-मागे बघता येईल नं? वयाची आठ दशकं सरत आली, पण म्हणून काय झालं?.. देअर इज ऑलवेज अ  नेक्स्ट टाइम ! असा विचार करतच होते, तेवढ्यात अटलांटाहून प्रियाचा, सुनेचा फोन आला. ती म्हणाली, ‘माॅम, पुढचं खग्रास ग्रहण अटलांटाहूनच पुढे जाणार आहे. साल आहे २०७८ मे महिना.!’मी म्हटलं, नक्की येते! फक्त आधी हवामान विभागाचा अंदाज घे...”- आम्ही हसत सुटलो.

ख्यातनाम लेखिका,टॅम्पा, फ्लोरिडा shobha_chitre@hotmail.com 

टॅग्स :Americaअमेरिकाsolar eclipseसूर्यग्रहण