PM Narendra Modi Birthday: पंतप्रधान मोदींसाठी सत्ता हे सुख नव्हे, ही तर जनसेवेची संधी!: राजनाथ सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 08:55 AM2021-09-17T08:55:26+5:302021-09-17T08:56:00+5:30

गेल्या सात वर्षांत अनेक युगांतकारी निर्णय झाले.

rajnath singh says for pm modi power is not happiness it is an opportunity for public service pdc | PM Narendra Modi Birthday: पंतप्रधान मोदींसाठी सत्ता हे सुख नव्हे, ही तर जनसेवेची संधी!: राजनाथ सिंह

PM Narendra Modi Birthday: पंतप्रधान मोदींसाठी सत्ता हे सुख नव्हे, ही तर जनसेवेची संधी!: राजनाथ सिंह

Next

गेल्या सात वर्षांत अनेक युगांतकारी निर्णय झाले. अर्थव्यवस्था आत्मनिर्भर करणे, सशक्त समाज, समावेशी विकास, सशक्त महिला आणि युवक, या सगळ्यामागे एकच विचार आहे’ सबका साथ सबका विकास, सबका विश्वास. देश आणि समाजाशी याबाबतीत कटिबद्ध असलेल्या या शक्तीचे नाव आहे नरेंद्र मोदी.  त्यांचा माझा परिचय तसा खूप जुना. पण ते गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यावर तो वाढला. तेंव्हा मी उत्तरप्रदेशाचा मुख्यमंत्री होतो. विकासाविषयी त्यांचा दृष्टिकोन आणि निष्ठेने मला प्रभावित केले. २०१४ साली लोकसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही एकत्र काम केले. नंतर त्यांच्या मंत्रिमंडळात आधी गृह आणि पुढे संरक्षणमंत्री म्हणून काम करताना  एक नेता, प्रशासक आणि व्यक्ती म्हणून मोदी यांना मी अधिक जवळून पाहिले.

नेतृत्व क्षमता, कल्पनाशक्ती, देश विकासाबद्दल कळकळ आणि कठीण समयी निर्णय घेण्याची क्षमता, सहजता या चार गुणांनी मोदी यांचे व्यक्तिव मंडित झाले आहे. समाजाच्या सर्व स्तरांना स्पर्श करणारे निर्णय त्यांनी घेतले. प्रारंभीच सरकार गरिबांना समर्पित करत असल्याची घोषणा केली. गरीब, शोषित, कमजोर वर्गासाठी अनेक निर्णय घेतले. लोकांच्या जगण्याशी जोडलेल्या प्रश्नांवर केवळ उत्तरे शोधली नाहीत तर ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. भारत बांगलादेश सीमा समझोता हा असाच एक निर्णय होता. 

मोदींच्या  कूटनीतीविषयी कमी लिहिले, बोलले जाते. भारत बांगला देशात गेली ४१ वर्षे सीमावाद होता. मोदींनी भूमी सीमा समझोता करून इतिहास रचला. दोन्ही  देशात शिखर बैठका सुरु झाल्या. त्यावेळी मी गृहमंत्री होतो. सीमावादात दोन्हीकडचे हजारो लोक होरपळत होते. त्यांचे नशीब उजळले. मोदींजींची नेतृत्वक्षमता जगाने मान्य केली, अशा आणखी दोन गोष्टी. २०१६ साली उरीच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला झाला. मोदींनी सीमा ओलांडून उत्तर देण्याची अनुमती भारतीय २०१९ साली पुलवामात केंद्र राखीव पोलिसांच्या तळावरील हल्ल्यात मोठी प्राणहानी झाली. भारतीय वायुसेनेने बालाकोटवर हल्ला चढवून चोख प्रत्युत्तर दिले. मोदींच्या निर्णयात दृढता आहे. कारण ते आपले पद विशेषाधिकार नव्हे तर राष्ट्रीय कर्तव्य मानतात. सत्ता सुख भोगण्याची नव्हे तर जनसेवेची संधी म्हणून त्याकडे पाहतात.
 

Web Title: rajnath singh says for pm modi power is not happiness it is an opportunity for public service pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.