शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

स्वत:विषयी प्रश्नचिन्ह?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 4:02 AM

जीवनातील समस्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात, त्यावर आत्महत्या हा कायमस्वरूपी इलाज नाही.

- गौतम गवळीजीवनातील समस्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात, त्यावर आत्महत्या हा कायमस्वरूपी इलाज नाही. (suicide is not a permanent solution to temporory problems) कुठलाही देश जसा संकटमुक्त नसतो तसेच व्यक्तीचे आयुष्यही संघर्षविरहित नसते. संघर्ष हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. संघर्षाचे व्यवस्थापन करणे हाच त्याच्यावर उपाय असू शकतो.एखाद्या व्यक्तीचे समाजावर प्रभावीपण असेल, इतरांच्या आयुष्यातील काही समस्या सोडविण्याचे ते काम करत असतील, पण स्वत:मध्ये निराशा, सहिष्णुतेचा अभाव (Low frustration, tolerance) आपल्या हातून झालेल्या चुकांमुळे येणारी दोषीभावना, नकारात्मक विचार, वर्तनविषयक उथळपणा (impulsive) पलायनवादी विचार, वैयक्तिक संघर्ष आणि कौटुंबिक कलहाबरोबरच काही प्रमाणात मानसिक आणि शारीरिक आजारपण ही आत्महत्येची कारणे त्यांच्यामुळे प्रामुख्याने असतात. आपल्या वैयक्तिक समस्या सोडवण्यात त्या अपयशी होताना स्वत: पाहतात. तेव्हा त्यांची भव्यता/मोठेपण धोक्यात आल्याचे त्यांना जाणवते. काही अंशी आपल्यामधील आत्मप्रौढी त्यांना इतरांचा किंवा त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेण्यापासून वंचित करते. आपण एक विशेष व्यक्ती म्हणून निर्माण झालेली आत्मप्रतिमा धोक्यात येईल, अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकते. इतरांचे आयुष्य नियंत्रित करत असताना आपल्या आयुष्यातील स्वनियंत्रण कमी होताना त्यांना दिसते. त्यामुळे त्यांच्यामध्ये हतबलता, निराशावाद तसेच स्वत:च्या योग्यतेवरच ते प्रश्नचिन्ह निर्माण करताना दिसतात. आपल्यामधील भव्यता त्यांना डगमगताना जाणवते. काही व्यक्तींच्या बाबतीमध्ये तर आत्मप्रीतीवाद असतो आणि जेव्हा त्यांचा समाजावरील किंवा इतरांवरील प्रभाव (web of influence) आणि शक्ती जेव्हा धोक्यात येते तेव्हा त्यांचे मानसिक समतोलत्व बिघडते. आणि या समस्यांपासून सुटका म्हणजे आत्महत्या असे त्यांना वाटण्याची शक्यता असते.(लेखक मुंबई विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत.)