शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

प्रश्न शिक्षक अन् शिक्षणाचा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 22:10 IST

केजी टू पीजी शिक्षणक्रमात शासन निर्णयाचा वारंवार होत असलेला गोंधळ अन् शिक्षक दिनी रस्त्यावर उतरणारे शिक्षक, प्राध्यापक या सर्व प्रक्रियेत सरकारचा विधायक हस्तक्षेप दिसत नाही, हे अधिक गंभीर आहे.

- धर्मराज हल्लाळे

केजी टू पीजी शिक्षणक्रमात शासन निर्णयाचा वारंवार होत असलेला गोंधळ अन् शिक्षक दिनी रस्त्यावर उतरणारे शिक्षक, प्राध्यापक या सर्व प्रक्रियेत सरकारचा विधायक हस्तक्षेप दिसत नाही, हे अधिक गंभीर आहे. चर्चा नाही, संवाद नाही. अशा परिस्थितीत शिक्षणाची सर्व पातळीवर थट्टा अर्थात् विनोद करण्याचे तर काम सुरू नाही ना, हा प्रश्न आहे. शिक्षक दिनी देशभर शिक्षकांचा गौरव सुरू असताना विनाअनुदानित शाळांमध्ये कार्यरत सुमारे ४५ हजार शिक्षक रस्त्यावर आहेत. त्यांनी ऐन शिक्षक दिनी आपल्या न्याय हक्कासाठी राज्यातील साडेसहा हजार शाळा बंद ठेवण्याचा निर्धार केला आहे. ज्यामुळे लाखो विद्यार्थी गुरुगौरव दिनी ज्ञानार्जनाला मुकतील. विनाअनुदानित शाळेसारखी स्थिती अनुदानित शाळांचीही आहे. जिथे अतिरिक्त तुकड्या झाल्या आहेत, तेथील ९ हजारांवर शिक्षक गेल्या अनेक वर्षांपासून विनावेतन काम करीत आहेत. जे शालेय शिक्षणाचे तेच उच्च शिक्षणाचे. सुमारे ११ हजार प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्यासाठी प्राध्यापकांनी शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला जेलभरो आंदोलन केले. शिक्षण खात्याचा पसारा लक्षात घेता प्रश्न कायम उभे राहतात. परंतु, विद्यमान सरकारच्या काळात जणू एकाही प्रश्नाला हातच लावायचा नाही, असा निर्धार केलेला दिसतो. चर्चाही होत नाही. एकिकडे विद्यापीठ अनुदान आयोगाला तासिका तत्वावरील काम करण्याची संकल्पना मान्य नाही.  अर्थात् सीएचबीवर काम करणाºया प्राध्यापकांनाही सहायक प्राध्यापकांएवढे वेतन असावे. त्यांना मानधन नव्हे, तर वेतन दिले पाहिजे, असे अपेक्षित आहे. परंतु, महाराष्ट्रात आजघडीला महाविद्यालयांमध्ये तासिका तत्वावरील प्राध्यापकांची संख्या सर्वाधिक झाली आहे. त्यांच्या मानधनात कसलीही वाढ नाही. प्राध्यापक, सहायक प्राध्यापकांचे वेतन आणि तासिका तत्वावरील प्राध्यापकांना मिळणारे वेतन (मानधन) यात प्रचंड तफावत आहे. एकिकडे राज्यातील विद्यापीठांचा दर्जा सुधारण्यासाठी व्यावसायिक संस्थेची नेमणूक करून अहवाल मिळविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी समिती गठित झाली आहे. पुणे विद्यापीठाचे कुलगुरु त्या समितीचे अध्यक्ष आहेत. प्रत्यक्षात अधिष्ठातांच्या नेमणुका नाहीत. प्राध्यापकांच्या नेमणुका नाहीत. तासिका तत्वावरील प्राध्यापक तुटपुंज्या वेतनावर काम  करतात अन् त्याचवेळी गुणवत्तेचे मूल्यमापन करण्यासाठी व्यावसायिक संस्था नेमल्या जातात. ही विसंगती प्राथमिक शाळेपासून ते विद्यापीठापर्यंत सुरू आहे. एकिकडे सुमारे १० हजारांच्या आसपास प्राध्यापकांची पदे रिक्त अन् दुसरीकडे निवृत्त होणाºया प्राध्यापकांची संख्या यामुळे उच्च शिक्षणाचा डोलारा तासिका तत्वावर उभारला आहे. शैक्षणिक क्षेत्रातील निर्णय दीर्घकाळ परिणाम करणारे असतात. जितक्या गतीने शासनाची परिपत्रके निघतात, तितक्याच वेगाने ती माघारी घेतली जातात. असे अनेकवेळा घडले आहे. धोरणात्मक निर्णय घेत असताना शिक्षण प्रवाहातील सर्व घटकांना विश्वासात घेतल्यास निर्णय फिरविण्याची वेळ येत नाही. नक्कीच सुधारणा करण्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतात. परंतु, संघटन आणि संघटनांची भूमिका विचारात घेऊन त्यांना शासन निर्णयाला अनुकूल करण्याची जबाबदारीसुद्धा राज्यकर्त्यांची असते. शिक्षकांना, संस्थांना अडचणीत आणणारा निर्णय झाला म्हणून त्यांचा विरोध आहे, अशी पळवाट सरकारला करता येत नाही. काळानुरुप बदल स्वीकारण्यासाठी शिक्षक, प्राध्यापकांनीही तयार असले पाहिजे. मुळातच शिक्षकांचे प्रश्न मांडत असताना शिक्षणाचे प्रश्नही संघटनांकडून मांडले गेले पाहिजेत. शिक्षण संस्थांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान नाकारता येत नाही. बाजार मांडल्याची काही उदाहरणे असतील. संस्था चालकांवर टीका करता येईल, अशी अनेक मुद्देही असतील. परंतु, सर्व संस्था ताब्यात घेऊन सरकार त्या चालवू शकेल, अशी परिस्थिती सरकारी यंत्रणेची तरी आहे का? आहे त्या शासकीय संस्थांमधील कारभार सर्वांना माहीत आहे. त्यामुळे शिक्षण संस्थांविषयी पूर्णत: नकारात्मक दृष्टिकोन शिक्षण व्यवस्थेचा घात करणारा ठरेल. सुधारणांबाबत आग्रह ठेवताना संस्थांनाही सहभागी करून घेतले पाहिजे. सरकारी यंत्रणा शिक्षण संस्थांबाबत सुडबुद्धीने वागत आहे, अशी प्रतिक्रिया उमटत आहे. एकूणच सरकारने सिंहावलोकन करून आहे ती व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि बदल करताना सर्वांना सोबत घेण्याची भूमिका घेतली पाहिजे. तरच निर्णय बदलण्याची वेळ येणार नाही. हे केवळ शालेय, उच्च शिक्षणातच घडते असे नाही. तर व्यावसायिक अभ्यासक्रमांबाबत देशपातळीवर घेतल्या जाणाºया परीक्षांसंदर्भानेही धरसोड वृत्ती दिसते. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देत असल्याचे सांगत वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशपूर्व परीक्षा वर्षात दोनदा घेण्याचा निर्णय झाला. निर्णयाला जितकी घाई केली, तितकाच तो निर्णय परत घ्यायलाही घाई केली.

टॅग्स :Educationशिक्षणnewsबातम्या