शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागाचा दिशादर्शक उपक्रम

By admin | Updated: August 13, 2016 05:36 IST

जेमतेम करवसुली - शासकीय अनुदानाचे तोकडे आर्थिक उत्पन्न आणि कर्ज परतफेड, कर्मचारी पगार व अग्रक्रमाच्या मूलभूत सुविधांचा ताळमेळ बसविण्यासाठी कसरत करणाऱ्या जळगाव महापालिकेने

- मिलिंद कुलकर्णीजेमतेम करवसुली - शासकीय अनुदानाचे तोकडे आर्थिक उत्पन्न आणि कर्ज परतफेड, कर्मचारी पगार व अग्रक्रमाच्या मूलभूत सुविधांचा ताळमेळ बसविण्यासाठी कसरत करणाऱ्या जळगाव महापालिकेने लोकसहभागातून मेहरूण तलावाचे रूप पालटवले आहे. पण एखादे चांगले काम सुरु झाले की, त्याला विरोध, टीका हे प्रकार याबाबतीतहीे आले. तलाव परिसरातील श्रीमंतांच्या रस्त्यासाठी हा उपक्रम राबविला, चौपाटी बनविताना तलावाची व्याप्ती कमी झाली अशा तक्रारी आल्यास्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादित आहेत. करवसुली आणि शासकीय योजनांद्वारे मिळणाऱ्या निधीवर विकास कामे करण्याची मदार असते. पुन्हा या दोन्ही स्त्रोतांकडून १०० टक्के निधी मिळेलच याची शाश्वती नसते.करचोरी, थकबाकीचे प्रमाण मोठे आहे. दर चार वर्षांनी कराचे फेरमूल्यांकन अपेक्षित असताना त्याकडे काणाडोळा केला जातो. प्रशासनाची उदासीनता आणि भ्रष्टाचार यामुळे १०० टक्के करवसुली हे स्वप्न ठरते. शासकीय योजनांचा निधी आणण्यासाठी प्रशासन व पदाधिकाऱ्यांमध्ये एकवाक्यता, पाठपुरावा या बाबी आवश्यक ठरतात. खासदार-आमदार एका पक्षाचे आणि संस्था पदाधिकारी दुसऱ्या पक्षाचे असल्यास राजकारण शिरते. विकास कामांमध्ये आडकाठी येते. त्यावर मात करीत लोक सहभागातून कामे करण्यावर अलीकडे जोर दिला जात आहे.औद्योगिक प्रतिष्ठानांसाठी सामाजिक उत्तरदायित्वासाठी ठरावीक निधी खर्च करण्याचे बंधन येण्यापूर्वी जळगाव शहरात लोक सहभागातून विकास कामे सुरू झाली होती. चौक सुशोभिकरणापासून या उपक्रमाला सुरुवात झाली. अनेक औद्योगिक व व्यापारी प्रतिष्ठानांनी चौक देखणे बनविले. खान्देशातील काव्यपरंपरेचा गौरव करणारा ‘काव्यरत्नावली’ चौक तर कल्पकतेचे अनोखे उदाहरण आहे. भवरलाल जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या चौकात साने गुरुजी, बालकवी, बहिणाबाई, कुसुमाग्रज, दु.आ. तिवारी यांच्या प्रसिद्ध कवितांच्या शिळा उभारल्या आहेत. रंगीत कारंजे, हिरवळ आणि हायमास्ट दिवे यामुळे हा चौक जळगावकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आणि अबालवृद्धांना दोन घटका करमणूक, गप्पांचा कट्टा बनला आहे. चौकात गाण्याची मैफील, पथनाट्य, पुस्तक प्रकाशन, राष्ट्रीय दिनाचे कार्यक्रम जल्लोषात होतात.महापौर नितीन लढ्ढा यांनी काव्यरत्नावली चौकाप्रमाणे जळगावचा मानबिंदू असलेल्या मेहरूण तलावाच्या खोलीकरण आणि विस्तारीकरणाचा उपक्रम उन्हाळ्यात हाती घेतला. लोक सहभागाचे आवाहन आणि पारदर्शक कामाची ग्वाही देताच औद्योगिक व व्यापारी प्रतिष्ठाने, वित्तीय संस्था, व्यावसायिक संस्था, दानशूर नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. लोक सहभागातून चांगले काम होत असल्याचे पाहून जलसंपदामंत्री गिरीश महाजन व जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी मदतीचा हात पुढे केला. कामाचा वेग वाढला आणि पावसाळ्यापूर्वी तलावाचे खोलीकरण व विस्तारीकरण पूर्ण झाले. तलावाच्या गळतीचे मूळ शोधून त्याची दुरुस्ती करण्यात आली. आता सुशोभीकरणाच्या कामाचे नियोजन सुरू झाले आहे. जिल्हा नियोजन मंडळातून निधी मंजूर झाला. अतिक्रमण, सांडपाणी, म्हशी, वाहने आणि धुणी धुण्याचा प्रकार या समस्यांवर मात करायची आहे. वृक्षराजी बऱ्यापैकी आहे. तिचे संवर्धन आणि नवीन लागवड याकडे महापालिका व स्वयंसेवी संस्थांचे लक्ष आहे.एखादे चांगले काम सुरु झाले की, त्याला विरोध, टीका हे प्रकार ओघाने आले. याबाबतीतही ते आलेच. तलाव परिसरातील श्रीमंतांच्या रस्त्यासाठी हा उपक्रम राबविला, चौपाटी बनविताना तलावाची व्याप्ती कमी झाली अशा तक्रारी आल्या. लोक सहभागातून चांगली कामे होऊ लागल्यास शासनदेखील मदतीचा हात पुढे करते, हे मेहरूण तलावाच्या कामातून दिसून आले. सगळीकडे अंधार दाटला असल्याचा कोलाहल सुरू असताना हा प्रयत्न आशेचा दिवा ठरत आहे.