शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

सध्याच्या काळात ग्राहक अधिक सजग असणे आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 4:58 AM

आपण आर्थिक उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरणाच्या मार्गावर वाटचाल करायला सुरुवात केली त्याला जवळपास तीन दशके होतील.

- प्रा. दिलीप फडके आपण आर्थिक उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरणाच्या मार्गावर वाटचाल करायला सुरुवात केली त्याला जवळपास तीन दशके होतील. निर्बंध, नियंत्रणे आणि परवान्यांचे युग संपले आणि अर्थव्यवस्थेत मोकळेपणाचे वारे वाहायला सुरुवात झाली. त्यापूर्वीच्या काळात आपला सतत सामना होत होता तो तुटवडा आणि टंचाईशी. ज्या मिळतील त्या वस्तू पवित्र मानून स्वीकाराव्या लागायच्या. विक्रीनंतर ग्राहकांना काही सेवा द्याव्या लागतात याची फारशी कुणाला जाणीव नव्हती. एकूणच ‘घ्यायचे तर घ्या नाहीतर चालू लागा’ असा उत्पादक आणि विक्रेत्यांचा खाक्या होता.त्या काळात ग्राहकांच्या तक्रारी येत असत त्या अगदी प्राथमिक स्वरूपाच्या असत. वस्तू न मिळणे, मिळाली तर तिचा दर्जा चांगला नसणे, नकली किंवा भेसळीच्या वस्तू मिळणे यासारख्या तक्रारी येत असत. सेवाक्षेत्र असे नामानिधान मिळायचे होते. बहुतेक ठिकाणी शासनाची मक्तेदारी होती. अकार्यक्षमता आणि दप्तरदिरंगाई यासारख्या गोष्टी अपरिहार्य होत्या.आज बाजारातली परिस्थिती झपाट्याने बदलली आहे. बाजारात ग्राहक म्हणून नवा मध्यमवर्ग तयार झाला आहे आणि त्याची ताकद अनुभवाला येते आहे. नवे तंत्रज्ञान आले आहे. संगणक आणि इंटरनेट यांनी अनेक गोष्टी आमूलाग्र बदलून टाकल्या आहेत. संगणक क्रांतीप्रमाणेच दुसरा मोठा बदल झाला आहे तो संज्ञापनामधल्या क्रांतीमुळे. नव्या पद्धतीने बाजारपेठांमध्ये व्यवहार सुरू झाले आणि पाहता पाहता स्थिती बदलली आहे. ग्राहक संरक्षणाच्या क्षेत्रातले जुने प्रश्न आता मागे पडले आहेत. आज नकली, भेसळीच्या वस्तू किंवा वजनमापाबद्दलच्या तक्रारी तुलनेने कमी झाल्या आहेत. यालाही काही कारणे आहेत. नवे कायदे आले आहेत. ज्या वस्तू पूर्वी सुट्या स्वरूपात मिळत असत, त्यातल्या कितीतरी वस्तू आज संवेष्टित स्वरूपात बाजारात मिळायला लागलेल्या आहेत. वस्तूबद्दलची महत्त्वाची माहिती आवेष्टनावर छापली जात असते. त्यामुळे ग्राहक आज पूर्वीइतका अंधारात राहत नाही. तांदूळ, डाळी, तेले किंवा दूध आणि त्यापासून तयार होणारे तूप वा लोणी यासारख्या अनेक वस्तूंचे ब्रँडिंग झालेले आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पादनात एकप्रकारचे प्रमाणीकरण झाल्याचे दिसते आहे. परदेशी बाजारातले बहुतेक सगळे मोठे ब्रँड्स आपल्याला आपल्या गावात सहजी उपलब्ध होत आहेत.ग्राहकांसमोरचे ऐंशीच्या दशकातले प्रश्न आज जवळपास निकालात निघालेले आहेत. कालच्यापेक्षा आजच्या ग्राहकाचे ग्राहकपण जास्त आरामदायक आणि सुखाचे झालेले आहे हे नक्की. पण आजच्या काळातल्या ग्राहकांना प्रश्नच नाहीत असे समजण्याचे कारण नाही. कदाचित कालच्यापेक्षा आजच्या ग्राहकांसमोर जास्त गंभीर आणि मोठ्या प्रमाणावरचे प्रश्न उभे आहेत, असे म्हणावे लागेल. बँकांमधल्या लहानसहान समस्या जरी आज शिल्लक राहिलेल्या नसल्या तरी अगदी मोठ्या शेड्युल्ड बँकाच काय राष्ट्रीयीकृत बँकासुद्धा आजसुरक्षित राहिलेल्या नाहीत. आपल्या ठेवी सुरक्षित राहतील की नाही याची ठेवीदारांना खात्री वाटत नाही. बिल्डर्स लबाडी करून ग्राहकांची प्रचंड फसवणूक करीत आहेत. बिल्टअप आणि कार्पेटचे गुणोत्तर प्रमाण हा गुंता सामान्य ग्राहकांच्या आकलनाबाहेरचा आहे. कन्व्हेयन्स न झालेल्या जागांचे प्रमाण प्रचंड आहे. आपली फसवणूक केवळ खासगी क्षेत्रातले व्यावसायिक करतात असेही नाही. अगदी सर्वशक्तिमान शासनसुद्धा ग्राहक म्हणून आपली फसवणूक करायला मागेपुढे पाहत नाही. रस्त्यांवर गोळा केले जाणारे टोल हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. कालच्यापेक्षा आजच्या ग्राहकांचे जीवनमान सुधारलेले आहे. ते जास्त सुखसोयींचे झालेले आहे हे नक्की. कालचे प्रश्न आज राहिलेले नाहीत हेदेखील खरे. पण त्यामुळे आजच्या ग्राहकाला आरामात निर्धास्तपणे जगता येईल अशी स्थिती आलेली आहे, असे मानणे चुकीचे ठरेल. कोणत्याही राजकीय पक्षाचे शासन आले तरी ग्राहकांच्या परिस्थितीत फारसा फरक पडत नाही हेदेखील आता लक्षात आलेले आहे.कालच्यापेक्षा अधिक गुंतागुंतीच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत असल्याने आज अधिक जागरूक - सजग आणि अधिक माहिती व ज्ञान असणारा ग्राहक असणे जास्त आवश्यक झालेले आहे. ग्राहक संरक्षणाच्या क्षेत्रातही आज जास्त जागरूक आणि तज्ज्ञता असणारा, अधिक चिकाटी असणारा आणि अधिक प्रभावीपणाने समस्या निराकरण करण्याची क्षमता असणारा कार्यकर्ता पूर्वीपेक्षा जास्त आवश्यक आहे. ग्राहक चळवळीचे आणि ग्राहकांचे भवितव्य त्यावरच ठरणार आहे.(लेखक ग्राहक चळवळीचे कार्यकर्ते आहेत)