अविश्वासामुळे चिंतित होते प्रणव मुखर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:24 AM2017-10-17T00:24:17+5:302017-10-17T00:27:06+5:30

काँग्रेससाठी संकटमोचक अशी ओळख असलेले भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचेवर १९८४ साली पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर त्यांच्या पक्षाने भरवसा ठेवला नाही, याची त्यांना खंत वाटली होती.

 Pranab Mukherjee was worried about unbelief | अविश्वासामुळे चिंतित होते प्रणव मुखर्जी

अविश्वासामुळे चिंतित होते प्रणव मुखर्जी

googlenewsNext

- व्यंकटेश केसरी
काँग्रेससाठी संकटमोचक अशी ओळख असलेले भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचेवर १९८४ साली पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर त्यांच्या पक्षाने भरवसा ठेवला नाही, याची त्यांना खंत वाटली होती. इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर पंतप्रधानपदासाठी पी.व्ही. नरसिंहराव यांचा विचार झाला आणि त्यानंतर त्या पदासाठी डॉ. मनमोहनसिंग यांची निवड करण्यात आली यामुळे त्यांना धक्का बसला होता आणि ते दुखावले गेले होते’’ असा खुलासा त्यांच्या द कोअ‍ॅलिशन इयर्स १९९६-२००२ या पुस्तकातून करण्यात आला आहे.
गेल्या शुक्रवारी या पुस्तकाचे विमोचन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकात त्यांनी नमूद केले आहे की, ‘‘पंतप्रधानपदाची दावेदार व्यक्ती ही अनुभवी राजकारणी असावी, असा विचारप्रवाह काँग्रेसपक्षात बळावला होता. त्या व्यक्तीला पक्षाचे व्यवहार आणि प्रशासन या दोन्ही गोष्टींचा अनुभव असायला हवा, याविषयी पक्षात एकमत झाले होते. त्यामुळे (सोनिया गांधींनी) डॉ. मनमोहनसिंग यांची निवड केली आणि त्यांनीही त्यास मान्यता दिली.’’
प्रणवदा यांच्या मतानुसार ‘‘सरकारात सामील होण्याची माझी इच्छा नव्हती आणि मी ही गोष्ट सोनिया गांधींजवळ बोलून दाखवली होती. पण मी सरकारमध्ये असायला हवे, कारण सरकार चालविताना माझी भूमिका महत्त्वाची राहणार होती. तसेच डॉ. मनमोहनसिंग यांना माझी मदत मिळाली असती’’ असे सोनियांना वाटत होते.

पर्याय सुचवा
२००७ साली जेव्हा डाव्या पक्षांनी राष्ट्रपतिपदासाठी माझ्या नावाचा पुरस्कार केला तेव्हा सोनिया गांधींनी मला बोलावून सांगितले की आपण संसद आणि सरकारचे प्रमुख स्तंभ आहात. त्याविषयी प्रणवदांनी पुस्तकात लिहिले आहे की माझ्याविषयीचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे, मला तो मान्य राहील. त्यानंतर २०१२ सालीसुद्धा चर्चेच्या ओघात सोनियाजी म्हणाल्या होत्या की या पदासाठी आपण सर्वात लायक व्यक्ती आहात पण सरकारात आपण महत्त्वपूर्ण भूमिका बजावीत असल्यामुळे राष्टÑपतिपदासाठी आपण एखादे पर्यायी नाव सुचवू शकता का? त्यावेळी मला वाटले होते की सं.पु.आ. चा राष्टÑपतिपदाचा उमेदवार म्हणून डॉ. मनमोहनसिंग यांचे नाव त्या पुढे करून माझ्याकडे पंतप्रधानपद सोपवतील.’’

मंत्रालयाबाबत विचारणा केली
त्यानंतर सोनिया गांधींनी प्रणवदा यांना विचारले की संरक्षण, गृह, विदेश किंवा वित्त या मंत्रालयांपैकी कोणते मंत्रालय हवे? त्यांची इच्छा होती की प्रणवदांनी संरक्षण मंत्रालय सांभाळावे. पंतप्रधानांच्या आर्थिक धोरणाविषयी मतभेद असल्यामुळे मुखर्जींनी वित्तमंत्रालय घेण्यास नकार दिला होता. संरक्षण मंत्रालय घेण्याबाबतही प्रणवदांनी टाळाटाळ करून त्यांनी विदेश मंत्रालयाऐवजी गृहमंत्रालय मिळावे अशी इच्छा व्यक्त केली होती. पण पदग्रहण समारंभाचे वेळी त्यांना समजले की त्यांच्याकडे संरक्षण मंत्रिपद सोपविण्यात येणार आहे.’’

पुस्तकात नमूद केलेल्या आणखी काही गोष्टी
- पंतप्रधान होण्यास सोनिया गांधींनी नकार दिल्यानंतर पंतप्रधानपदासाठी माझी निवड करण्यात येईल असे मला वाटले होते. कारण मला सरकारमध्ये काम करण्याचा भरपूर अनुभव होता.
- मी गृहमंत्रालयाचा भार स्वीकारावा असे लालूप्रसादांना वाटत होते. पण मी त्यास नकार दिला.
- सरकारचा भाग बनण्याची शरद पवार यांची इच्छा नव्हती. पण आपण आल्याने सरकार मजबूत होईल असे मी त्यांना म्हटले तेव्हा त्यांनी कृषिमंत्री पद स्वीकारण्यास मान्यता दिली.
- लोकसभा अध्यक्षपदी ए.आर. अंतुले यांच्या नावाची चर्चा सुरू होती. ती चर्चा शिवराज पाटील आणि मीराकुमार यांच्या नावापर्यंत पोचली तेव्हा सोमनाथ चॅटर्जी यांचे नाव मी सुचविले.
- मीडियाच्या काही स्तंभलेखकांनी असेही लिहून टाकले की कनिष्ठ व्यक्तीच्या (डॉ. मनमोहनसिंग) हाताखाली मी काम करणार नाही, त्यामुळे मी सरकारमध्ये सामील होणार नाही.

Web Title:  Pranab Mukherjee was worried about unbelief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.