शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

अडचणींची पॉवर.. ..पवारांची अडचण

By सचिन जवळकोटे | Published: December 27, 2017 11:10 PM

‘पुढच्या वर्षीचा गळीत हंगाम अडचणीचा ठरणार असून, कारखान्यांनी आतापासूनच तयारीला लागावे,’ असा सल्ला थोरले काका बारामतीकर यांनी दिला;

‘पुढच्या वर्षीचा गळीत हंगाम अडचणीचा ठरणार असून, कारखान्यांनी आतापासूनच तयारीला लागावे,’ असा सल्ला थोरले काका बारामतीकर यांनी दिला; मात्र ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरच्या ‘तोडमोड के जोड’ स्टाईलनं ‘पुढच्या वर्षी अडचणी वाढणार. आजच तयारीला लागा,’ एवढाच कळीचा फॉरवर्डेड मेसेज काकांच्या नावे फिरू लागला. हे वाचून कारागृहातील दाढीधारी नेत्यानं घाबरून आपला मफलर अधिकच घट्ट गुंडाळला. ‘तयारीला लागावं म्हणजे दाढी अजून वाढवावी की दोन-चार साहिंत्यिक पत्रं अधिक लिहावीत’ या विचारानं ‘भुज’मधील ‘बळ’ कासावीस होत गेलं.तिकडं ‘कणकवली’करांनाही घाम फुटला. कारण, ‘कोणत्याही परिस्थितीत आपण २०१७ मध्येच शपथ घेणार’ ही त्यांची स्वयंभूत भविष्यवाणी खोटी ठरण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिले होते. थोरल्या काकांचा शब्द खरा ठरला तर २०१८ मध्येही आपण कोकण किनाºयावर माशा मारत (की मासेमारी करत?) बसणार, या टेन्शनमध्ये त्यांनी देवेंद्रपंतांना कॉल केला; परंतु फोन सतत एंगेज होता. वंचित पुनर्वसितांपेक्षा बलाढ्य प्रस्थापितांकडून काय-काय अडचणी वाढतील, याचा शोध म्हणे पंत घेत होते. कारण, प्रस्थापितांच्या यादीतील एकनाथभाऊ जळगावकर, चंद्रकांतदादा कोल्हापूरकर अन् सुभाषबापू सोलापूरकर यांच्यापेक्षा त्यांना नितीनराव नागपूरकरांची चिंता अधिक होती. ‘मातोश्री’वर मात्र उद्धोंसह लाडके युवराज कानात कापसाचे बोळे घालून गाढ झोपल्याने त्यांनी हा मेसेज वाचलाच नाही. महाबळेश्वरहून परतल्यापासून म्हणे ते दोघे आपापले कान सेफ ठेवूनच फिरत होते.बारामतीतही थोरल्या काकांजवळ त्यांच्या लाडक्या युवराज्ञी आल्या, ‘बाबाऽऽ बाबाऽऽ मी कोणत्या तयारीला लागू’ असा लाडीक सवाल त्यांनी करताच काका बीडकडे बघत उत्तरले, ‘बेटा.. भविष्यात तुझ्यासमोर कोणत्या अडचणी राहतील, याचा विचार करून आतापासूनच तयारीला लागलोय. सध्याच्या ‘धनू अन् अजू’ युतीला शह देण्यासाठी लवकरच कोरेगावच्या ‘शशी’ला अध्यक्षपद देऊन टाकतोय ’- सचिन जवळकोटे

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार