शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

वृथा साहसवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 8:41 AM

लोकशाही प्रणालीत निकोप राजव्यवस्था अपेक्षित आहे. हे केव्हा शक्य आहे, जेव्हा राजव्यवस्थेतील सगळेच घटक निरपेक्षपणे कार्य करतील तेव्हाच. नागरिकांनी दिलेल्या कौलाचा आदर करीत भूमिका प्रामाणिकपणे पार पाडणे हे राजकीय पक्षांकडून अपेक्षित आहे.

- मिलिंद कुलकर्णीलोकशाही प्रणालीत निकोप राजव्यवस्था अपेक्षित आहे. हे केव्हा शक्य आहे, जेव्हा राजव्यवस्थेतील सगळेच घटक निरपेक्षपणे कार्य करतील तेव्हाच. नागरिकांनी दिलेल्या कौलाचा आदर करीत भूमिका प्रामाणिकपणे पार पाडणे हे राजकीय पक्षांकडून अपेक्षित आहे. तर प्रशासकीय यंत्रणेने जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या कायदेशीर निर्णयांची नियमानुसार अंमलबजावणी करणे, कायद्याला धरुन नसलेले निर्णय संबंधित यंत्रणेकडे पाठविणे अपेक्षित आहे. कायद्याची चौकट, प्रशासकीय रचना निश्चित आहे, त्याचे पालन करणे एवढेच अपेक्षित आहे. मात्र अलिकडे राजकीय पक्षांमध्ये संघर्ष, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेमध्ये संघर्षाचे प्रकार वाढू लागले आहेत. याला प्रमुख काही मुद्दे कारणीभूत आहेत. एक म्हणजे, स्वत:च्या पदाविषयी असलेला अहंकार, दुसऱ्याविषयी असलेला तिरस्कार, त्याला कमी लेखण्याची वृत्ती, आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे साहसवादातून दुसृ-याच्या अधिकारावर अतिक्रमण करण्याची खोड...हे टाळले गेले तर राजव्यवस्था घटनेनुसार सुरळीत चालू शकेल.

जळगाव महापालिकेमध्ये अलिकडे घडलेला प्रकार याच मुद्यांशी संबंधित आहे. शिवसेना किंवा खान्देश विकास आघाडीची ३५ वर्षांची सत्ता भाजपाने नुकत्याच झालेल्या निवडणुकीत उलथवून लावली. तब्बल ५७ जागा जिंकत मोठे यश मिळविले. सत्ताधारी असलेल्या शिवसेनेची कामगिरी निम्म्याहून अधिक जागांनी घसरली आणि १५ वर आली. जनादेशाचा स्वीकार नेत्यांनी केला, परंतु उत्साही, उतावीळ नगरसेवकांच्या पचनी पडलेला नाही. त्यातून अकारण नाट्य निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आणि सेनेचे मातब्बर नगरसेवक तोंडघशी पडले. ऐन निवडणुकीच्या काळात मावळते महापौर मनसेचे ललित कोल्हे, आघाडीचे कैलास सोनवणे, राष्ट्रवादीचे चंद्रकांत कापसे यांच्यासारखे मातब्बर भाजपामध्ये आले.

वा-याची अचूक दिशा ओळखत त्यांनी भाजपाप्रवेशाचा निर्णय घेतला असला तरी सत्ता आल्यास कोणते तरी मोठे पद देण्याचे आमीष दाखविल्याशिवाय हे मातब्बर नगरसेवक भाजपामध्ये आलेले नाही, हे उघड सत्य आहे. महापालिकेत महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती, सभागृह नेता ही प्रमुख चार पदे असतात. त्यांना मोठे अधिकार आणि प्रतिष्ठादेखील असते. या चार पदांसाठी भाजपामध्ये रस्सीखेच सुरु होती. परंतु सुरुवातीपासून महानगराध्यक्ष व आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे यांचा दावा मजबूत होता. या निवडणुकीची धुरा सांभाळणा-या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रचार सभांमध्ये थेट भोळे यांची आमदारकी पणाला लावलेली होती. जळगावचा वर्षभरात विकास केला नाही, तर विधानसभा निवडणुकीला मते मागायला येणार नाही, ही त्यांची प्रतिज्ञा गाजली होती. निवडणूक प्रमुख म्हणून आमदार भोळे यांनी चांगली कामगिरी बजावली होती. भाजपाला यश मिळावे, यासाठी ‘आयारामां’चे स्वागत करण्याचे मोठे मन त्यांनी दाखविले.

त्यामुळे त्यांचा दावा नाकारला गेलाच नसता. आता महापालिकेच्या मदतीने ते त्यांचे विधानसभा कार्यक्षेत्र असलेल्या जळगाव शहराचा विकास करु शकतील. परंतु शिवसेनेने भाजपामधील कथित असंतोषाला हवा देत नाराज मंडळी सेनेच्या संपर्कात असल्याचा दावा केला. तीन दिवसांत चमत्कार घडेल, अशी भविष्यवाणी केली. केंद्र, राज्य आणि जिल्ह्यात भाजपाची सत्ता आहे; महापालिकेत प्रचंड बहुमत आहे, ते दूर लोटून अवघ्या १५ जागा असलेल्या सेनेकडे भाजपाचे नगरसेवक जातील, असे अशक्य कोटीतील कृती असतानाही सेनेने अति साहसवाद दाखविला. सुरुवातीला नेते रमेशदादा जैन यांनी उमेदवार देणार नसल्याची घोषणा केली होती. हा निर्णय समंजस आणि परिपक्वतेचा होता. पण उत्साही आणि उतावीळ मंडळींनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दुसºया दिवशी नगररचना कार्यालयाला कुलूप ठोकण्याचे नाट्य घडले. हा प्रश्न वास्तव असला तरी महापौरपद निवडणुकीच्या आदल्या दिवशी त्यासंबंधी आंदोलन करणे स्टंटबाजीपेक्षा वेगळे नव्हते. कारवाई झाल्यावर दबावाचा आरोप करीत महापौर निवडणुकीवर बहिष्कार टाकला गेला. परंतु उमेदवारी अर्ज मागे घेतले गेले नाही; त्यामुळे निवडणूक तर झालीच.

शिवसेनेच्या या कृतीमागे निश्चित अशी कोणतीही भूमिका दिसत नाही. बिनविरोध निवडणूक करुन राजकीय परिपक्वता व खिलाडूवृत्ती दाखविण्याची संधी सेनेने गमावली. याउलट अंगलट येणा-या कृतीने सेनेने स्वत:चे हसे करुन घेतले. विरोधी पक्षाची भूमिकासुद्धा पार पाडू शकत नाही, असा संदेश त्यातून गेला. 

 

टॅग्स :Politicsराजकारण