शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

दि पॉलिटिकल स्टोन !

By सचिन जवळकोटे | Updated: July 4, 2021 06:35 IST

वाद ‘बारामतीकर’ अन्‌ ‘सांगलीकरां’चा; खळखट्याऽऽक खेळ रंगला सोलापूरकरांचा !

- सचिन जवळकोटे

सोलापूरकरांना दगडं तशी नवी नाहीत. आजपावेतो झालेल्या प्रत्येक राड्यात याच दगडांचा मुक्तहस्ते वापर करण्यात आलेला. पंचनाम्यासाठी या दगडांचा ढीग रचता-रचता दोनाची सात पोलीस ठाणीही निर्माण झालेली. मात्र अलीकडच्या काळात हे शहर तसं गुण्यागोविंदाने नांदत होतं...परंतु जिल्ह्याबाहेरील दोन नेत्यांच्या वादात इथली शांतता पुन्हा बिघडली. ‘बारामतीकरां’वर टीका केली म्हणून ‘सांगलीकरां’ची गाडी फोडली गेली. ‘दि पॉलिटिकल स्टोन’ची सुपरहीट स्टोरी पुन्हा एकदा रंगली. लगाव बत्ती...

पत्थर’ का जवाब पत्थर से.. ‘बारामतीकरां’चा या जिल्ह्याशी ऋणानुबंध तसा खूप जुना. ‘थोरले काका’ अन्‌ ‘अजितदादा’ या दोन्ही पिढ्यांशी जिव्हाळ्याचं नातं इथल्या मातीनं जपलेलं. आता ‘रोहितदादां’वर प्रेम करणारी तिसरी तरुण पिढीही इथं उदयास आलेली. त्यामुळं ‘बारामतीकरां’शी संबंधित कोणतीही ब्रेकिंग न्यूज असो, त्याचे फॉलोअर्स वाढतच चाललेले.‘थोरल्या काकां’वर टीका केली की राजकारणात झटपट मोठ्ठं होता येतं, हा आजपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास. ‘खैरनारां’पासून ‘जानकरां’पर्यंत अनेकांना याचा अनुभव आलेला. त्यामुळंच ‘बारामतीकरां’वर थेट शरसंधान करणारे ‘गोपीचंद’ नेहमी  ‘हेडलाईन’मध्येच झळकत राहिलेले. ‘थोरल्या काकां’च्या ताकदीवर कमेंट केली तर ‘टीआरपी’ वाढतो. ‘अजितदादां’च्या प्रतिमेवर बोट ठेवलं की ‘क्रेझ’ निर्माण होते, याचा प्रत्यय ‘पडळकरां’नाही आलेला. ‘टीआरपी’ अन्‌ ‘क्रेझ’च्या बाबतीत ते टॉपवर पोहोचलेले.पंढरपूर इलेक्शनमध्ये तर त्यांनी तुफान धुरळा उडविलेला. ‘जीपी’ प्रत्येक भाषणात ‘एसपीं’वर बोलत गेले. सारेच ऐकत गेले. कुणीच त्यांना क्रॉस केलं नाही. ‘बारामतीकरां’च्या जीवावर तर सोडाच, त्यांच्या नावावर मोठं झालेल्या नेत्यांनीही याबाबतीत आळीमिळी गुपचिळी केली. ‘सभ्यता’ अन्‌ ‘सुसंस्कृती’ची परंपरा जपणाऱ्या ‘कमळ’वाल्यांनीही या नव्या भाषेकडं पद्धतशीर दुर्लक्ष केलं. ‘गोपीचंद’ हे केवळ दमदार नेते नाहीत, तर कसलेले अभिनेतेही आहेत.  कोणत्या वाक्यावर जोर दिला तर अधिक टाळ्या पडतात, हे त्यांना अचूकपणे उमजलेलं. मात्र सोलापुरात टाळ्यांऐवजी दगडं पडतील हे कुणालाच न समजलेलं.    मात्र जे घडलं ते अकल्पित. अनाकलनीय. मड्डी वस्तीत ‘पडळकरां’च्या कारची काच फोडण्यात आली. या गाडीवर टाकलेला दगड छोटा नव्हता. दोन्ही हातांनी उचलावा इतका मोठा होता. अस्सल सोलापुरी भाषेत सांगायचं तर ‘भला मोठा धोंडा’ होता. ‘गोपीचंदां’च्या सुदैवानं केवळ काच तडकण्यावरच निभावलं.विशेष म्हणजे हा बाका प्रसंग अनेकांच्या  मोबाईलमधून  टिपला गेला.‘पडळकर’ येणार म्हणून   त्यांच्या चाहत्यांनी अगोदरपासूनच व्हिडिओ शुटींग सुरू केलेलं. दगड पडताच क्षणभर सन्नाटा पसरला. नंतर एकच  हलकल्लोळ माजला. पळून जाणाऱ्या हल्लेखोराच्या पाठलागावर दोघं-तिघं धावले. सुरुवातीला काहीच न कळाल्यानं आतील मंडळीही बऱ्याच वेळानं गाडीतून बाहेर पडली. पळालेल्या तरुणाचा  नंतर शोध लागला. नाव त्याचं  ‘अमित’. तो ‘रोहितदादां’चा फॅन. ‘बारामतीकर’ सोलापुरात आले की हा म्हणे त्यांच्या भेटीला नक्की जाणार. मग काय..  ‘दादां’सोबतचे त्याचे फोटोही लगेच व्हायरल झाले. यानंतर  दुसऱ्या दिवशी दोन तरुणांनी ‘घड्याळ’वाल्यांच्या ऑफिसवर हल्ला चढविला. ‘एकच छंद.. गोपीचंद’ म्हणत तिथंही दगडांचाच वापर करण्यात आला. ‘खून का बदला खूनसे’ हा फिल्मी डायलॉग रसिक सोलापूरकरांना आजपावेतो ठावूक; मात्र ‘पत्थर’ का जवाब पत्थरसे’ ही नवी ‘पॉलिटिकल स्टोरी’ पहिल्यांदाच पहायला मिळाली.या हल्ल्यानंतर ‘घड्याळ’वाली मंडळी बिथरली. मात्र थेट ‘पडळकरां’वर टीका करण्याचं धाडस इथंही कुणी दाखविलं नाही. केवळ सोशल मीडियावर त्यांचे बेड्या घातलेले जुने फोटो व्हायरल करण्यावर भर दिला गेला. इलेक्शनमधल्या त्यांच्या सततच्या अपयशावरही बोट ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. हा सारा प्रकार ‘कमळ’वाले नेते दुरूनच एन्जॉय करत होते. ‘पाहुण्यांच्या काठीनं दुश्मन’ घायाळ होत असताना त्यांना आतून गुदगुल्या होत होत्या. मात्र ‘काठी’ला ओरखडे निघत असताना त्यांना राग येत नव्हता...

लेकरांच्या डोक्यात   पेटला राजकीय विस्तव..

वरच्या नेत्यांचं राजकारण जोरात सुरू होतं; मात्र आपापल्या नेत्यांवर प्रेम करणारी तरणीताठी पोरं सोलापुरातून फरार झाली होती. गाडीवर दगड टाकणारा ‘अमित’ जरी ‘बारामतीकर’प्रेमी असला तरी त्याला पळून जाण्यासाठी मदत करणारा ‘निलेश’ केवळ मैत्रीखातर घटनास्थळी आलेला. दुसऱ्या दिवशी ‘ऑफिस’वर दगडं फेकणारा ‘शरणू’ कट्टर ‘गोपीचंद’प्रेमी असला तरी त्याच्या सोबतचा ‘सोनू’ही दोस्तीखातरच तिथं गेलेला. विशेष म्हणजे दगडफेकीच्या दोन्हीही घटना कॅमेऱ्यात कैद झालेल्या. पोलिसांनी त्यांच्यावर लावलेली कलमं सिद्ध झाली तर किमान दोन वर्षे ‘आत’मध्ये जाण्याची शक्यता दिसू लागलेली. या पोरांचे आई-वडील करून खाणारे. आज कामावर गेले तरच उद्याची चूल पेटणारी. मात्र लेकरांच्या डोक्यात पेटलेला राजकीय विस्तव अवघ्या घरादाराला उद्‌ध्वस्त करायला निघालेला. दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळं यापुढं सरकारी नोकरी तर सोडाच, खाजगी जॉब मिळण्याची गॅरंटीही आता दिसेनाशी झालेली. जाता-जाता : दीड वर्षांपूर्वी भल्या पहाटे ‘दादा बारामतीकर’ अन्‌ ‘देवेंद्र नागपूरकर’ अकस्मातपणे एकत्र आले, तसं भविष्यात पुन्हा घडलं तर काय होईल ? नेतेमंडळी मुंबईत स्टेजवर मांडीला मांडी लावून बसतील. ही बिच्चारी पोरं मात्र  सोलापुरात ‘तारखांवर तारखा’ घेत हेलपाटे मारत बसतील. लगाव बत्ती..

टॅग्स :SolapurसोलापूरGopichand Padalkarगोपीचंद पडळकरSharad Pawarशरद पवारBaramatiबारामतीSangliसांगलीPoliticsराजकारण