शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’वरील राजकीय संशयकल्लोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 05:13 IST

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळ सध्या आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय आखाडा बनला आहे. त्यामुळे राज्यातील एक आदर्श सहकारी संघ असलेल्या ‘गोकुळ’बाबत सभासदांच्या मनात संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळ सध्या आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय आखाडा बनला आहे. त्यामुळे राज्यातील एक आदर्श सहकारी संघ असलेल्या ‘गोकुळ’बाबत सभासदांच्या मनात संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी केवळ राजकारण न करता विकासाचे राजकारण करायला हवे.ंमहाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील सर्वांत मोठा कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळ सध्या पश्चिम महाराष्ट्रातील चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यातील राजकीय संघर्षातून हे सर्व चालू असल्याचे वरकरणी दिसत आहे. मात्र, या संघातील सत्तासंघर्ष आणि मलई (?) हीदेखील त्याची अन्य कारणे आहेत.देशात ‘अमूल’नंतर सहकार क्षेत्रातील आदर्श दूध संघ म्हणून ‘गोकुळ’चेच नाव आहे. स्व. आनंदराव पाटील-चुयेकर, इंडियन डेअरी असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अरुण नरके आणि त्यांच्या सहकाºयांनी १६ मार्च १९६३ रोजी ‘गोकुळ’चे रोपटे लावले. अथक परिश्रमाने त्याचा वटवृक्ष केला. राज्यातच नव्हे, तर देशात आदर्श बनविले. गोकुळ नावाचा ब्रँड तयार झाला आहे. आजघडीला प्रतिदिन १४ लाख लिटर दुधाचे संकलन हा संघ करतो. दूध उत्पादकांना १० दिवसाला सुमारे ४२ कोटी रुपयांचे वाटप केले जाते. ८२:१८ या सूत्रानुसार यात ‘गोकुळ’चे व्यवस्थापन केले जाते. म्हणजेच एक रुपयातील केवळ १८ पैसे व्यवस्थापनावर खर्च केले जातात. उर्वरित दूध उत्पादकांना दिले जातात. अन्य दूध संघांतील व्यवस्थापन खर्चाचा आकडा ३२ पैशांपर्यंत जातो. असे असूनही गोकुळ सध्या राजकारणाचा आखाडा बनला आहे. त्याला निमित्त ठरले ते ‘गोकुळ’च्या सर्वसाधारण सभेतील महादेवराव महाडिक यांनी केलेले अहवाल वाचन. ‘गोकुळ’मध्ये कोणत्याही पदावर नसताना त्यांनी अहवाल वाचन कसे केले? अशी विचारणा करीत विरोधी सतेज पाटील गटाने रान उठविले. न्यायालयातही धाव घेतली. दरम्यान, राज्य सरकारने गाईच्या दूध दरात वाढ करीत सर्व दूध संघांनी प्रतिलिटर २७ रुपये दर द्यावा, असा फतवा काढला. हा दर देणे अशक्य असले तरी शासनाचा आदेश म्हणून ‘गोकुळ’ने तो द्यायला सुरुवात केली. मात्र, दोन-तीन महिन्यांतच हा आतबट्ट्याचा व्यवसाय ठरू लागल्याने तो दोन रुपयांनी कमी केला. पश्चिम महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच सहकारी दूध संघांनी शासकीय आदेशानुसार दर दिलेला नाही. २१.५० ते २५ रुपयांपर्यंत त्यांनी दर दिले आहेत. यातही सध्या ‘गोकुळ’चाच दर सर्वाधिक २५ रुपये इतका आहे. त्याखालोखाल सातारा जिल्ह्यातील कोयना दूध संघ २३ रुपये, तर अमूल २२.५० रुपये दर देतो आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार दर दिला जावा, तसेच गैरव्यवस्थापन थांबवावे यांसह विविध मागण्यांसाठी सतेज पाटील यांनी मोर्चाही काढला. यामुळे सभासदांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊ लागले. हे पाहून सत्ताधारी संचालकांनीही प्रतिमोर्चा काढून याला प्रत्युत्तर देण्याची जय्यत तयारी केली आहे. हा प्रतिमोर्चा आजच, गुरुवारी निघणार आहे. या सर्व प्रकारांत गोकुळ मात्र संशयाच्या भोवºयात अडकत आहे. अमूल दूध संघाने कोल्हापूर जिल्ह्यात शिरकाव केला आहे. त्याला संधी द्यायची नसेल तर सत्ताधारी आणि विरोधकांनी विकासाचे राजकारण करायला हवे आणि सभासदांचा विश्वास टिकवायला हवा.