शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

उडवा रेऽऽ फटाके ! प्रशांत तोटा.. लक्ष्मण लवंगी मिरची.. सिद्धाराम सुतळी बॉम्ब.. सुभाष रॉकेट..

By सचिन जवळकोटे | Published: November 04, 2018 12:22 AM

सोलापूरकरहो... शुभ दीपावली. चला..  आता फटाके उडवू या. काय... नको म्हणता ? फक्त दोन तास फटाके उडविण्यात मजा नाही म्हणता ? मग हे घ्या अस्सल सोलापुरी राजकीय फटाके... बारा महिने अन् चोवीस तास उडणारे. भुर्इंऽऽ फटाऽऽक ढुम्मऽऽ फटाऽऽक.. हं.. आला का आवाज ? कशी वाटली ही राजकीय आतषबाजी. मग वाट कशाची बघताय ? लगाव बत्ती...

सोलापूरकरहो... शुभ दीपावली. चला..  आता फटाके उडवू या. काय... नको म्हणता ? फक्त दोन तास फटाके उडविण्यात मजा नाही म्हणता ? मग हे घ्या अस्सल सोलापुरी राजकीय फटाके... बारा महिने अन् चोवीस तास उडणारे. भुर्इंऽऽ फटाऽऽक ढुम्मऽऽ फटाऽऽक.. हं.. आला का आवाज ? कशी वाटली ही राजकीय आतषबाजी. मग वाट कशाची बघताय ? लगाव बत्ती...हा स्टॉल ‘उत्तर’वाल्यांचा. इथं जास्त करून रॉकेटचीच चलती. वडाळ्यातलं ‘सुभाष रॉकेट’ जर ‘उत्तर’मध्ये लावलं, तर थेट ‘दक्षिण’मध्ये उडतं. कधीकधी नेम चुकतो. चुकून माढ्यात जाऊन पडतं, तर उस्मानाबादमध्येही जाऊन विझतं. या रॉकेटला दोन वाती. एक ‘शहाजी अन् इंद्रजित’ची. आता या राजकीय वाती स्वत:च्याच मार्डीजवळच्या नान्नजमध्ये पेटत नाही, हा भाग वेगळा. कदाचित बाजार समितीची उदबत्तीच फुसकी असावी. याच ‘उत्तर’चं अजून एक ‘व्हिसलिंग रॉकेट’ म्हणजे कुमठ्यातलं. हे ‘दिलीप रॉकेट’ही पेटलं की थेट मंद्रुप, भंडारकवठे परिसरात आवाज करत उडत राहतं. फक्त यंदा कुठं अन् कसं स्थिर व्हावं, याची वाट पाहू लागलंय.असो. रॉकेटस्ना उडण्यासाठी गरज लागते रिकाम्या बाटलीची; पण या दोन्ही रॉकेटस्ना सपोर्ट मिळाला उसाच्या मोळीचा. अरे बापऽऽ रे...बाटलीवरून अक्कलकोटचं पानमंगरुळ आठवलं. या गावातली ही ‘शरद नागगोळी’ बघा. दिसायला एकदम साधी; पण पेटली की भुसकऽऽन भडकते. समोरच्याला क्षणभर दचकवते, घाबरवते...पण ही गोळी म्हणे आता ‘लोटस कंपनी’ला कालबाह्य वाटू लागलीय.. कारण गौडगावचा नवा ‘भगवा अ‍ॅटमबॉम्ब’ उडविण्याची म्हणे यंदा तयारी सुरू झालीय. तसं झालं तर दुधनीतल्या ‘सिद्धाराम सुतळी बॉम्ब’ला  ‘जन-वात्सल्य’वर पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त होणार. लगाव बत्ती...करमाळ्यात सध्या फटाक्यांपेक्षा पिस्तूलाला अधिक मागणी. ‘जयवंत पिस्तूल’ची क्रेझ सध्या वाढली असली तरी गेल्या एक महिन्यापासून इथली मंडळी या पिस्तूलाला हात लावायलाही घाबरू लागतीत. उगाच ‘जामीन’ मिळाला नाही तर ऐन दिवाळीत गायब व्हायची पाळी की रावऽऽ. असो. असल्याच पिस्तूलाला बार्शीत मात्र भलतीच मागणी वाढलीय. ‘यातून कितीही गोळ्या मारल्या तरी कुणालाच इजा होत नाही. एकदम सेफ अ‍ॅटम आहे,’ असे म्हणे रौतांच्या फटाका कंपनीनं कालच डिक्लेर केलंय. आलं का लक्षात ? लगाव बत्ती...मोहोळचा ‘रमेश भुंगा’ चार वर्षांपूर्वी भलताच लोकप्रिय होता. मात्र कमळाच्या पाकळ्यात अलगद अडकल्यानं ‘सीलबंद’ झाला. त्यामुळं मंगळवेढ्याच्या ‘लक्ष्मण लवंगी मिरची’ला पुन्हा मागणी आली; पण ही मिरची म्हणे नुसतीच आवाज करते. फुटता फुटत नाही. याच मंगुड्यात ‘समाधान डांबरी फटाका’ सध्या भलताच जोरात वाजतोय. उगाच नावावर जाऊ नका.  डांबर अन् खडीचा याच्याशी काहीही संबंध नाही. असो. इथं ‘शैला टिकली’चा आवाज ऐकू येऊ लागलाय. पंढरपूरचं ‘भारत भुईचक्कर’ही दोन्ही तालुक्यात इकडून तिकडं गराऽऽ गराऽऽ फिरतंय. बरेच दिवस शांत असलेला ‘प्रशांत तोटा’ही पुन्हा एकदा आता आवाज करू लागलाय. सांगोल्यातली ‘गणपतआबा भुसनळी’ मात्र लईऽऽ डेंजर. साडेचार वर्षे ‘यंदा फुटणार नाहीऽऽ फुटणार नाहीऽऽ’असं भासवते; मात्र शेवटच्या टप्प्यात अकस्मातपणे बार उडतो. साºयांच्याच कानठळ्या बसतात; परंतु इथलाच ‘दीपक सुतळी बॉम्ब’ही या भुसनळीला पुरून उरलाय. बघू याऽऽ यंदा कुणाचा आवाज जोरात निघतोय.अकलूजला एकाच ‘एमपी’ कंपनीचे तीन-चार वेगळे ब्रँड बाजारात आलेत. ‘विजय-रणजित सेव्हन शॉट’ लोकांना परिचित असला तरी ‘धवल माळ’ही अनेकांना आकर्षित करू लागलीय. निमगावचा ‘शिंदे बॉम्ब’सध्या  मार्केटमध्ये तुफान चाललाय. यातही दोन प्रकार. मोठा ‘दादा बॉम्ब’. छोटा ‘मामा बॉम्ब’. दादा बॉम्ब अख्ख्या माढ्यात आवाज करतो. मामा बॉम्ब मात्र करमाळ्यात जोरात फुटण्याचा प्रयत्न करत असला तरी याचा म्हणावा तेवढा अजून आवाज येत नाही. कदाचित वर्षभरात झेडपीची बारुद खच्चून भरल्यावर पुढच्या दिवाळीला आवाज वाढण्याची शक्यता. सोलापुरातली ‘प्रणिती फुलबाजी’ लांबूनच ठीक... कारण या फुलबाजीपायी अनेक जुन्या मंडळींचे ‘हात’ पोळून निघालेत.  बाकी देशमुख वाड्यातला ‘विजय आपटबार’ घरातल्याच फरशीवर आदळआपट करतोय. भीती घालतोय.. म्हणूनच की काय, याच्यासमोर ‘धर्मराज चिमणी’  पेटविण्याचा प्रयत्न ‘लोकमंगल’च्या ‘काडीपेटी’तून अधून-मधून केला जातो; पण ही ‘चिमणी’ म्हणे खूप शांत. लवकर पेटत नाही.( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :PoliticsराजकारणSolapurसोलापूरfire crackerफटाके