शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

अस्सल मातीतली कविता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 03:48 IST

१९३४ मध्ये उत्तर प्रदेशात जन्मलेले केदारनाथ सिंह हे हिंदीतले महत्त्वाचे कवी तर आहेतच, पण भारतीय भाषांच्या पातळीवरचे हे गौरवास्पद नाव आहे. नुकतेच त्यांचे निधन झाले, पण या कवीची कविता कालातीत आहे. त्यांच्याविषयी या आठवणी...

- डॉ. वीणा सानेकर१९३४ मध्ये उत्तर प्रदेशात जन्मलेले केदारनाथ सिंह हे हिंदीतले महत्त्वाचे कवी तर आहेतच, पण भारतीय भाषांच्या पातळीवरचे हे गौरवास्पद नाव आहे. नुकतेच त्यांचे निधन झाले, पण या कवीची कविता कालातीत आहे. त्यांच्याविषयी या आठवणी...मी परततो तुझ्यातजेव्हा गप्प राहता...राहता थकून जातेमाझी जीभआणि दुखू लागतो माझा आत्माअसे आपल्या भाषेला साद घालत म्हणणारा केदारनाथांसारखा कवी, मायभाषेवर प्रेम करणाऱ्या कुणालाही आपलासा वाटेल.केदारनाथ सिंहांची कविता मातीची नि अस्सल देशी वाणाची कविता आहे. जगरनाथ या कवितेत एका बालमित्राशी संवाद आहे. खूप वर्षांनी झालेली त्या मित्राची भेट कवीला व्याकूळ करते. नायक आस्थेने त्याची चौकशी करतो आहे. त्याची बकरी ज्या निंबाच्या झाडाला बांधलेली असायची, त्या निंबाच्या झाडाविषयी प्रेमाने विचारतो आहे. आंब्याचा गंध, पाऊसपाण्याची चौकशी अशा बारीकसारीक गोष्टींबद्दल तो हळवेपणाने बोलतो, पण त्यावर जगरनाथ काहीच उत्तर देत नाही. आपल्या बोलण्यातून जगरनाथला खोट्याचा गंध येतो आहे का? असा प्रश्न नायकाला पडतो. मात्र, जगरनाथ कोणत्याही प्रश्नाचे उत्तर न देता सरळ निघून जातो, तो अजिबात मागे वळून पाहात नाही. या कवितेत केवळ एकतर्फी संवाद आहे. या संवादात आपलं गाव, आपलं बालपण हातातून सुटत चालल्याची जाणीव आहे. शहरात गेलेल्या माणसांपासून गावातली माणसं कशी तुटत जातात, याचं अतिशय हृद्य चित्र या कवितेत उमटलं आहे. शहरात राहणारा केदारनाथांच्या कवितांचा नायक सतत खूप काही हरवल्याची जाणीव व्यक्त करतो, शहरातही तो गावातल्या खुणा शोधत राहतो. कधीतरी आकाशात एखादा परिचित हिरवा पिवळा पक्षी उडताना दिसला, तरी त्याचं मन शांत होतं.यहां तक आते आतेमैं बहुत कुछ भूल चुका हूंबहुत कुछ जिसे याद रखनाबहुत जरूरी थाअसे म्हणणारा हा कवी खरे तर छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवतो.शहरात आल्यानंतरही आपल्या अस्तित्वाशी जोडला गेलेला गाव कवीला महत्त्वाचा वाटतो. या दृष्टीने ‘कालीसदरी’ ही कविता मुळातूनच वाचायला हवी. केदारनाथ या कवितेत म्हणतात, खूप वर्षांआधी या महानगरात मी पहिल्यांदा आलो, तेव्हा माझ्या शरीरावर एक फाटकं जाकीट होतं, जे गावातल्या म्हाताºया शिंप्याने शिवलं होतं. त्याला एक छोटा खिसा होता, जो मक्याच्या दाण्यांच्या गंधाने भरलेला होता. तो गंध अनेक दिवस परक्या महानगरात कवीबरोबर राहिला आहे. तिथल्या बाजारातून खरेदी केलेल्या चपलांनी दीर्घकाळ त्याला सोबत केली आहे आणि त्याच्या सफेद कुर्त्यावरच्या काळ्या जाकिटात अडकलेली त्याच्या गावातली धूळ सांभाळून ठेवण्याचा त्याने खूप प्रयत्न केला, पण ती हळूहळू केव्हा घरंगळत गेली, त्याला कळलेच नाही.मैंने बहुत कोशिश की...कि वह जरासी धूल बची रहे महानगर में, पर पता नहीं कैसेधीरे धीरे उतरती रही वहउतरती रही मेरी पहचान धीरे... धीरेगावातली ती माती ही त्याची ओळख होती. ती शहरात हळूहळू पुसली गेली. गावी परतताना कोणती भेट न्यावी, या विचाराने कवी जवळचाच मॉल तासन्तास पालथा घालतो, पण त्याला नेण्यायोग्य काहीच सापडत नाही. मग त्याला वाटतं की, तो गावातली ती धूळ तर वाचवू शकला नाही, पण तेच जीर्ण झालेलं जाकीट घालून तो गावी परतेल एकदा नि याहून चांगली भेट असूच शकणार नाही. राज कपूरच्या चित्रपटातला राजू ‘श्री ४२०’ मध्ये जे जुने कपडे घालून शहरात आला होता, त्याच कपड्यांनिशी परत गावाची वाट धरतो, त्या दृश्याची मला आठवण झाली. केदारनाथ सिंह हा कवी सतत आपल्या मुळांकडे जाण्याकरिता आसुसलेला आहे.छोट्या-छोट्या गोष्टी जपल्या पाहिजेत, असं कवीला वाटते. यातूनच या ओळी येतात,कच्चा बांस कभी काटना मतनहीं तो सारी बांसुरीयाहो जायेगी बेसुरीएक जो मिला था राहों मेंहैरान परेशानउसकी पूछती हुई आंखें भूलना मतनहीं तो सांझ का ताराभटक जायेगा रास्ता....अस्वस्थ माणसांचे डोळे नि ते...ते सारंच जे कोवळं, नाजूक आहे, ते कवीला विसरता येत नाही. निसर्गातल्या छोट्या-छोट्या गोष्टी जशा त्याला जपून ठेवायच्या आहेत, तशी मानवी नातेसंबंधातली बांधीलकीही कवीला मौल्यवान वाटते.किसी को प्यार करनातो चाहे चले जानासात समुंदर पारपर भूलना मतकि तुम्हारी देहने एक देहका नमक खाया हैमिठाला जागणं जितकं आवश्यक, तितक्या सच्चेपणानं प्रेमाचं नातं निभावलं पाहिजे, ही नातेसंबंधातली कमिटमेंट या ओळींतून सूचित होते.ही मुळांची ओढ इतकी तीव्र आहे की, ती त्याला निर्जीव वस्तूंच्या ठिकाणीही दिसते. घरात शिरल्या-शिरल्या बिछाना कापसामध्ये परत शिरण्याची इच्छा व्यक्त करतो. खुर्ची नि टेबलाला त्यांची मूळ झाडं आठवतात...ती म्हणतात,हमें बेतरह याद आ रहे हैं हमारे पेडऔर उनके भीतरका वह जिंदा द्रवजिसकी हत्या कर दी आपनेकपाटातली पुस्तकेही ओरडून ओरडून विद्रोह करतात,खोल दो, हमें खोल दोहम जाना चाहती हैंअपने बांसके जंगल...माणसांचा तुरुंग जणू झाडांकरिता परक्या शहरासारखा नि त्यांना मुक्त व्हायचंय, परत अस्तित्वाच्या गाभ्यात शिरायचंय.वस्तू नि पशुपक्ष्यांच्या लहान...मोठ्या हालचालींचा अर्थ जाणून, या कवीच्या मनात कमालीची उत्सुकता आहे. म्हणूनच वर्षानुवर्षे नांगर ओढून थकून गेलेले बैल नि त्यांच्या खांद्यांमध्ये साठलेला वर्षानुवर्षांचा थकवा कवीला वाचता येतो. ते जणू पुन्हा उठतील, अशी आशा बाळगणाºया, त्यांना टक लावून पाहणाºया कुत्र्याचे डोळेही त्याला विसरता येत नाहीत. एखाद्या जुनाट वृक्षाच्या सालीखालच्या दबलेल्या कहाण्या त्याला जाणून घ्यायच्या आहेत. स्थलांतरित पक्ष्याला पाहून तो हरखतो, पण त्याचे नाव आठवत नाही म्हणून हिरमुसतो, त्याचं नाव आपण विसरलो, या विचाराने आत कुठेतरी तो घाबरुन जातो. शहरातली पक्ष्याची ‘वापसी’ त्याला भर रस्त्यात हेलावून टाकते आणि माणसांचे चेहरे तर कायम त्याच्या स्मरणात राहतात. किंबहुना, ते कवीचा पाठलाग करतात.जिवंत चेहरे सामावून घेणारी केदारनाथ सिंहाची कविता माणसांविषयीची असोशी व्यक्त करते. एका नदीकाठी पाहिलेल्या म्हाताºया मेंढपाळाचा. चेहरा त्यांच्या एका कवितेत उमटला आहे. त्याच्या चेहºयावर सुरकुत्यांचे जाळे कवीला लख्ख आठवते आहे आणि हेही आठवते आहे की, त्याच्या चेहºयावरील सुरकुत्यांमध्ये एक चिमणी घरटं बांधू शकेल, अशी जागा होती. हा चेहरा किती निकट आहे, हे सांगताना केदारनाथ म्हणतात,मेरे संग संग चला आयापानी और कीचडसमेत वह जिन्दाचेहरा.....जिससे इतने बरस बाद भीमेरे अंदर बुंदे टपक रही हैकुठे-कुठे भेटलेल्या अशा माणसांचे जिवंत चेहरे घेऊन फिरत राहणे सोपे नाही, पण केदारनाथ त्यांच्या उदासी... अस्वस्थतेसकट, त्यांच्या असण्याच्या उबेसकट त्यांना लक्षात ठेवतात.माणसाचा हात हातात असण्याचे म्हणूनच त्यांना अप्रूप वाटते. ते म्हणतात,उसका हाथ अपने हाथ में लेते हुए मैंने सोचादुनिया को हाथकी तरह गर्म और सुंदर होना चाहिएमाणूसपणाच्या नितळ स्पर्शाचा असा शोध हे केदारनाथ सिंह यांच्या कवितेचे वैशिष्ट्य आहे. विशेषत: आताच्या भोवतालात या शोधाचं महत्त्व मोठे आहे. केदारनाथ या काळाला ‘बाजारों का समय’ असे म्हणतात. या काळात कविताही पणाला लागली आहे. लिहून फार काही घडणार नाही, या काळात असे वाटावे इतके आजचे वास्तव कठोर असले, तरी आपल्या शब्दांच्या पूर्ण ताकदीनिशी माणसांबद्दल लिहीत राहिले पाहिजे, हा विश्वास त्यांची कविता व्यक्त करते.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश