शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

पेन अधिवेशन : सत्य, स्वातंत्र्य, विविधता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 00:35 IST

पेन या संस्थेला १०० वर्षांचा इतिहास आहे. १२० देशांमध्ये १८० हून अधिक पेन केंद्रे असून भारतामध्ये तीन केंद्रे आहेत. पेन इंटरनॅशनल या संस्थेचे काम भारतात मुंबई, दिल्ली आणि कोलकाता या तीन ठिकाणांहून १९३० नंतर सुरू झाले. परंतु, भारतात आजवर ‘पेन’चे अधिवेशन होऊ शकले नव्हते.

- डॉ. गणेश देवी(ज्येष्ठ भाषा अभ्यासक)पेन या संस्थेला १०० वर्षांचा इतिहास आहे. १२० देशांमध्ये १८० हून अधिक पेन केंद्रे असून भारतामध्ये तीन केंद्रे आहेत. पेन इंटरनॅशनल या संस्थेचे काम भारतात मुंबई, दिल्ली आणि कोलकाता या तीन ठिकाणांहून १९३० नंतर सुरू झाले. परंतु, भारतात आजवर ‘पेन’चे अधिवेशन होऊ शकले नव्हते. भारतात हे अधिवेशन व्हावे, अशी रवींद्रनाथ टागोर यांची इच्छा होती. दुसऱ्या महायुद्धामुळे ही इच्छा अपुरी राहिली. दोन वर्षांपूर्वी ‘दक्षिणायन’च्यानिमित्ताने मी बंगळुरुला गेलो असताना पेनच्या अध्यक्षांशी माझी भेट झाली. पेनचे अधिवेशन भारतात होणे किती महत्त्वाचे आहे, याबाबत मी त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी कारण विचारले असता मी सांगितले, ‘महात्मा गांधी यांच्या जन्माचे १५० वे वर्ष २ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. या वर्षाची नांदी पेनच्या संमेलनाने व्हावी, असे मला वाटते. गांधीजींसारखी व्यक्ती आधुनिक जगात क्वचितच झाली असेल. गांधीजींना महात्मापद मिंळाले; मात्र त्यांचा सत्याग्रह आणि निर्भयतेच्या मागे कस्तुरबांची शक्ती होती. कस्तुरबा पुण्यामध्ये तुरुंगात असताना तेथेच त्यांचा मृत्यू झाला. पेन एक प्रकारे तुरुंगात असणाºया लेखकांना मदतीचा हात देते. त्यामुळे पेन इंटरनॅशनल काँग्रेसचा कार्यक्रम आगाखान पॅलेसपासून शांततामय प्रार्थनेने सुरू करण्याचे ठरले. या अधिवेशनासाठी पेनच्या ८७ केंद्रांमधीलआणि ६० हून अधिक देशांतील लेखक पुण्यात एकत्र आले असून मंगळवारपासून सुरू झालेला हा लेखक सोहळा २७ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.लेखक केवळ अक्षरांशी जोडलेल्या व्यक्ती नाहीत. भारतात मौखिक परंपरा खूप समृद्ध आहे. या परंपरेची तसेच लिपींचे हस्तकलेतील स्थान याची दखल अधिवेशनात घेण्यात येणार आहे. मराठी भाषेने साहित्याला काय दिले असे विचार केल्यास, वारी हा साहित्यमय प्रकार आहे, हे लक्षात येईल. महाराष्ट्राबाहेर ही परंपरा कुठेच पाहायला मिळत नाही. जागतिक पातळीवर ही परंपरा नेण्याच्या हेतूने १४ विविध संतकवींच्या रचना गाणारे ग्रुप एकत्र करून वारी काढण्याचे ठरवले. सर्व माणसे समान असावीत, अशी संतांची इच्छा होती. म्हणूनच, जगातील सहा हजार भाषांना एकत्र आणून वारीशी जोडणे मला योग्य वाटते. म्हणून मी भाषा वारी ही संकल्पना पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. निरक्षर लोकांनी केलेल्या लिपीची निर्मिती आणि भाषावारी ही कल्पना पेन इंटरनॅशनलच्या इतिहासात प्रथमच घडत आहे. गेल्या १०० वर्षांत पेन काँग्रेसमध्ये सहभागी होणाºया केंद्रांची संख्या साधारणपणे ४० ते ५५ होती. कॅनडातील अधिवेशनात८० केंद्रे एकत्र आली होती. यंदा प्रथमच ८७ केंद्रे एकत्र येत असून नवा उच्चांक प्रस्थापित होत आहे. या केंद्रांमधील एकत्र येत असलेले लेखक ज्या भाषांचे प्रतिनिधित्व करतात, त्या भाषांची संख्या जवळपास दोन ते अडीच हजार होते.पेन अधिवेशनाच्या शीर्षकामध्ये सर्वांत महत्त्वाचा शब्द म्हणजे विविधता. स्वातंत्र्यासाठी विविधतेची गरज असते. दुसरा शब्द म्हणजे सत्य. निर्भीडपणे सत्य सांगण्याची स्वातंत्र्यासाठी गरज असते. लेखकांचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे निर्भीडपणे जगाला आरसा दाखवणे, त्याचबरोबर जीवसृष्टीचे रक्षण करणे. म्हणूनच ट्रूथ, फ्रीडम आणि डायव्हर्सिटी या तीन शब्दांचे शीर्षक या अधिवेशनासाठी चपखल ठरले आहे.

टॅग्स :newsबातम्या