शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
3
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
4
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
5
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
6
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
7
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
9
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
10
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
11
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
12
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
14
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

पायल तडवी आत्महत्येच्या निमित्ताने...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 4:54 AM

नायर रुग्णालयात वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून डॉ. पायल तडवी या निवासी डॉक्टरने आत्महत्या केल्याने मोठे वैचारिक वादळ आले आहे.

- डॉ. अमोल अन्नदातेनायर रुग्णालयात वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून डॉ. पायल तडवी या निवासी डॉक्टरने आत्महत्या केल्याने मोठे वैचारिक वादळ आले आहे. ही आत्महत्या रॅगिंगमुळे झाल्याचे प्राथमिक अहवालात समोर आले आहे. यात पायलला जातिवाचक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले का, यावर अजून चौकशी सुरू आहे. सगळ्या शक्यता गृहीत धरल्या, तरी ही घटना केवळ वैद्यकीय क्षेत्रालाच नव्हे, तर समाजातील बौद्धिक धुरिणांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे.जर पायलच्या मृत्यूत जातीचा संदर्भ असेल, तर या गोष्टीचा निषेध करावा तितका कमीच आहे, पण त्याच वेळी दोषींवर कायदेशीर कारवाई सुरू असताना आपण सगळ्यांनी याची चर्चा बौद्धिक वर्णभेद भडकणार नाही, अशा दृष्टीने व ‘डोळ्यासाठी डोळाच’ अशा प्रकारे दोन वर्ग एकमेकांसमोर उभे ठाकणार नाहीत, याची काळजी घेणे ही गरजेचे आहे. त्यातच पदव्युत्तर शिक्षणामध्ये आरक्षणाचा मुद्दा सध्या तापत असताना, गेली काही महिने वैद्यकीय क्षेत्रात प्रथमच जातीच्या मुद्द्यावरून उभी फूट पडलेली दिसून आली. वैद्यकीय क्षेत्रासारख्या थेट जगण्या- मरण्याशी संबंधित क्षेत्रात अशा प्रकारे बौद्धिक वर्णभेद भडकणे हे समाजाच्या दृष्टीने अत्यंत घातक व अराजकाला आमंत्रण देणारी गोष्ट आहे. पदव्युत्तर शिक्षण प्रवेशात आयत्या वेळी होणारे बदल, खुल्या वर्गासाठी राहिलेल्या एक दोनच जागा, आरक्षित वर्गाचा आपल्या हक्कासाठी लढा यातून कधी नव्हे, ते समाज माध्यमांवर वैद्यकीय क्षेत्रात दोन वर्ग एकमेकांना भिडताना दिसत होते.आरक्षण हवे नको, हा वादाचा मुद्दा बाजूला ठेवला, तरी आपल्या हक्कांसाठी सनदशीर मार्गाने लढा देत, आपल्या क्षेत्रात व एकूणच समाजात सहिष्णुता टिकून राहावी, यासाठी प्रत्येकाने आपला विवेक जागा ठेवायला हवा. त्यातच पायल तडवीसारख्या तरुण डॉक्टरचा जीव जातो, तेव्हा आपण सगळे एकाच वैद्यक मातेची मुले आहोत व जात, धर्मापलीकडे डॉक्टर आहोत व रुग्ण आपला पहिला धर्म आहे हे विसरता कामा नये, तसेच कुठलाही बदल आणताना तो अचानक आणला, तर समाज कशा प्रकारे ढवळून निघतो व त्यातून असा बौद्धिक वर्णभेद भडकू शकतो हा धडाही शासनाने घ्यायला हवा.या पलीकडे जाऊन या घटनेमध्ये वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत मानसिक व शारीरिक तणावाचा पदव्युत्तर शिक्षणाचा काळ, कमी निवासी डॉक्टरांची संख्या, वैद्यकीय महाविद्यालयातील कामाचा ताण, अनेक पातळ्यांवर, अनेक कारणांनी होत असलेले भेदभाव, डॉक्टरांचे आपापसातील संबंध हे सगळे कंगोरेही तपासून, त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

पायलच्या आत्महत्येत जातीचा संदर्भ तिच्या नैराश्यात भर घालणारा सगळ्यात मोठा घटक असला, तरी तिच्यावरील ताणही नाकारला जाऊ शकत नाही, तसेच काहीही कारण असले, तरी सोबत काम करणाऱ्या कनिष्ठ, वरिष्ठांमध्ये तिला निराधारपणाच्या तीव्र भावनाने पछाडले, हा सगळ्या कारणांपलीकडे आपला दोष आहे व व्यवस्थेचेही मोठे अपयश आहे. पदव्युत्तर शिक्षण घेत असताना आम्हा प्रत्येकाने तीव्र मानसिक, शारीरिक ताणाचा सामना केल्याची प्रत्येक डॉक्टरची कहाणी आहे. दरवर्षी केईएम, सायन, नायर येथील तीन-चार निवासी डॉक्टरांना टी.बी.चा संसर्ग होतोच. सायन अर्थोपेडीक विभागात दरवर्षी एखादा तरी निवासी डॉक्टर ताणापायी पदव्युत्तर शिक्षणच सोडून जातो. मार्डच्या संपातून हा संघर्ष अधूनमधून तात्पुरता उफाळून येत असतो. प्रत्येक विभागात राग, द्वेष, मत्सर, सीनियर-ज्युनिअर संघर्ष, भीती अशा नकारात्मक भावनांचा पूर वाहात असतो. यात रुग्णांना चांगली सेवा मिळावी, ही भावना असली, तरी त्यातून कामाचे व्यवस्थापन व काम करणाºया डॉक्टरांची मानसिकता बिघडत जाते. जातिवाचक शेरे म्हणा किंवा कनिष्ठांना अमानुष त्रास म्हणा, हे सगळे या ताणातून आलेल्या विकृत मानसिकतेतून जन्म घेते व पायलसारख्या निरागस डॉक्टरच्या आत्महत्येतून कधीतरी समाजापुढे येते. वैद्यकीय शिक्षणातून आपल्याला फक्त भल्यामोठ्या डिग्रीची रांग नावामागे असलेले हुशार डॉक्टरच नव्हे, तर चांगला संवेदनशील माणूस, तसेच समाजाला दिशा देऊ शकणारे विवेकी बौद्धिक नेतृत्वही तयार करायचे आहे, हे विसरून कसे चालेल. यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाला वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामाच्या तासांचे, मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापनही करावे लागणार आहे.
आज वैद्यकीय क्षेत्र मोठ्या नैतिक पेचातून जाते आहे. त्यातच पदव्युत्तर वैद्यकीय क्षेत्राचा आरक्षण लढा, तीव्र अंतर्गत स्पर्धा, वैद्यकीय महाविद्यालयातील कामाचा ताण अशा अनेक कारणांनी आज सर्वसामान्य डॉक्टर अस्वस्थ आहे. अशा स्थितीत पायल तडवीसारखी घटना या क्षेत्राला व पर्यायाने सर्वच बौद्धिक व्यवसायिक क्षेत्रांना मोठा हादरा देणारी ठरते. यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील अंतर्गत अस्वस्थता वाढीला लागतेच, नव्हे तर समाजाचा या क्षेत्राविषयीचा दृष्टिकोनही पणाला लागतो. या सर्व गोष्टींची वैद्यकीय क्षेत्राने व शासनानेही विचारपूर्वक हाताळणी करण्याचा हा क्षण आहे, तसेच यावर केवळ तात्पुरत्या मलमपट्ट्या नव्हे, तर याच्या मूलभूत कारणांचे समाधान करणे गरजेचे आहे. राज्यातील आरोग्याची दयनीय स्थिती पाहता, मानसिकदृष्ट्या सशक्त डॉक्टर तयार करण्याला प्राधान्य द्यावेच लागेल. पायलच्या आत्महत्येने प्रत्येक घटकाने यावर आत्मचिंतन करावे.(आरोग्यतज्ज्ञ)

टॅग्स :payal tadvi suicideपायल तडवी