शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

पवार पिता-कन्येचे खान्देशकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2020 12:31 PM

मिलिंद कुलकर्णी महाराष्टÑात महाविकास आघाडीचा प्रयोग स्थिरावत असताना राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संघटनकार्याकडे लक्ष पुरविलेले दिसते. एकीकडे ...

ठळक मुद्देपुन्हा बालेकिल्ला बनविण्यासाठी राष्टÑवादी काँग्रेसची रणनीतीकाँग्रेस आणि शिवसेना सत्तेत रममाण; संघटनकार्याकडे दुर्लक्ष शरद पवार यांचा सलग दुसऱ्या महिन्यात जळगाव दौरा होणार

मिलिंद कुलकर्णीमहाराष्टÑात महाविकास आघाडीचा प्रयोग स्थिरावत असताना राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संघटनकार्याकडे लक्ष पुरविलेले दिसते. एकीकडे राज्य सरकारला मार्गदर्शन आणि दिशादर्शन करीत असताना पक्षसंघटना कमजोर असलेल्या भागावर त्यांनी अधिक भर दिलेला आहे.जळगाव जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यानंतर लगेच मार्च महिन्यात ते दौºयावर येत आहे. प्रत्येक दौºयाची आखणी ही राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचे हितचिंतक आणि पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते यांना बळ देण्यासाठी आहे. फेब्रुवारी महिन्यातील मुक्कामी दौºयात त्यांनी चोपड्यात माजी आमदार कैलास पाटील यांच्या पुढाकारातून सुरु झालेल्या सुतगिरणीचे उद्घाटन केले. ज्येष्ठ नेते डॉ.सुरेश पाटील आणि अरुणभाई गुजराथी यांच्या मार्गदर्शनाखाली कैलास पाटील यांनी चोपडा पालिका आणि इतर संस्थांमध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये समन्वयवादी भूमिका बजावत कार्य केले. निवडणुका आल्या की, पक्षीय राजकारण आणि त्या संपल्या की, विकासात्मक राजकारणाचा नवा पायंडा चोपडा तालुक्यात घालून देण्यात आला. या मंडळींचे कौतुक करण्यासाठी पवार आवर्जून आले. त्यात पक्षाला बळ देण्याची भूमिका होतीच.जळगावात जैन उद्योग समूहाने आप्पासाहेब पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सुरु केलेल्या कृषी पुरस्कार सोहळ्याला ते सपत्नीक उपस्थित राहिले. दुपारी मुक्ताईनगरात महाविकास आघाडीच्या मेळाव्याला ते मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित राहिले. आमदार चंद्रकांत पाटील हे महाविकास आघाडीचे खºया अर्थाने राज्यातील पहिले आमदार ठरले आहेत. ते मूळ शिवसेनेचे, विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती असल्याने ते भाजप उमेदवाराविरुध्द अपक्ष उभे राहिले आणि राष्टÑवादी काँग्रेसने त्यांना समर्थन दिले. एकनाथराव खडसे यांची ३० वर्षांची सत्ता तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन संपुष्टात आणली. या प्रयोगाचे कौतुक करण्यासाठी पवार आणि ठाकरे आवर्जून मुक्ताईनगरला आले. नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांनी बळ दिले. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील व विनोद तराळ या दोन नेत्यांनी त्याग करीत उमेदवारी मागे घेतली. त्या दोघांचे कौतुक पवार यांनी केले.आता माजी आमदार मु.गं.पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि संजय गरुड यांच्या शेंदुर्णीतील शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील संस्थांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमासाठी पवार पुढील आठवड्यात येत आहेत. मु.गं.पवार हे शरद पवार यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून कार्य करणारे सहकारी, त्यांच्यापाठोपाठ विकास व संजय पवार हे पक्षसंघटनेत सक्रीय आहेत. तिकडे संजय गरुड यांनी गिरीश महाजन यांच्याविरोधात आघाडी सांभाळली आहे. बलाढ्य नेत्याविरुध्द लढत असताना पवार यांची साथ मोलाची ठरणार आहे.जळगावात पक्ष कार्यालयात तासभर थांबून त्यांनी पदाधिकारी रोज कार्यालयात येतात काय याची हजेरी घेतली. त्यापाठोपाठ सुप्रिया सुळे या जळगाव आणि धुळ्यात येऊन गेल्या. पाठपुरावा दौरा असे त्याचे स्वरुप होते. धुळ्यात अनिल गोटे यांच्यारुपाने आक्रमक नेता राष्टÑवादीला मिळाला आहे.-महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि सर्वेसर्वा शरद पवार यांनी संघटन कार्याकडे लक्ष पुरविलेले दिसते. संघटना कमकुवत असलेल्या भागात नेते व कार्यकर्त्यांना बळ देण्याची रणनीती आखली असल्याचे दिसत आहे.राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचे प्रभावक्षेत्र हे-महाराष्टÑ आहे आणि निर्णय प्रक्रियादेखील राज्यातच होत आहे. त्याचा चांगला परिणाम संघटन कार्यावर होऊ शकतो. शिवसेनादेखील त्याच धर्तीचा पक्ष असला तरी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री व पूत्र आदित्य हे कॅबिनेट मंत्री झाल्याने पक्षसंघटनेची सूत्रे दुसºया फळीत अद्याप हस्तांतरीत झालेली नाहीत. काँग्रेस नेत्यांचे डोळे अद्याप दिल्लीकडे लागलेले आहेत. 

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव