पवार पिता-कन्येचे खान्देशकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 12:31 PM2020-03-02T12:31:06+5:302020-03-02T12:32:42+5:30

मिलिंद कुलकर्णी महाराष्टÑात महाविकास आघाडीचा प्रयोग स्थिरावत असताना राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संघटनकार्याकडे लक्ष पुरविलेले दिसते. एकीकडे ...

Pawar looks at Khandesh of father and daughter | पवार पिता-कन्येचे खान्देशकडे लक्ष

पवार पिता-कन्येचे खान्देशकडे लक्ष

googlenewsNext
ठळक मुद्देपुन्हा बालेकिल्ला बनविण्यासाठी राष्टÑवादी काँग्रेसची रणनीतीकाँग्रेस आणि शिवसेना सत्तेत रममाण; संघटनकार्याकडे दुर्लक्ष शरद पवार यांचा सलग दुसऱ्या महिन्यात जळगाव दौरा होणार

मिलिंद कुलकर्णी
महाराष्टÑात महाविकास आघाडीचा प्रयोग स्थिरावत असताना राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संघटनकार्याकडे लक्ष पुरविलेले दिसते. एकीकडे राज्य सरकारला मार्गदर्शन आणि दिशादर्शन करीत असताना पक्षसंघटना कमजोर असलेल्या भागावर त्यांनी अधिक भर दिलेला आहे.
जळगाव जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यानंतर लगेच मार्च महिन्यात ते दौºयावर येत आहे. प्रत्येक दौºयाची आखणी ही राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचे हितचिंतक आणि पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते यांना बळ देण्यासाठी आहे. फेब्रुवारी महिन्यातील मुक्कामी दौºयात त्यांनी चोपड्यात माजी आमदार कैलास पाटील यांच्या पुढाकारातून सुरु झालेल्या सुतगिरणीचे उद्घाटन केले. ज्येष्ठ नेते डॉ.सुरेश पाटील आणि अरुणभाई गुजराथी यांच्या मार्गदर्शनाखाली कैलास पाटील यांनी चोपडा पालिका आणि इतर संस्थांमध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये समन्वयवादी भूमिका बजावत कार्य केले. निवडणुका आल्या की, पक्षीय राजकारण आणि त्या संपल्या की, विकासात्मक राजकारणाचा नवा पायंडा चोपडा तालुक्यात घालून देण्यात आला. या मंडळींचे कौतुक करण्यासाठी पवार आवर्जून आले. त्यात पक्षाला बळ देण्याची भूमिका होतीच.
जळगावात जैन उद्योग समूहाने आप्पासाहेब पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सुरु केलेल्या कृषी पुरस्कार सोहळ्याला ते सपत्नीक उपस्थित राहिले. दुपारी मुक्ताईनगरात महाविकास आघाडीच्या मेळाव्याला ते मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित राहिले. आमदार चंद्रकांत पाटील हे महाविकास आघाडीचे खºया अर्थाने राज्यातील पहिले आमदार ठरले आहेत. ते मूळ शिवसेनेचे, विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती असल्याने ते भाजप उमेदवाराविरुध्द अपक्ष उभे राहिले आणि राष्टÑवादी काँग्रेसने त्यांना समर्थन दिले. एकनाथराव खडसे यांची ३० वर्षांची सत्ता तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन संपुष्टात आणली. या प्रयोगाचे कौतुक करण्यासाठी पवार आणि ठाकरे आवर्जून मुक्ताईनगरला आले. नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांनी बळ दिले. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील व विनोद तराळ या दोन नेत्यांनी त्याग करीत उमेदवारी मागे घेतली. त्या दोघांचे कौतुक पवार यांनी केले.
आता माजी आमदार मु.गं.पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि संजय गरुड यांच्या शेंदुर्णीतील शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील संस्थांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमासाठी पवार पुढील आठवड्यात येत आहेत. मु.गं.पवार हे शरद पवार यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून कार्य करणारे सहकारी, त्यांच्यापाठोपाठ विकास व संजय पवार हे पक्षसंघटनेत सक्रीय आहेत. तिकडे संजय गरुड यांनी गिरीश महाजन यांच्याविरोधात आघाडी सांभाळली आहे. बलाढ्य नेत्याविरुध्द लढत असताना पवार यांची साथ मोलाची ठरणार आहे.
जळगावात पक्ष कार्यालयात तासभर थांबून त्यांनी पदाधिकारी रोज कार्यालयात येतात काय याची हजेरी घेतली. त्यापाठोपाठ सुप्रिया सुळे या जळगाव आणि धुळ्यात येऊन गेल्या. पाठपुरावा दौरा असे त्याचे स्वरुप होते. धुळ्यात अनिल गोटे यांच्यारुपाने आक्रमक नेता राष्टÑवादीला मिळाला आहे.

-महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि सर्वेसर्वा शरद पवार यांनी संघटन कार्याकडे लक्ष पुरविलेले दिसते. संघटना कमकुवत असलेल्या भागात नेते व कार्यकर्त्यांना बळ देण्याची रणनीती आखली असल्याचे दिसत आहे.
राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचे प्रभावक्षेत्र हे
-महाराष्टÑ आहे आणि निर्णय प्रक्रियादेखील राज्यातच होत आहे. त्याचा चांगला परिणाम संघटन कार्यावर होऊ शकतो. शिवसेनादेखील त्याच धर्तीचा पक्ष असला तरी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री व पूत्र आदित्य हे कॅबिनेट मंत्री झाल्याने पक्षसंघटनेची सूत्रे दुसºया फळीत अद्याप हस्तांतरीत झालेली नाहीत. काँग्रेस नेत्यांचे डोळे अद्याप दिल्लीकडे लागलेले आहेत.

 

Web Title: Pawar looks at Khandesh of father and daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.