शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
2
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
3
आजपासून संसदेचे अधिवेशन! पान मसाला, सिगारेट, तंबाखु महागणार; सरकार विधेयक सादर करणार
4
Nepal Earthquake: भारताच्या शेजारी देशात ४.४ तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट!
5
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
6
Bigg Boss Marathi: रितेश देशमुखच असणार 'बिग बॉस मराठी'चा होस्ट, सलमान खान म्हणाला- "भाऊ तुम्ही..."
7
आजचे राशीभविष्य, १ डिसेंबर २०२५: भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल
8
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
9
अग्रलेख : शेवटी मरण कार्यकर्त्यांचेच! अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार?
10
फोनमध्ये सिम नसल्यास ॲप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सॲप्स वेब थेट लॉगआउट होणार!
11
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
12
विशेष लेख: इम्रान खान जिवंत आहेत की नाहीत?
13
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
14
मध्य रेल्वेवर लवकरच २० प्लॅटफॉर्म वाढणार, कोकणसाठी अतिरिक्त मेल, एक्स्प्रेस चालवणे शक्य
15
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
16
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
17
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
18
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
19
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
20
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘पनामा पेपर्स’ आणि संबंधितांची सारवासारव

By admin | Updated: April 13, 2016 03:46 IST

पनामा पेपर्स हा विकीलिक्स नंतरचा जगभरात खळबळ उडवून देणारा मोठा गौप्यस्फोट ठरला आहे. पनामामधील मोझॅक फोन्सेका या विधी सल्लागार संस्थेच्या मदतीने जगातल्या अनेक

- प्रा.दिलीप फडके(ज्येष्ठ विश्लेषक)पनामा पेपर्स हा विकीलिक्स नंतरचा जगभरात खळबळ उडवून देणारा मोठा गौप्यस्फोट ठरला आहे. पनामामधील मोझॅक फोन्सेका या विधी सल्लागार संस्थेच्या मदतीने जगातल्या अनेक प्रभावशाली आणि उच्चपदस्थ व्यक्तींनी त्यांच्या जवळच्या बेहिशेबी संपत्तीची गुंतवणूक दुसऱ्या बनावट कंपन्यांमध्ये केली आणि स्वत:च्या देशात करचुकवेगिरी केली असा आरोप या प्रकरणात व्हायला लागला आणि त्यात जगातल्या अनेक देशांमधल्या महत्वाच्या नेत्यांचा किंवा त्यांच्या निकटवर्तीयांचा उल्लेख होऊ लागला. भारतातील जवळपास पाचशे जणांची नावे या प्रकरणात असल्याची चर्चा असून केंद्र सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी बहुआयामी यंत्रणा कामाला लावली आहे व येत्या पंधरा दिवसांमध्ये याबाबतचा अधिक तपशील मिळवावा अशा सूचना पंतप्रधानांनी दिल्याची चर्चा आहे. या पाचशे जणात मोठ्या राजकीय नेत्यांची फारशी नावे आत्तापर्यंत तरी बाहेर आलेली नाहीत. पण काही ठिकाणी या गौप्यस्फोटामुळे बरीच खळबळ उडाली आहे. ‘आॅस्ट्रेलियन फायनान्शियल रिव्ह्यू’ने नील चेनोवेथ यांचा या संदर्भातील लेख प्रकाशित केला असून त्यात विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान आणि धनाढ्य लोकाना या प्रकरणात कसे बळी बनवले आहे याचा आढावा घेतला आहे. एका स्वीडिश वाहिनीच्या पत्रकाराला मुलाखत देताना आईसलँडचे पंतप्रधान सिगमुंदुर डेव्हीड गुनालॉसन यांनी प्रौढीने सांगितले की आपल्या देशात जनता प्रामाणिकपणे कर देण्याला सर्वात जास्त महत्व देत असते. देशाच्या कार्यात सर्वांनीच सहभागी झाले पाहिजे, वगैरे वगैरे. त्यावर पत्रकाराने हळूच विचारले की तुमचे काय? तुम्ही आणि तुमच्या पत्नीने देशाबाहेर बेनामी कंपन्यांमध्ये जी गुंतवणूक केली आहे तिचे काय? गुनालॉसन गडबडले व ती मुलाखत गुंडाळली गेली. पुढे चित्रवाणीच्या पडद्यावर त्या मुलाखतीचे प्रसारण व्हायच्या आतच गुनालॉसन यांनी राजीनामा दिला. आपल्या लेखात चेनोवेथ यांनी पनामा पेपर्सच्या संदर्भात इंटरनॅशनल कॉन्सोर्टियम आॅफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्टने केलेल्या कामगिरीचा वेधक आढावा घेतला आहे. अपेक्षेप्रमाणे पनामा पेपर्समध्ये उल्लेख असलेल्या अनेक जागतिक नेत्यांनी आरोप फेटाळताना आपण काहीही चूक केली नसल्याचे म्हटले आहे व काहींनी तर विनाकारण आपल्याला लक्ष्य केले जात असल्याची ओरड केली आहे. काही देशांनी मात्र या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. ज्यांची नावे या प्रकरणात आली आहेत त्यांच्या देशांच्या प्रसारमाध्यमांनी त्याकडे कसे पाहिले आहे हे पाहणे महत्वाचे ठरणारे आहे.रशियाने म्हटले आहे की, ही कागदपत्रे म्हणजे अमेरिकेचा कट आहे. अध्यक्ष पुतिन यांच्या निकटच्या मित्राचे परदेशात दोन अब्ज डॉलर्स असल्याचे कागदपत्रात म्हटले आहे. पुतिन, आमचा देश, आमची स्थिरता व आगामी निवडणुका यांना लक्ष्य करताना देशात अस्थिरता निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे क्रेमलिनच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. आॅनलाईन इंग्रजी ‘प्रावदा’ने या संदर्भात फिल बटलर या अमेरिकन पत्रकाराचा लेख प्रकाशित केला असून त्यात पनामा पेपर्स हा एक बनाव असून पुतीन यांच्यावर निरर्थक आरोप करण्यासाठी पद्धतशीरपणाने तो करण्यात आला असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी ‘गार्डियन’मधल्या लुक हार्डिंग यांच्या दोन बिलियन डॉलर्स कसे दडवावेत या शीर्षकाखालच्या लेखाचा संदर्भ देत तो लेख वस्तुस्थितीचा विपर्यास कशा तऱ्हेने करतो, याची चर्चा केली आहे. गार्डियनने इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन या प्रकरणात अडकल्याचे जाहीर झाल्याने या प्रकरणाला ठळक प्रसिद्धी दिली आहे. परिणामी कॅमेरॉन यांच्याच्यावर दबाव वाढला आहे. त्यांच्या वडलांनी परदेशात निधी स्थापन केला होता व तीस वर्षे ब्रिटनमध्ये करचुकवेगिरी केली होती. बहामाज येथील ब्लेअरमोअर होल्डिंगची स्थापना वडील इयान कॅमेरॉन यांच्या नावाने केली होती. तो गुंतवणूक निधी होता व त्यांनी ब्रिटनमधील पैसे त्यात वळवले होते. आपल्यावरच्या आरोपांचा सामना करताना कॅमेरॉन आक्र मक होऊन फ्रंट फूटवर येत या प्रश्नाचा सामना करीत असल्याचे गार्डियनने विशेष संपादकीयात म्हटले आहे. या प्रश्नावर आपल्या पक्षातल्या संसद सदस्यांचा पाठिंबा मिळवण्यात कॅमेरॉन यशस्वी झाले असले तरी त्यांची खरी परीक्षा जनता त्यांचे म्हणणे मान्य करते की नाही यावर होणार आहे आणि मतदानातून ते लवकरच समजेल असा शेराही गार्डियनने मारला आहे. पनामा पेपर्स प्रकरणात चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे नावही समोर आले आहे. ‘पीपल्स डेली’ वा इंग्रजीतून उपलब्ध असलेल्या इतर चिनी प्रसारमाध्यमातून यावर फारशी चर्चा होताना दिसत नाही. तिथे कॉन्सोर्टियम आॅफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्ट किंवा पनामा पेपर्सला ठळक प्रसिद्धी देणाऱ्या संकेतस्थळांवर खूप बंधने आणली असल्याचीही माहिती मिळते. तथापी यावरच्या आपल्या लेखात ‘पीपल्स डेली’चे संचालक हुआन जिंग यांनी पनामा पेपर्स हे पश्चिमेमधल्या शक्तिशाली गटाने घडवून आणलेले षड्यंत्र आहे आणि मुख्यत: चीनचे जिनपिंग किंवा रशियाच्या पुतीन यांना कमकुवत करण्यासाठी ते रचले असल्याचे म्हटले आहे. यामध्ये पश्चिमेतल्या काही नेत्यांची नावे आली असली तरी त्यात असणाऱ्या आईसलँडच्या पंतप्रधानांसारखी अगदीच लिंबूटिंबू नावे आहेत. त्यामुळे ती फारशी महत्वाची नाहीत अशी मल्लीनाथीही या लेखात केली आहे. तथाकथित शोध पत्रकारितेवरसुद्धा या लेखात त्यांनी सडकून टीका केली आहे. पनामा पेपर्समध्ये अडकलेल्या अर्जेन्टिनाच्या राष्ट्रपती मॉरिसियो मॅक्री यांच्या विरोधात त्यांनी परदेशात जमवलेल्या काळ्या पैशांबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. मॅक्री हे लॅटिन अमेरिकेत उजव्या आघाडीच्या पुनरूत्थानाचे प्रतीक मानले जातात. अर्जेन्टिनाच्या वृत्तपत्रांमध्ये सध्या या प्रकरणाबद्दल सुरु असलेल्या न्यायालयीन चौकशी संदर्भातल्या बातम्या वाचायला मिळतात. त्यात मक्री यांचे परदेशातल्या अनेकांशी आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप तिथले एक पत्रकार ह्युगो अलकॉनडा मोन यांनी न्यायालयात केल्याचे वाचायला मिळते. या प्रकरणात तिथला फुटबॉल खेळाडू मस्सी याचे नावही आले आहे. पण त्याबद्दलची प्राथमिक चर्चाच अजून तिथे चालू आहे. एकूणच अर्जेन्टिनामधला पनामा पेपर्सचा सामना अजून खऱ्या अर्थाने रंगायचा आहे हे लक्षात येते. ‘न्यूयॉर्क टाईम्स’मध्ये पनामाचे राष्ट्रपती जुआन कार्लोस वरेला यांचा लेख प्रसिद्ध झाली असून त्यात ‘पनामाला दोष देऊ नका करचोरी ही जागतिक समस्या आहे’ असे ते सांगत आहेत. तो लेख खरे तर मुळातूनच वाचायला हवा.