बंड्या अन् गुंड्या तसे भलतेच इरसाल. नको त्या गोष्टीत नको तेवढं नाक खुपसण्याची दोघांनाही भलतीच आवड. आता याला जग ‘घाण सवय’ म्हणतं, यात या बिच्चाऱ्यांचा तरी काय दोष? मध्यंतरी ‘मातोश्री’वर घोषणा झाली होती की, ‘आमचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरतात...’ ...
अंदाजे चार वर्षे झाली असतील, उच्च न्यायालय खड्ड्यांविषयी महापालिका व राज्य शासनाचा कान वारंवार पिरगळत आहे़ एवढ्या वर्षांत एखादा कैदी सुधारला असता किंवा गंभीर आजार बराही झाला असता; ...
मेक्सिकोच्या सीमेवर कुंपण भिंत उभारण्याच्या मुद्यावरून अमेरिकेत रणकंदन माजले असतानाच, भारतातही आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) वरून जोरदार गदारोळ सुरू झाला आहे. ...
महाराष्ट्रात अलीकडे मातंग समाजावर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले. उदा. जळगाव जिल्ह्यातील वाकडी गावात सवर्णांच्या विहिरीत पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मातंग मुलांची नग्न धिंड काढून त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. ...
नागरिकांच्या राष्ट्रीय माहितीचा जो अहवाल नुकताच प्रकाशित झाला. त्यात आसामातील ४० लक्ष लोकांचा समावेश नाही. एकेकाळी अशा माणसांना तात्काळ देशाबाहेर काढले जावे अशी मागणी व तरतूद होती. ...
डिजिटलच्या जमान्यात केवळ ग्रामपंचायत ‘पेपरलेस’ करून समाधान मानणे चुकीचे ठरेल. गटारमुक्त व डासमुक्त गाव ही प्रत्येक खेड्याची गरज आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात डासमुक्तीचे ‘भारुड’ चांगलेच रंगात आले आहे... ...
आपल्या नावाप्रमाणेच समस्त मनुष्यजातीत प्रेम आणि आपुलकीची भावना निर्माण करणाऱ्या, जैन धर्माचा संदेश सर्वत्र पोहोचविणाºया वाणीभूषण प्रीतिसुधाजी म.सा. या बुधवारी (दि.१) वयाची ७५ वर्षे पूर्ण करत आहेत. ...
वरळीच्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी टाटा कंपनीची केलेली निवड योग्य असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आणि पुन्हा एकदा बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या आशा पल्लवित झाल्या. ...
ज्ञानरचनावाद, हसत-खेळत शिक्षणासह विद्यार्थ्यांना इंग्रजीचे ज्ञान देण्यासाठी विविध उपक्रम या शाळांमधून राबविले गेले. त्यातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला. ग्रामीण भागातील विद्यार्थीही चमकू लागले. विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना शाळां ...