दादरच्या भवनातील दरबार आज खचाखच भरलेला...मंत्रिगण, सरदार, मनसबदार, वतनदार, पोद्दार वगैरे सगळे झाडून हजर... उद्धोमहाराजांच्या आगमनाची साऱ्यांना प्रतीक्षा...दारावर हालचाल झाली तसे सगळेजण सावध झाले. बाहेर कसला तरी गलका सुरू होता. ...
अनेक वर्षांनंतर जायकवाडी धरण भरले. आता ते २९ टक्क्यांवर आले आहे. शंभर टक्क्यांचा आनंद मानायचा की २९ टक्क्यांचे दु:ख? कारण हे धरण भरले काय नि मृतसाठ्यात गेले काय, औरंगाबादकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही सुटत नाही. ...
भरतीचा मुद्दा पुढे रेटत जादा कामाला नकार देऊन मोटरमननी शुक्रवारी केलेले आंदोलन आश्वासन पदरी घेऊन पार पडले. वस्तुत: व्यवस्थापनाशी थेट चर्चा करूनही हा प्रश्न सोडवता आला असता. ...
मुंबईच्या वैभव राऊत या ‘हिंदूू अतिरेक्या’सह त्याच्या तीन साथीदारांना त्यांच्याजवळील बॉम्ब्ससकट ताब्यात घेऊन महाराष्ट्राच्या अतिरेकविरोधी पथकाने एका जुन्या व खुनी परंपरेचे आताचे पाईक उघड केले आहेत. ...
धार्मिक स्थळांकडून जमा होणारा निधी विदर्भातील बालगृहांच्या विकासासाठी वापरण्याचा आदेश देऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागरिकांना सामाजिक बांधिलकीचा नवा वस्तूपाठ घालून दिला आहे. ...
एकदा पाकिस्तानमधील पत्रकारांनी मला विचारले की, हिंदुस्तान व पाकिस्तान एकाच वेळी स्वतंत्र होऊनही भारताने खूप प्रगती केली व पाकिस्तान मागे राहिला, असे का? मी त्यांना उत्तर दिले होते की, आमच्याकडे महात्मा गांधी आहेत, वृत्तपत्र स्वातंत्र्य आहे. ...
पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ या दोन्ही भागांच्या समान विकासाकडे लक्ष पुरविण्याची गरज आहे. राज्याच्या उर्वरित भागाच्या तुलनेत मागे पडलेल्या विदर्भाला कोणत्याही स्वरूपात निधी मिळत असेल तर त्याचे स्वागतच व्हायला हवे; मात्र त्याच वेळी निधीचे समान वाटप ...
देवेंद्रभाऊ काय आणि पृथ्वीराजबाबा काय, विधिमंडळाचे सोपस्कार त्यांनी पार पाडलेच होते ना! पण तेथे तिरोडकर नामक बालक आडवा आलाच आणि पुढचे महाभारत घडते आहे. नमोच्या साथीने ‘तामिळनाडू पॅटर्न’ देवेंद्रभाऊंनी प्रामाणिकपणे राबविला आणि पुन्हा एखादा तिरोडकर उभा ...
वैद्यकीय प्रवेशासाठी देशपातळीवर घेतली जाणारी नीट (राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा) ऑनलाईन तसेच वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केला. परंतु, ...
राज्यसभेच्या उप सभापतीच्या निवडणुकीस एरवी फार महत्त्व दिल्या जात नाही. यावेळी मात्र ही निवडणूक चांगलीच गाजली. तोंडावर येऊन ठेपलेल्या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका, आतापासूनच वाजायला लागलेले लोकसभा निवडणुकीचे पडघम आणि भारतीय जनता पक्षास सत्तेतून घ ...