शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पद्मावती छे... शूर्पणखा

By संदीप प्रधान | Updated: November 23, 2017 23:45 IST

​​​​​​​दीपिका आपले नाक मुठीत धरून बसली आहे. संजय लीला भन्साळी अस्वस्थतेने येरझारा घालत आहेत.

दीपिका आपले नाक मुठीत धरून बसली आहे. संजय लीला भन्साळी अस्वस्थतेने येरझारा घालत आहेत. सुटाबुटातील इन्शुरन्स कंपनीचा अधिकारी कपाळावरील घाम पुसत आहे तर एक पटकथा लेखक आपली स्क्रीप्ट वाचत आहे.दीपिका : संजय, माझं नाक कापणार असं ते करणी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्रनाथ म्हणतायत. आय अ‍ॅम स्केअर्ड... (नाक मुठीत घट्ट धरून ठेवते)इन्शुरन्स अधिकारी : संजय, मी हात जोडून विनंती करतो. हा चित्रपट रिलीज करू नका. आमचे फार मोठ्ठे नुकसान होईल. दीपिका हिच्या नाकाचा १०० कोटींचा विमा आम्ही मागच्याच महिन्यात उतरवलाय.संजय : तुम्हाला तुमच्या कंपनीच्या नुकसानीची पडली आहे. पण माझे २०० कोटी बुडायची वेळ आलीय त्याचे काय?लेखक : थांबा...थांबा... माझ्याकडे अफलातून आयडिया आहे. समजा त्यांनी दीपिकाचे नाक कापले...दीपिका : (किंचाळते) नो...नो... नो...संजय : अगं, जरा ऐकून तर घे...लेखक : समजा दीपिकाचे नाक कापलं गेलं तर पद्मावतीच्या रिलीजपूर्वी आपण ‘शूर्पणखा’ हा पिक्चर रिलीज करू. माझी स्क्रीप्ट तयार आहे. शूर्पणखा ही रावणाची बहीण. राम, सीता व लक्ष्मण पंचवटीत वनवास भोगत असताना शूर्पणखा तेथे आली आणि रामाला पाहून मोहित झाली. रामाला आकृष्ट करण्याकरिता कमनीय बांधा, नाजूक कांती, मादक नजर आणि अल्लड हास्य. आपण विवाहित असल्याने तुझ्याशी लग्न करू शकत नाही, असे राम शूर्पणखेला सांगतो. आपल्या आणि रामाच्यामध्ये सीता असल्याने शूर्पणखा सीतेला मारायला धावते. लागलीच राम शूर्पणखेला विद्रूप करण्याकरिता तिचे नाक कापण्याची आज्ञा लक्ष्मणाला करतो. फिल्ममध्ये शूर्पणखा आणि सीतेचे एका भन्नाट साँगवरील नृत्य टाकू. हीट फॉर्म्युला.संजय : मस्त, दीपिका या स्क्रीप्टमध्ये ड्रामा, इमोशन आहे. आता तुझे नाक कापले गेले तरी त्याची चिंता करू नकोस. ही फिल्म नक्की ५०० कोटींचा धंदा करील. या इन्शुरन्स कंपनीवाल्यालाही मग चिंता करायला नको.दीपिका नाक घट्ट धरून बसते...

टॅग्स :Padmavatiपद्मावतीSanjay Leela bhansaliसंजय लीला भन्साली