शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

सोशल मीडियाचा अतिवापर घातक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 02:27 IST

ख्रिस्तपूर्व ४२९ साली एका ग्रीक शोकांतिकेत सोफोक्लीसने लिहिले होते की, आजच्या वास्तवात तसेच भूतकाळाचे अवलोकन करताना, याप्रकारे दोनदा त्रास सहन करण्याची माझी तयारी नाही!

- डॉ. एस. एस. मंठा(माजी चेअरमन, एआयसीटीई एडीजे, प्रोफेसर, एनआयएएस, बंगळुरू)ख्रिस्तपूर्व ४२९ साली एका ग्रीक शोकांतिकेत सोफोक्लीसने लिहिले होते की, आजच्या वास्तवात तसेच भूतकाळाचे अवलोकन करताना, याप्रकारे दोनदा त्रास सहन करण्याची माझी तयारी नाही! त्या बोलण्यातील तो डंख, आज हजारो वर्षांनंतरही अनुभवास येत आहे. आजच्या काळात इन्स्टाग्राम, टिष्ट्वटर, लिंक्ड-इन किंवा सर्वव्यापी फेसबुक यांनी आपले जीवन व्यापून टाकले आहे. आपल्या जीवनात कधी झाला नव्हता एवढा बदल ते घडवून आणत आहेत. सोफोक्लीसच्या कथानकातील पात्रे अखेरीस दुर्बल होतात. त्या तºहेची शोकांतिका वास्तवात आजच्या काळातही घडण्याची शक्यता आहे.सोशल मीडिया हे कोकेनप्रमाणे आपल्या जीवनावर मानसिक परिणाम घडवत आहे. त्यामुळे आपण कौशल्यहीन तसेच निर्णयहीन बनण्याचा धोका संभवतो. आपला मोबाइल हरवला तर आपण कितीवेळा आपल्या पत्नीला किंवा मुलांना एखादा नंबर आठवायला सांगितले असेल! दिवसाचे २० तास फोनवर राहिल्याने संसारातील अनेक गोष्टींचा आपल्याला विसर पडत असतो! भविष्यात माणूस मानसिक दुर्बलतेने पछाडलेला राहील याचे तर हे द्योतक नसेल ना? डोक्यात माहिती कोंबणे, अनेक गोष्टी आणि अनेक पासवर्ड लक्षात ठेवणे यामुळे मेंदू बथ्थड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.प्रत्येक व्यक्ती शॉपिंगच्या वेबसाईटवर किती वेळ घालवते? याशिवाय इन्स्टाग्राम, टिष्ट्वटर आणि फेसबुक यांना आपण किती वेळ देतो? आपण आपला फोन केवळ कामापुरताच वापरतो का? आपण ज्या गोष्टी इतरांसमोर कधी उघड केल्या नाहीत, त्या गोष्टी आपण फेसबुकवर बिनदिक्कतपणे उघड करतो याची आपल्याला कधी जाणीव होते का? त्याऐवजी आपला वेळ आॅनलाइन वाचन करण्यात किंवा आपले जीवन सुसह्य करणारे तंत्रज्ञान जाणून घेण्यात आपण खर्च करतो का?‘‘सुरुवातीला तुम्ही शहाणे होता, नंतरही तुम्ही शहाणे असणार आहात, पण मधल्या काळात मात्र तुम्ही वेगळेच असता,’’ असे विचार ‘ब्रोकन गॉड’ या वैज्ञानिक कादंबरीत डेव्हिड झिन्देल यांनी व्यक्त केले आहेत. आपल्या डी.एन.ए.मध्ये परिवर्तन घडून आल्यानंतर आपण वेगळेच होतो आणि आपल्या जीवनविषयक तत्त्वज्ञानाचा नव्याने विचार करू लागतो. तेव्हा आपण मोबाइलच्या व सोशल मीडियाच्या आहारी न जाता त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करायला हवा; अन्यथा भावी पिढी कोणताही निर्णय घेण्यास सक्षम राहणार नाही.आपणसुद्धा फोनवर बोलत असताना आपल्या सोबत असणाऱ्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करीत नाही का? मित्राशी बोलत असताना फोनची रिंग वाजली तर आपण बोलणे थांबवूून अगोदर फोन घेतो. संगणकावर खेळ खेळताना आपण वेळेचे भान बाळगत नाही. कुटुंबासमवेत जेवण घेत असताना आपण मोबाइलवर आलेले मेसेजेस वाचत राहतो. आपण मोटार चालवीत असताना आपली बायको शेजारी बसून फेसबुकवर असते. या सर्व गोष्टींकडे आपण ‘आता काळ बदलला आहे’, असे म्हणत दुर्लक्ष करायचे का? आपले लक्ष विचलित झाल्याने आपण वर्तमानातून भूतकाळाकडे वळतो आणि त्यातून परत वर्तमानात येणे सहज शक्य होत नाही, हे समजून घ्यायला हवे.मोबाइल फोनमुळे आपल्या जीवनात बदल घडून आला आहे हे खरे आहे. आपण त्याचा उपयोग करून वाचन करतो, गाणी ऐकतो, आपल्या अपॉइन्टमेंट्सची नोंद ठेवतो, संशोधन करतो, काम करतो, त्याद्वारे आपले व्यक्तिगत संबंध कायम राखण्याचा प्रयत्न करतो. पण मोबाइलमुळे आपल्याला सॉरी म्हणण्यातही पूर्वीची आस्था उरलेली नाही. सामाजिक संबंध आणि कौशल्याची उभारणी होण्यासाठी वेळ लागतो. आपण मित्रासोबत बोलत असताना आपल्या शिक्षकाच्या जुन्या आठवणी काढतो. आॅफिसमध्ये मधल्या सुटीत गप्पा मारत असताना त्या संभाषणातूनच नातेसंबंध निर्माण होत असतात. पण आज एकत्र बसूनही प्रत्येक जण वेगवेगळा फोनवर गुंतलेला असतो. त्यातून परस्पर भावनिक संबंध कसे निर्माण होणार? प्रोफेसर मेरेडिथ डेव्हिड आणि प्रोफेसर जेम्स रॉबर्टस् यांनी अभ्यास करून असा निष्कर्ष काढला आहे की, ‘‘सेलफोनने आम्हाला जीवनापासून वंचित केले आहे!’’ त्यामुळे निर्माण होणाºया एकटेपणामुळे वैवाहिक सौख्यावरही विपरीत परिणाम होत आहे!आपण एकदा फोनवरील माहिती जाणून घेतल्यावरही पुन्हा पुन्हा सेलफोन बघत नाही का? तेथे आपल्या इच्छाशक्तीचा प्रश्नच नसतो. कारण फोनवरील अ‍ॅप्सची निर्मिती याच तºहेने करण्यात आलेली असते की त्याचे तुम्हाला व्यसन लागावे! स्मार्ट फोन खिशात ठेवलेल्या स्लॉट मशीनसारखे असतात. वैज्ञानिक पत्रकार असलेल्या कॅथेरीन प्राईसचे म्हणणे आहे की, डिजिटल मीडियाचा वापर करीत असताना आपले मन सतत विचलित अवस्थेत असते आणि त्याचा परिणाम दीर्घकाळ राहणारा असतो. त्याचे परिणाम आपल्या मेंदूवरही नकळत होत असतात. अशा परिस्थितीत आपण सोशल मीडियाचा वापर थांबवू शकू का? किंवा निदान सोशल मीडियाच्या वापरावर बंधने आणू शकू का? सोशल मीडियाचा वापर फक्त एक तासच करायचा असे आपण ठरवू शकू का? अशी बंधने स्वत:वर लादून घेणे हे वास्तविक आपले कर्तव्य आहे! अन्यथा आपल्या भावी पिढ्या डिजिटली दुबळ्या झाल्याशिवाय राहणार नाहीत!

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया