शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
2
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
3
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
4
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
5
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
7
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
8
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
9
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
10
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
11
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
12
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
13
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
14
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
15
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव
17
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
18
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
19
‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’
20
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार

विशेष लेखः 'मी टू' ही चळवळ की अल्पायुषी खळबळ?

By संदीप प्रधान | Published: October 10, 2018 6:39 PM

आता जीवनातील असे एकही क्षेत्र नाही की, जेथे महिलांनी आपला झेंडा रोवलेला नाही. मात्र तरीही शोषण संपलेले नाही. शोषणाचे स्वरूप बदलले असेल पण ते टिकून आहे. शोषण हे केवळ स्त्रीचेच होते हेही खरे नाही.

रुपेरी पडद्यावरील जग हे सर्वसामान्यांकरिता स्वप्नवत होते तर रुपेरी पडद्यामागील जग हे तर सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडे असते. मात्र अगोदर मिनर्व्हा थिएटरमधील ७० एमएम आकाराचा मनोरंजनाचा पडदा घराघरात टी.व्ही. संच आल्यावर छोटा झाला. आता तर मोबाईलच्या स्क्रीनमुळे तो खूपच छोटा झाला आहे. पडदा जेव्हा मोठा होता तेव्हा सर्वसामान्यांकरिता तो आकर्षणाचा विषय होता. तो छोटा झाला तेव्हा नित्याचा झाला. मात्र आता घरगुती कार्यक्रम असो की एखादी अपघाताची दुर्दैवी घटना प्रथम ती आपल्या कॅमेरात पकडून लक्षावधी लोकांपर्यंत पोहोचवण्याची हौस वाढल्याने हळूहळू पडद्याचे आकर्षण संपुष्टात येऊ लागले आहे. आता तर सोशल मीडियावर; विशेष करून व्हॉटसअ‍ॅप व ट्विटरवर विदेशातील एखादा अपघाताचा व्हिडीओ आपल्या देशातील म्हणून खपवला जातो. दूरवर झालेली मारामारी पलीकडच्या गल्लीत काल घडली तीच असल्याचे भासवले जाते. कुठलीही खातरजमा न करता शेकडो लोक तेच फॉरवर्ड करतात. वेब सीरिजमुळे आता एनएसडी किंवा फिल्म इन्स्टिट्यूटमधूनच कलाकार निपजतात हे मिथक ठरले आहे. कुठल्याही गावखेड्यातील डायलॉगबाजी किंवा तालावर कंबर हलवणारी व्यक्ती एका रात्रीत सुपरहिरो ठरू शकते. या बदलांचे काही लाभ नक्कीच आहेत. पण एका रात्रीत येणारे स्टारडम पचवणे हेही तेवढेच अवघड आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे एकेकाळी हिंदी चित्रपटातील नायक, नायिकांबाबतच्या घटना या आख्यायिका वाटत होत्या. आता बॉलिवुड स्टार्सच्या जीवनात घडणाऱ्या घटना सर्वसामान्यांना आपल्याच वाटू लागल्या आहेत. त्यातूनच की काय तनुश्री दत्ता नावाच्या सध्या लुप्त झालेल्या अभिनेत्रीला अचानक वलय लाभले आहे. महिलांवरील अन्याय, अत्याचार यांच्या विरोधातील लढ्याची परंपरा सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, डॉ. आनंदीबाई जोशी यांच्याकडून वळणावळणाने तनुश्री दत्ता यांच्याकडे जाईल, हे कुणाच्या स्वप्नातही आले नसेल. तनुश्रीने केलेल्या आरोपांच्या तथ्यात जाण्याचे बिलकूल कारण नाही. त्याकरिता पोलीस, न्यायालय यासारख्या यंत्रणा आहेत. मात्र तनुश्रीने केलेल्या आरोपानंतर 'मी टू' (मी सुद्धा) ही जी मोहीम सोशल मीडियावर सुरू झाली आहे ती स्त्री-पुरुष समानतेच्या चळवळीला सुरुंग लावणारी आहे.

संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक महिला वर्ष घोषित केल्यानंतर सत्तरच्या दशकाच्या अखेरीस व १९८० च्या दशकात भारतात स्त्री स्वातंत्र्याची चळवळ खूप तेजीत होती. त्या चळवळीत स्त्री स्वातंत्र्याबाबतचे वेगवेगळे प्रवाह होते. मात्र स्त्री स्वातंत्र्याची चळवळ पुरुषांच्या सहकार्याखेरीज यशस्वी होणार नाही, हाच मतप्रवाह प्रबळ ठरला. मुळात आतापर्यंत पुरुषांनी स्त्रीचे शोषण केले, अत्याचार केले म्हणून आता त्याची सव्याज परतफेड करायची या विचाराने जर महिला संघटीत झाल्या तर त्यातून हाती काही लागणार नाही. राज्यघटनेनी स्त्री व पुरुष यांना समान मानले असल्याने आम्ही आमचे हक्क लोकशाही मार्गाने मिळवणार, या विचारांनी चाललेली चळवळ हीच यशस्वी झाली. मात्र आता 'मी टू' याला जे चळवळीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरु आहे तो फसवा आहे.

स्त्री जेव्हा अशिक्षित होती, पदराखाली होती, तेव्हाही अत्याचाराच्या घटना घडत होत्या. आता जीवनातील असे एकही क्षेत्र नाही की, जेथे महिलांनी आपला झेंडा रोवलेला नाही. मात्र तरीही शोषण संपलेले नाही. शोषणाचे स्वरूप बदलले असेल पण ते टिकून आहे. शोषण हे केवळ स्त्रीचेच होते हेही खरे नाही. शोषणावर आधारित व्यवस्थेत पुरुषाचेही शोषण होते. कदाचित स्त्रीचे लैंगिक शोषण होत असेल तर पुरुषाचे आर्थिक होत असेल. आठ किंवा दहा वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांचा उल्लेख करून अमूक एका व्यक्तीने त्यावेळी माझ्यावर जबरदस्ती केली किंवा माझ्या शरीराकडे रोखून बघितले अथवा मला वेळी-अवेळी फोन करुन अश्लील संभाषण केले या तक्रारी पुराव्याखेरीज केल्याने हाती काहीच लागणार नाही. मुळात जेव्हा ही घटना घडली तेव्हा लागलीच पोलिसात तक्रार का दाखल केली नाही? कोर्टात दाद का मागितली नाही? असे प्रश्न केले जाऊ शकतात. त्यावर बहुतांश महिला असा प्रतिवाद करतात की, त्यावेळी ती माझ्या करिअरची सुरुवात होती. मी पोलिसात दाद मागितली असती तर माझे करिअर संपुष्टात आले असते. हे म्हणणे चूक नाही. पण मग त्यामुळे होते असे की, करिअर की आत्मसन्मान या द्वंद्वात जेव्हा स्त्री करिअरला प्राधान्य देते तेव्हा ती शोषणावर आधारित व्यवस्थेतील एका सत्ताकेंद्राला पुन:पुन्हा तसेच वागण्याकरिता अप्रत्यक्ष प्रोत्साहन देत असते. करिअरचे सर्वोच्च शिखर गाठल्यावर मग आपण त्या क्षणाला आत्मसन्मानाशी तडजोड केली याची वर्षानुवर्षे मनाला लागलेली बोच जर तनुश्रीच्या 'मी टू'च्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतल्याप्रमाणे ट्विट करून किंवा फेसबुकवर पोस्ट टाकून पुसून टाकण्याची औपचारिकता पार पाडणार असेल तर त्यामुळे काहीच साध्य होणार नाही. करिअरची सुरुवात करीत असलेली सध्याची तरुणी त्यातून हीच प्रेरणा घेईल की, अगोदर मनावर दगड ठेवून वरवर जाण्याच्या शिड्या सर करुया आणि कालांतराने गंगेत डुबकी मारून पापक्षालन करतात तसे सोशल मीडियावर 'मन की भडास' काढूया.

मी साहेब आहे त्यामुळे माझ्या हाताखालच्या स्त्री अथवा पुरुष यांचे भवितव्य माझ्या हातात आहे. मी केव्हाही त्यांचे वाईट करू शकतो, अशी शोषणावर आधारित व्यवस्था; मग ती सरकारी कार्यालयात असो की एखाद्या कॉर्पोरेट कार्यालयात पोसली गेलेली असेल तर मग स्त्रीला बॉसचा ग्लास भरण्यापासून त्याचे मन रिझवण्यापर्यंत काहीही करावे लागेल आणि पुरुष कर्मचाऱ्याला बॉसकरिता कॉन्डमपासून बाटली पुरवण्यापर्यंत किंवा वेळप्रसंगी त्याच्या शरीरसुखाची व्यवस्था करण्यापर्यंत सारे करावे लागू शकते. कदाचित एखाद्या आत्मसन्मान जागृत असलेल्या पुरुषाचे मन ही व्यवस्था मान्य करणार नाही. परंतु करिअरकरिता तोही आत्मसन्मानाच्या गळ्याला नख लावेल. मात्र तो सोशल मीडियावर व्यक्त होणार नाही. याच व्यवस्थेतून उच्चपदस्थ झालेली स्त्री किंवा पुरुष हे मग तीच शोषणाधारित व्यवस्था सुरू ठेवतात. वर्षानुवर्षे अशा अनुभवांना सामोरे गेल्याने बनचुके बनलेले सर्वसामान्य स्त्री-पुरुष मग 'कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है' हा फिल्मी डायलॉग लोकल ट्रेनमध्ये किंवा कॉफी शॉपमध्ये मारतात.

तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर पुन्हा एकवार केलेले आरोप एखाद्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये प्रवेश मिळवण्याकरिता केले का? या आरोपांचे वादळ टिकवून ठेवण्याकरिता व पर्यायाच्या त्या रिअ‍ॅलिटी शोचा टीआरपी कायम राखण्याकरिता इतरांनाही असेच आरोप करण्याकरिता काही रकमा मोजल्या गेल्या का? या व अशा प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यात आहेत. अनेक कलाकार आपल्या उच्चीच्या काळात बरीच माया गोळा करतात व उडवतात. कालांतराने त्यांना सामान्य माणसांसारखे जगता येत नाही. त्यांची पैशांची गरज तशीच राहते. मग अशा रिअ‍ॅलिटी शोंच्या टीआरपीकरिता, चित्रपटांच्या प्रमोशनकरिता वाद निर्माण करण्याकरिता ते चक्क मोठमोठ्या रकमा घेतात, अशी चर्चा आहे. अनेक फिल्मी गॉसिप मॅग्झीन्समधील वृत्ते पचवण्याचा अनुभव गाठीशी असलेल्या कलाकारांचे काळीज अशा आरोपांना, वादांना निर्ढावलेले असू शकते. मात्र तनुश्रीने केले तसेच आरोप एखाद्या वृत्तपत्रातील किंवा कंपनीतील महिलेने केले आणि 'मी टू'च्या तथाकथित क्रांतीचा आधार घेतला तर दोन कुटुंबांचे आयुष्य विस्तवावर ठेवण्यासारखे होईल. पुरुषांना स्त्रियांसोबत काम करायचे भय वाटेल, अशी स्त्रियांची चळवळ असूच कशी शकते?

टॅग्स :Metoo CampaignमीटूTanushree Duttaतनुश्री दत्ताNana Patekarनाना पाटेकर