शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
4
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
5
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
6
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
7
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
9
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
10
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
11
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
12
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
13
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
14
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
15
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
16
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
17
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
19
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
20
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?

ऑनलाइन गेमिंग! संधी की संकट? कायदेशीर अन् बेकायदेशीर खेळांमधील फरक मुलांना समजावून सांगणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 09:27 IST

मुद्द्याची गोष्ट : राज्य सरकारने नुकतेच जाहीर केलेले ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स व एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण हे कला, कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा संगम घडवणारे ठरले. केंद्राने त्याच काळात ऑनलाइन गेमिंग व बेटिंगविरोधी कायदा करून, आर्थिक धोके रोखण्याचे पाऊल उचलले. एकीकडे रोजगारनिर्मिती व खेळांना प्रोत्साहन, तर दुसरीकडे सट्टेबाजीवर बंदी. या दोन घटना समजणे आवश्यक आहे.

डॉ. दीपक शिकारपूरउद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक

कौशल्यावर आधारित ऑनलाइन खेळांविषयी विचार करता, हे गेम्स पूर्णपणे स्पर्धात्मक कौशल्य, अभ्यास, एकाग्रता आणि धोरणात्मक विचार यावर आधारलेले असतात. यात बुद्धीला चालना देणारे व्हिडिओ गेम्स, पझल्स, क्विझ, शैक्षणिक ॲप्स तसेच टीमवर्क वाढवणारे मल्टीप्लेयर गेम्स यांचा समावेश होतो. हे गेम्स विद्यार्थ्यांचे विषयातील ज्ञान वाढवतात, त्यांच्यातील तार्कीक विचारशक्ती आणि वेगवेगळ्या विषयांच्या कौशल्याचा विकास करतात.

उदाहरणार्थ, भाषिक कौशल्यासाठी शब्दकोडी, गणिती विचारसरणीसाठी गणिती पझल्स, किंवा विज्ञान, इतिहास, भूगोल विषयांचा प्रत्यय आणून देणारे शैक्षणिक सिम्युलेशन गेम्स हे विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर फायदेशीर ठरतात. ते मुख्यतः मनोरंजन व शिक्षण याची सांगड घालतात. अशा गेम्समध्ये आर्थिक व्यवहार किंवा लकी ड्रॉ सारखी संधी किंवा आकर्षण नसते, त्यामुळे अपायकारक व्यसनोत्सुकता अथवा सामाजिक, आर्थिक धोके उद्भवत नाहीत.निखळ करमणुकीसाठी विकसित  ॲनिमेटेड फिल्म्स यांचे स्वरूप बऱ्याच प्रसंगी मूल्यशिक्षण, सर्जनाशी व्यक्तिमत्व विकास, कल्पनाशक्तीला वाव देणे आणि आरामदायक विरंगुळा हेच असते. ॲनिमेटेड फिल्म्स या मुलांसाठी तसेच प्रौढांसाठीही तितकेच आकर्षक माध्यम असतात. या माध्यमातून सृजनशील कथानक, गोड संगीत, रंगीत पात्रे आणि तंत्रज्ञानाचा मनोवेधक उपयोग पाहायला मिळतो. या फिल्म्स ज्ञानवर्धनासोबत मनोरंजन, दैनंदिन जगण्याचा गोडवा, संस्कार, जीवनमूल्यांचे संदेश, सामाजिक प्रश्न यासारख्या मुद्द्यांवर सकारात्मक प्रभाव पाडतात. उदा हनुमान, महावतार नरसिंह आदी. 

तिसरा प्रकार म्हणजे पैसे लावावे लागणारे जुगार किंवा बेटिंगचे खेळ. यांचे वैशिष्ट्य म्हणजे यातून निर्माण होणारा फक्त निव्वळ आर्थिक लाभ अथवा तोटा या भावनेला केंद्रस्थानी आहे. कौशल्य, शिक्षण किंवा आरोग्य या काहीच गोष्टींशी याचा थेट संबंध नसतो. पैसे किंवा मालमत्तेवर सट्टा लावून येणाऱ्या अपयश-यशाचा प्रवास हा अनेकदा नशेशिवाय, अनियंत्रित, विकृत आणि व्यसनात्मक असतो. यात लकी ड्रॉ, कार्ड्स, नंबर गेम्स, कॅसिनो गेम्स, ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्म्स, क्रिकेट किंवा फुटबॉलसारख्या खेळांवर फेस-टू-फेस किंवा ऑनलाइन सट्टेबाजी, अशी रूपे आहेत. 

कोणते तीन पैलू स्पष्ट दिसतात?तंत्रज्ञानाच्या युगात ऑनलाइन गेमिंगचे तीन पैलू स्पष्ट दिसतात – शिक्षण व कौशल्यवर्धन, संस्कार आणि मनोरंजन देणारे ॲनिमेशन आणि व्यसनमूलक जुगार. पहिले दोन अंग समाजासाठी उपयुक्त तर तिसरे अंग विनाशकारी. त्यामुळे तरुण पिढीला योग्य वेळी मार्गदर्शन देणे ही पालक, शिक्षक आणि समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.

AVGC-XR धोरणात काय?ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स व एक्सटेंडेड रिॲलिटीला प्रोत्साहनकला, कौशल्य व तंत्रज्ञान यांचा संगमरोजगार निर्मिती आणि तरुणांना संधीसुरक्षित गेम्सचे फायदेपझल्स व क्विझमुळे ज्ञानवृद्धीभाषिक व गणिती कौशल्य वृद्धिंगतटीमवर्क आणि तार्किकविचारशक्ती वाढजुगाराचे धोकेआर्थिक नुकसान आणि कर्जबाजारीपणामानसिक ताण व नातेसंबंधातील तणावगुन्हेगारी व व्यसनाचा धोका

पालक व शिक्षकांची भूमिकाआज मोबाइल हा मुलांच्या हातात सहज पोहोचतो. अशावेळी पालक आणि शिक्षकांनी मार्गदर्शन करणे अपरिहार्य आहे. कायदेशीर आणि बेकायदेशीर खेळांमधील फरक मुलांना समजावून सांगणे गरजेचे आहे. सुरक्षित, शिक्षणपूरक गेम्स निवडून देणे, तसेच मैदानावरील खेळ, वाचन, कला व छंद याकडे वळवणे आवश्यक आहे. पालक स्वतः मोबाइल व्यसनात अडकले तर मुलांकडून आदर्श वर्तनाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. शाळा-महाविद्यालयांत नागरिकशास्त्र विषयात ऑनलाइन व्यसनाचे दुष्परिणाम शिकवले गेले पाहिजेत.

श्रीमंत होण्याचा हव्यास... हे खेळ सुरुवातीला चित्तथरारक, मोहक आणि ‘लवकर श्रीमंत होण्याचा’ हव्यास निर्माण करणारे असले तरी पुढे जाऊन आर्थिक नुकसान, मानसिक आरोग्याच्या समस्या, सामाजिक आणि कौटुंबिक नात्यांमध्ये तणाव आणि अनेकदा गुन्हेगारी जन्मास घालतात. यामुळेच यावर कायद्याने बंदी आहे.

टॅग्स :onlineऑनलाइनGame Addictionव्हिडिओ गेम व्यसन